✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

स — स्वानंद मारुलकर, Sun, 09/05/2010 - 14:11
भाग्य दिसते जे समोरी ते मला लाभेल का? नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का? नाहि दिसली ती कधी मग भेटणे अमुचे कुठे? भाबड्या जीवास का मग आतुनी आशा फुटे? काय पडली भूल ही माझ्या मना उमगेल का? नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का? का सकाळी भास होतो पैंजणांचा अंगणी? अन् चुलीच्या जवळ वाजे काकणांची किणकिणी चिमूटभर त्या कुंकवाचे भाग्य मग उजळेल का? नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का? मांडले शब्दात मी ह्रदयात जे हुंकारले फक्त आशा एक की मजला दिसावी पाउले या मनीचे हे मनोगत त्या मनी पोचेल का? नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का? -स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com/

प्रतिक्रिया द्या
1792 वाचन

💬 प्रतिसाद (8)

उजळेल का?

अविनाशकुलकर्णी
Sun, 09/05/2010 - 15:14 नवीन
बापरे ...लागेल का?...पोचेल का?...उजळेल का? किति प्रश्ण ...किति सरबत्ति
  • Log in or register to post comments

उत्तर द्या

स्वानंद मारुलकर
Sun, 09/05/2010 - 22:35 नवीन
उत्तर द्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

<<नाव माझे याच नावाच्या पुढे

शिल्पा ब
Sun, 09/05/2010 - 23:01 नवीन
<<नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का? इतके प्रश्न विचारून वैताग दिला तर नक्कीच नाही..
  • Log in or register to post comments

+१

इंटरनेटस्नेही
Sun, 09/05/2010 - 23:48 नवीन
ही ही ही. असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

चांगली कविता

राजेश घासकडवी
Mon, 09/06/2010 - 00:08 नवीन
लिहीत राहा.
  • Log in or register to post comments

आभार

स्वानंद मारुलकर
Mon, 09/06/2010 - 19:43 नवीन
सर्वांचा आभारी आहे. >>इतके प्रश्न विचारून वैताग दिला तर नक्कीच नाही.. घ्या!! म्हणजे एवढी कविता करुन काहीच उपयोग नाही म्हणायचा.
  • Log in or register to post comments

माझी ही कविता कोणाला आवडेल

Arun Powar
Tue, 09/07/2010 - 18:35 नवीन
माझी ही कविता कोणाला आवडेल का? ही ओळ शेवटी टाकणार का?
  • Log in or register to post comments

चांगली कविता

वेताळ
Tue, 09/07/2010 - 18:47 नवीन
पण ती नक्कीच तुम्हाला सोडुन गेली असणार. भाग्यवान आहे .
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा