Skip to main content

बंगलोरला धोका बीजिंगचा

लेखक मिसळभोक्ता यांनी रविवार, 05/09/2010 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
काही तथ्ये: १. बंगलोरला दर वर्षी १ लाख नवीन नोकर्‍या तयार होतायत. बीजिंगला पाच लाख. २. बंगलोरच्या घरंच्या किंमती ५ वर्षात दुप्पट झाल्यात. बीजिंगला दोन वर्षात. ३. बंगलोरच्या "आय आय एस सी" सोडल्यास एकाही विद्यापीठातून जगविख्यात लोक निघत नाहीत. बीजिंगला शिंघुआ तर आहेच, पण पेकिंग नॅशनल सारखी उत्तम उदाहरणे देखील आहेत. ४. बंगलोरला इंग्रजी भाषा सर्रास वापरली जाते. बीजिंगच्या इंजिनियर्स ला फारसे इंग्रजी येत, नाही. त्यामुळे बीजिंगच्या इंजिनियर्सना उत्कृष्ट काम करूनच त्यांची जागा मजबूत करायची असते. बंगलोरने आजवर त्यांच्या बोलबच्चनगिरीमुळे ती जागा व्यवस्थित सांभाळली आहे. ५. बंगलोरला एका अमेरिकन इंजिनियर ऐवजी ३ भारतीय नोकरीला ठेवता येतात, तेवढ्याच पैशात. त्यांचे आउटपुट एका अमेरिकन इंजिनियर एवढे असते. बीजिंगला ५, आणि त्यंचे ऑटपुट तीन अमेरिकन इंजिनियर्स एवढे असते. (माझ्याकडे ह्याची आकडेवारी स्वनुभवातून जमवलेली आहे.) ६. वर्क एथिक / लॉयल्टी मध्ये बंगलोरचा नंबर खूप खाली आहे. पैशांसाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात. बीजिंगला कुठल्याही कोअर टेक्नॉलॉजीशिवाय काहीही करणे आवडत नाही. ७. बंगलोरला जॉब मध्ये दोन वर्शे झाली, की लगेच म्यानेजमेंट करावीशी वाटते. बीजिंगला त्या डार्क साईडला जाणारे विरळा. एकद बीजिंगने इंग्रजी शिकले, की बंगलोर खल्लास, ह्या मताचा मी झालोय. तुमचे काय मत आहे ? (काळेकाका, पत्र पाठवा.)

वाचने 14277
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

In reply to by मिसळभोक्ता

किंवा चायना मोबाईल, बायडू, तावबाव, व्हावे ह्यांनी मुक्तस्रोत केलेले प्रकल्प बघा, आणि शोधा इन्फी, विप्रो, टी सी एस ह्यांनी जगाला काय दिले आहे, ते.
भारतात आजतागायत एकही समाधान कारक देवनागरी ocr किंवा text to speech साधन तयार झालेले ऐकले नाही.

In reply to by संजय अभ्यंकर

त्यामुळे इतकी बौद्धीक संपदा असूनही आम्ही शेवटी हमालच आहोत.
ही श्रींची इच्छा!

शक्य आहे ....माझ्या वाचनात आले आहे की चीन जगात दुसर्‍या नम्बरची आर्थीक महासता झाली आहे......आणी चीन ने औलम्पीक स्पधा यशस्वी करुन दाखव्ली होती........आणी आपली कौमनवेल्थ ची तयारी

In reply to by ramjya

>>आणी चीन ने औलम्पीक स्पधा यशस्वी करुन दाखव्ली होती........आणी आपली कौमनवेल्थ ची तयारी.... तुम्हाला काय वाटतंय? कोण जबाबदार आहे आपल्या कॉमनवेल्थ च्या तयारीला?

अवांतर :- भारत 'महासत्ता' होणार म्हणजे नेमके काय होणार आहे हे कोणी सांगु शकेल काय ?

In reply to by नरेश धाल

भारत 'महासत्ता' होणार म्हणजे नेमके काय होणार आहे हे कोणी सांगु शकेल काय
ते अब्दुल कलाम ह्यांना नेमके माहित आहे.

बंगलोरला दर वर्षी १ लाख नवीन नोकर्‍या तयार होतायत. बीजिंगला पाच लाख.
अरे वा! रेझ्युमे कुठे पाठवावा? :P (जगाचा नागरीक) ‍ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

२०० चिन्यांपैकी एक भारतीय आहे बीजिंगच्या आम्च्या ऑफिसात. भारतीय म्यानेजरला कंटाळून त्याच्या कष्टाचे चीज होईल म्हणून आलाय इथे. आणि प्रचंड खूष आहे. पण एक अट. कॉम्प्युटर सायन्स वाला हवा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवाला नको.

