Skip to main content

मदत हवी आहे

लेखक priya_d यांनी शुक्रवार, 03/09/2010 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मि मिपावर नवीनच सभासद झाले आहे. येत्या गणेशोत्सवात म्हण्ण्यासाठी (माझ्या ८ वर्षाच्या मुलाला) काही सोपे श्लोक किंवा छोटी गाणी इ. हवे आहे. कोणी मदत करु शकेल का ? लिरिक्स सुध्दा चालेल. प्रिया
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10984
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

अपणी तो जैसे तैसे थोडीऐसे या वैसे कट जायेगी आपका क्या होगा जनाबे आली हे गाणे सोपे पण आहे आणि त्याला आवडेल पण गायला. :) श्लोक म्हणायला त्याला आवडणार पन नाही आणि ते सोपे पण नसतात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोणतंही चालेल. (जुनं गाणं बोधप्रदही आहे) :D बालवयी खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवा आता.... हे आठ वर्षाच्या मुलाने म्हणण्यापेक्षा बरे. अवांतर : जुन्या गाण्यात "अपनी तो" आहे नव्या गाण्यात "अपणी तो" आहे. :)

In reply to by नितिन थत्ते

जुन्या गाण्यात "अपनी तो" आहे नव्या गाण्यात "अपणी तो" आहे.
टंकनचूक, करंगळीचे हाड वाढणे का हेच अभिप्रेत आहे यात फरक न समजल्यामुळे प्रश्न विचारला, जनाबेआली!

येत्या गणेशोत्सवात म्हण्ण्यासाठी (माझ्या ८ वर्षाच्या मुलाला) काही सोपे श्लोक किंवा छोटी गाणी इ. हवे आहे.
हे घ्या - सदासर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको तू गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेचि आता.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

रामदासस्वामींनी बाकी मनाच्या श्लोकांत भुजंगप्रयात छान पाळला. पण इथे रघु ठेवले ? रघू हवे ना ? पण मग रघु + उनायका होते. इथेच रामदास स्वामींचे रामदास झालेत, असे माझे मत आहे.

कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान दिग्दशर्क म्हणाला, व्वा व्वा ! ससा म्हणाला, चहा हवा कोणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी विदुषक म्हणाला, छान छान ! ससा म्हणाला, काढ पान कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा सशाने म्हटले पाढे आणि घडघड वाचले धडे गुरुजी म्हणाले, शाबास ! ससा म्हणाला, करा पास

पण ऑलटाईम हिट मध्ये.... बाबा लगीन कोंबडी अरे दिवानो मुझे पहचानो ब्राझिल विठ्ठ्ला कोणता झेंडा ही गाणि/श्लोक प्रसिध्द आहेत. अजुन एक दादा महाराजाचे वर ढगाला लागली कळ पाणी...मस्तच आहे.

In reply to by वेताळ

हे 'डॉल्बी' नक्की काय प्रकरण आहे? म्हणजे Dolby AC3, Dolby Digital, Dolby E वगैरे सगळे ठाऊक आहे, पण पब्लिक कार्यक्रमात ते नक्की काय वापरतात, व कसे? (हा उल्लेख ह्याच संदर्भात दुसर्‍यांदा मिपावर गेल्या दोन दिवसात वाचतोय, म्हणून कुतुहूल म्हणून विचारतोय).

सध्या "मुन्नी बदनाम हुई" हि मलाईकादेवीची आरती / स्तवन खुप लोकप्रीय झाले आहे, ते शिकवावे. ह्या गाण्याचा व्हिडो सुद्धा उपलब्ध आहे तु-नळी वर.

ज्ञानेश्वरीतील मंगलाचरण म्हट्ल्यास समयोचित होईल. ॐ नमो जी आद्या I वेद प्रतिपाद्या I जय जय स्वसंवेद्या I आत्मरुपा II देवा तूचि गणेशु I सकलमतिप्रकाशु I म्हणे निव्रुत्तिदासु Iअवधारिजो जी II हे शब्दब्रह्म अशेषI तेचि मूर्ती सुवेष I जेथ वर्णवपु निर्दोष I मिरवत असे II अकार चरण युगुल I उकार उदर विशाल I मकार महामंडळ I मस्तकाकारें II हे तिन्ही एकवटले I तेथ शब्दब्रह्म कवळले I तें मियां गुरुकृपा नमिलेI आदिबीज II आता अभिनव वाग्विलासिनी I जे चातुर्यार्थ कलाकामिनी I ते शारदा विश्वमोहिनी I नमस्कारिली मियां II लता मंगेशकरांची सीडी मिळ्ते.

