Skip to main content

गण: माझ्या गणाला गणपती आले

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 03/09/2010 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
गण: आमच्या गणाला गणपती आले
आमच्या गणाला गणपती आले वंदन करूनी मस्तक झुकले ||धृ|| रिद्धीसिद्धीचा स्वामी तू गणपती शरण आलो आम्ही अल्पमती कार्यारंभी दावूनी उपस्थीती दयाबुद्धीने आम्हा पाहीले आमच्या गणाला गणपती आले ||१|| कलाकारां होवोनी स्पुर्ती जगावेगळी मिळण्या किर्ती कला आगळी सादर करण्या कलाकार सारे एकच झाले आमच्या गणाला गणपती आले ||२|| सारी विघ्ने गेली सारूनी संकटे सारी गेली हारूनी पुढला अंक सुरू कराया गणात नमन गणाला केले आमच्या गणाला गणपती आले ||३|| ०३/०९/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1419
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

प्रयत्न बरा. पारंपारिक चालीवर गुणगुणलो. मीटरमद्ये बसली नाही.

छान कविता. शिर्षक वाचून अनेक घाणेरडी विडंबने काही विडंबकांच्या डोक्यात आली असतील. पण कृपया गौरी गणपती संपेपर्यंत त्यांनी थांबावे असे वाटते.