In reply to by मिसळभोक्ता

>>कॉम्प्युटर सायन्स वाला हवा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवाला नको. अरेरे अटीत बसत नाही :( (म्हंजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवाला मागितलात तरी अटीत बसत नाहीच (आमचं कागदोपत्री शिक्षण ह्या दोन्हीमधे नाही)

पैशासाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात
जे२ईई मध्ये काम करण्यात नक्की वाईट काय आहे? सर्वलेट, जेसपी, जेएसएफ, स्प्रिंग, फ्लेक्स, वेब सर्विसेस (मेट्रो, जेडब्लूएस, ऍक्सिस), हायबरनेट यापैकी नक्की कलप्रिट कोण आहे ते सांगा बुवा. उद्या कोणी सी++ मध्ये काम केले तर त्याला सी मध्ये काम करत नाही म्हणून हाणायचे. सीमध्ये काम करणाऱ्याला असेंब्ली लॅँगवेजमध्ये काम करत नाही म्हणून हाणायचे. अशी पॉलिसी आहे काय? उद्या चिन्यांनी जे२ईईमध्ये काम केले असते आणि भारतीय प्रोग्रामर सी मध्ये काम करत असते तर चिन्यांनी तंत्रज्ञानात कशी प्रगती केली आहे हे तुम्हीच आम्हाला दाखवले असते. असो.. खालील चित्र पाहा व हसा.

In reply to by आजानुकर्ण

जे २ ई ई चे अ‍ॅब्स्ट्रॅक्शन चुकीचे आहे असे तुला वाटत नाही का ? कंटेनर म्हणजे काय, हे नक्की समजवून सांग मला. मग बोल.

In reply to by मिसळभोक्ता

जे २ ई ई चे अ‍ॅब्स्ट्रॅक्शन चुकीचे आहे असे तुला वाटत नाही का ?
नाही.
कंटेनर म्हणजे काय, हे नक्की समजवून सांग मला. मग बोल.
इथे इंटर्व्यू चालला आहे का? कोणता कंटेनर ? इजेबी की वेब? मल्टिथ्रेडिंग, सेक्युरिटी आणि लाईफसायकल म्यानेजमेंट करणारे वेब कंटेनर असते बॉ. आता टॉमक्याट हा ऍप सर्वर कसा नाही हे विचारु नका. (जेबॉस) आजानुकर्ण

आपल्याला एकदम पटलंय. केव्हा पासून वाट बघतोय मुंबईची शांघाई होण्याची :) म्हणजे काय आपसूकच चीनच्या आर्थिक उन्नतीत भागीदार व्हायला मिळेल. [अवांतर: कुठे गेलेत ते राजकारणी, नेते, सरकार ज्यांनी मुंबईची शांघाई करण्याची घोषणा करून मला हुरळून टाकलंय. बंगलोरचं बीजींग करून टाकता येईल का?]

चीन सध्यातरी आपल्या पुढे आहे हे मान्य करायलाच हवे,परंतु आपल्याला जास्त चिंता करायला पाहिजे असे मला तरी वाटत नाही. डेल आपला चायना बेस सोडुन हिंदूस्थानात येत आहे,गुगल चीन वाद तर आता सार्‍या जगालाच माहित झाला आहे. http://www.2point6billion.com/news/2010/03/23/dell-switching-pc-exports… http://www.2point6billion.com/news/2010/03/26/u-s-tech-companies-follow… हे देखील वाचा :--- http://www.allvoices.com/contributed-news/6674537-foreign-companies-los… http://www.caclubindia.com/articles/shifting-in-out-of-china--4720.asp चीन मधुन हिंदूस्थानात आयात होण्यार्‍या वस्तुंवर जरी निर्बंध घातले तरी चीनला त्याचा चांगलाच फटका बसु शकतो. (टेलिकॉम रिलेटेड सामुग्री चीन्यांकडुन अजिबात घेउ नये अशी स्थिती आहे,कारण चीनी अशा वस्तुंचा वापर करुन हेरगिरी करतो.) डॉटने सुरक्षिततेच्या कारणास्तव टेलिकॉम कंपन्यांना चीनी उपकरणे वापरु नका असे बजावले आहे. http://www.business-standard.com/india/news/dot-for-keeping-chinese-out… चीन मधे सध्या दुसराच उद्योग तेजीत आहे,कुठला ? ( http://bit.ly/9IE6EE ) ;)

येत्या काही वर्षात भारतातली परिस्थिती कठीण होणार आहे हे निश्चित. १. भारत महासत्ता होणार आहे हा फुगा लवकरच फुटेल. २. अमेरिकेतून येणाऱ्या आयटी व्यवसायात मोठ्या प्रमाणात घट होईल. (अगदी आयटी हमाली करने सुद्धा कठीण होइल) ३. उपलब्ध नोकर्या आणि भारताची लोकसंख्या यांचे प्रमाण अगदीच व्यस्त होत जाईल. ४. भारतात मिळणाऱ्या व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा इतका खालावेल कि बाहेर पडणारे पदवीधर केवळ नावाचे पदवीधर असतील. कोणत्याही व्यवसायिक समस्येचे ते निराकरण ते करू शकणार नाहीत.

In reply to by बोलघेवडा

ही 'ओरड' कित्येक वर्षापासून चालु आहे.फोर्ब्स्,ईकॉनॉमिस्ट्,फॉर्चुन,फॉरेस्टरच्या लोकांना अधून मधुन झटके येत असतात.झटका आला की ते फासे टाकून कुठलातरी देश निवडतात. कुठल्या देशाला हरभर्‍याच्या झाडावर चढवायचे आणि कोणाला उतरवायचे हे ठरते.आणि मग आपण कुठलीतरी 'सक्सेस स्टोरी' वाचतो.तर कधी त्याच देशात देशात पाणी प्यायचे वांदे असेही वाचतो. इन्फ्रास्ट्रक्चर सुधारल्याशिवाय काही खरे नाही असे सांगून लेखाचा शेवट होतो आणि आपली तेवढीच करमणूक होते.

In reply to by चिरोटा

फोर्ब्स्,ईकॉनॉमिस्ट्,फॉर्चुन,फॉरेस्टरच्या लोकांना अधून मधुन झटके येत असतात.झटका आला की ते फासे टाकून कुठलातरी देश निवडतात. कुठल्या देशाला हरभर्‍याच्या झाडावर चढवायचे आणि कोणाला उतरवायचे हे ठरते.आणि मग आपण कुठलीतरी 'सक्सेस स्टोरी' वाचतो.तर कधी त्याच देशात देशात पाणी प्यायचे वांदे असेही वाचतो. इन्फ्रास्ट्रक्चर सुधारल्याशिवाय काही खरे नाही असे सांगून लेखाचा शेवट होतो आणि आपली तेवढीच करमणूक होते
+१, क्या बात है ! एकदम मार्मिक भाष्य, अगदी कट टु कट सहमत . मध्यंतरी 'रिसेशन आणि बेल-आउट्'च्या पिरियडमध्ये तर ह्यांनी मनोरंजनाचा असा धडाका लावला की ज्याचे नाव ते. मी तर मटाचे 'हसा लेको' सोडुन हे वाचत बसायचो ;) - छोटा डॉन

हमम्म्म्म्म्म्म्म्म्म, किती जणांनी अभ्यास/विचार करुन प्रतिसाद दिला आहे बरं? आणि हा लेख एका माणसाच्या स्वानुभवावरुन आहे हेही सत्यच. असो, मला तरी वैयक्तिक रित्या लेख अनावश्यक/पँडेमिक वाटला, म्हणजे ४०-५० वर्षे अनुभव असलेल्या अथवा मोठ्या मोठ्या विचारवंतांना वेड्यात काढले आहे सरळ सरळ.. असो, चालु द्या.. मराठी माणसांनो... चालु द्या...

In reply to by मराठमोळा

असले प्रश्न पडतात त्यावरून तुम्ही मराठी नाहीत असं वाटतं...नुसतंच नाव घेतलंय मराठमोळा म्हणून...

In reply to by मराठमोळा

ज्यांना ४०-५० वर्षांचा अनुभव आहे ते कोण आहेत? Or did you just pull these "facts" out of your head? संपादक - गोगोल, कृपया भाषा संयत असूदेत, विचार काहीही असले तरी बिलो द बेल्ट वार नको!)

परवा जेवायचे हॉटेलचे वांदे होते .आता एकदम चीन इझ बेस्ट... पण काही ही असो चीन मला खुप आवडतो.मिचमिच बघणारे लोक इतके पुढे आहेत हे बघुन मन भरुन आले.

In reply to by वेताळ

मिचमिच बघणारे लोक इतके पुढे आहेत हे बघुन मन भरुन आले.
सहमत..:) चिक्कन चिल्ली लेकाचे..! तात्या.

बाकी भारत सोडुन सध्या तरी कुठला देशाचा अनुभव नाही आयटी क्षेत्रात काम करण्याचा. पण भारतीय आयटी कंपनीत बोलबच्चनगिरी भयानक आहे ..कदाचीत आयटी क्षेत्रात काम करतांना सर्विकड्ची हीच स्थीती असेल. सर्व नुसत हवेत बोलायच Quality,standard,process etc..अबे नक्की काय करायच ते सांग ना..साला बेसीक मधेच मार खातो आपण.....

मिभो, तुमचं संगणक शास्त्राचं ज्ञान जेवढं आहे त्याच्या एक दशांश जरी तुम्हाला अर्थशास्त्राचं ज्ञान असतं तर तुम्हाला कळालं असतं की बंगलोरला बीजिंगचा काहीही धोका नाही, असलाच तर अमेरिकेच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेचा आहे (पण त्यातून फायदा ही होऊ शकतो). शिवाय अमेरिकन अभियंते फार हुषार आणि कार्यक्षम असतात हा जो तुमचा भयंकर गैरसमज आहे ना तो काढून टाका. अमेरिकन अभियंते एवढे भारी असते तर अमेरिकेत रशियन आणि त्या खालोखाल भारतीय लोकाना एवढी मागणी नसती आली आणि बिल गेट्सने H1 विजाचे प्रमाण वाढवण्यासाठी एवढी बोंब नसती मारली. चिनी माल आणि चिनी गुणवत्ते बद्दल एवढ्या ममत्वाने बोलणारे मी पाहिलेले तुम्ही पहिलेच! इथे सिंगापुरात एखादी वस्तू विकायची असेल तर ती 'मेड इन चायना' नाही असं आधी सांगावं लागतं. परिस्थिती हवी तेवढी चांगली नसली तरी इतर देशांच्या मानाने बरीच चांगली आहे आपल्याकडे. पुढे स्पर्धा वाढेल तशी गुणवत्ता ही वाढवावीच लागेल लोकाना. मागणी-पुरवठ्याप्रमाणे स्वतःला कसं बदलावं हे भारतीयाना व्यवस्थित कळतं, काळजी नसावी. अवांतर: भारतीय कंपन्यांनी काहीच नवीन दिले नाही अशी (फक्त)बोंब मारायची फॅशन आहे आजकाल. ज्यानी स्वतः काही नवीन केलं आहे त्यानाच तो अधिकार आहे. बाकीच्यांच्या बोंबलण्याला काहीही अर्थ नाही.

In reply to by नगरीनिरंजन

नाही हो. मी मारलेली बोंब फ्याशन म्हणून मारलेली नाही. "ज्यानी स्वतः काही नवीन केलं आहे त्यानाच तो अधिकार आहे." -ह्या क्याटयागिरीत येण्याचा आटोकाट प्रयत्न करून मगच बोलत आहे. पुन्हा सांगतो - ऑपरेटिंग सिस्टिम्स, इंटेग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट्स, मेम्स टेक्नॉलॉजी सेन्सर्स आणि मायक्रोकंट्रोलर्स जोवर भारतीय कंपन्यांमध्ये (भारतात) मोठ्या प्रमाणावर निर्माण होत नाहीत तोवर भारताची इलेक्ट्रॉनिक्स आणि काँप्युटर सायन्समधली प्रगती पांगळी आहे. बाकी आयटी वगैरे डेरिव्हेटिव्हज आहेत. म्हणजे दुधाची आयात करून भारतीय लोणी बनवण्यासारखे.

या सर्व चर्चेत इन्ग्लिश हे माध्यम कायम राहिल हे ग्रुहित धरले आहे . पण उद्या अशीही परिस्थीती येइल की चायनिज भाषे मधे सर्व जागतिक व्यवहार करावे लागतिल कारण आपल्या कडे म्हण आहेना " बलिश्ठाचा खान्द्यावर ". अर्थात आपल्या कडे ही इन्ग्लिश चा काय उजेड आहे हे मुम्बाइ,पुणे, बन्गलोर च्या शहरा च्या बाहेर जा मग तो काय आहे ते दिसेल च .---आणि शहरामधे कौल सेन्टर मधले काही पोपट सोडले तर तेथे ही काय उजेड आहे हे ही दिसेल मला येथे "मनोगत" प्रमाणे शुध्ह लेखना ची काही सोय येथे पण आहे का या बद्दल मार्गदर्शन हवे आहे मिळेल का?