मध्यंतरी यू ट्युबवर बाप्पाची मस्त श्लोक पाहिले होते,आत्ता शोधाया गेलो ते सापडेना !!! :( तवा तुम्हीच तिकडे शोधण्याचे कष्ट घ्या.

श्लोक, स्तोत्र हवे असल्यास भीमरुपी, रामरक्षा यापासुन सुरवात करा. वल्लभाचार्यांचे मधुराष्टक मस्त आहे, लहान मुलांना आवडते. उच्चार चांगले असल्यास चर्पट्पंजरिका पण चालु शकेल. आताच ह्या वयात एकदम गीता शिकवल्यास बुद्धीला जड झाल्याने कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ होउन मोठेपणी हिंदूविरोधी होऊ शकतो. स्वतः त्याला समजुन घ्यायची इच्छा होईल तेव्हाच वाचु द्या. :) गाणी हवी असल्यास खूप बालगीते आहेत त्यातले निवडा !

In reply to by अवलिया

आताच ह्या वयात एकदम गीता शिकवल्यास बुद्धीला जड झाल्याने कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ होउन मोठेपणी हिंदूविरोधी होऊ शकतो.
हे बाकी मस्त.. :)

In reply to by नगरीनिरंजन

संस्कृतचा गोडवा अवीट आहे असे आमचे परममित्र तात्या एके ठिकाणी म्हटले होते. (संदर्भ हाताशी नाही सापडला की देतो). अर्थात त्यांनी म्हटले नसते तरीही सत्य बदलत नाही. संस्कृत अवघड आहे असे ज्यांना वाटते त्यांनी "प्रयत्न करुन बघा ! झालाच तर फायदाच होईल !! "

In reply to by वेताळ

मला होळी, गटारी अमावस्या आणि दिवाळी हे सण आवडतात.

In reply to by नितिन थत्ते

क्या बात है ! होळी शिकवते आपल्यातले दुर्गुण जाळुन टाका गटारी शिकवते अतिरेक करु नये. प्रायश्चितरुपी श्रावणात संयम पाळावा दिवाळी शिकवते दिव्याचे महत्व. कुटुंबीयांनी एकत्र जमुन आनंद साजरा करावा. वा ! थत्तेंची निवड अगदी सुयोग्य असुन प्रत्येकाला मार्गदर्शक अशीच आहे. जियो थत्ते ! जियो !!

मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करु काय जाणे अपराध माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा तू , घाल पोटी ----------------------------------------------------------- जय गणेश जय गणेश जय गणेश देवा , माता जाकी पार्वती पिता महादेवा. एकदंत दयावंत चार भुजाधारी, माथे पे तिलक सोहे , मूस की सवारी पान चढे फूल चढे और चढे मेवा लडूवन का भोग लगे , संत करे सेवा जय गणेश जय गणेश देवा , माता जाकी पार्वती पिता महादेवा. अंधन को आख देत , कोढीन को काया बांझन को पुत्र देत , निर्धन को माया सूर्य शाम शरण आये , सफल कीजे सेवा सूर्य शाम शरण आये , सफल कीजे सेवा जय गणेश जय गणेश देवा , माता जाकी पार्वती पिता महादेवा. इथे चाल ऐकत येइल - http://www.lyricsmasti.com/song/6404/get_lyrics_of_Jai-Ganesh-Jai-Ganes…

प्रिया हे गणपती स्तोत्र आणि मारुती स्तोत्र आहे हे तिला रोज म्हणायलाही चांगल आहे. || श्री गणपती स्तोत्र || प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम || भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये || १ || प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकम || तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम || २ || लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च || सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टमम || ३ || नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम || एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम || ४ || द्वादशितानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः || न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो || ५ || विद्यार्थी लभते विध्यां धनार्थी लभते धनम || पुत्रार्थी लभते पुत्रन मोक्षार्थी लभते गतिम || ६ || जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासै: फलं लभेत || संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: || ७ || अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत || तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: || ८ || इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम || || श्री मारुती स्तोत्र || भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती| वानरी अंजनीसुता, रामदुता प्रभंजना||१|| महाबली प्राणदाता, सकळा उठवी बळे| सौख्यकारी शोकहंता, धूर्त वैष्णव गायका|| २|| दीननाथा हरीरुपा, सुंदरा जगदंतरा| पातालदेवता हंता, भव्य सिंदुर लेपना|| ३|| लोकनाथा, जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना| पुण्यवंता, पुण्यशिळा, पावना परितोषका|| ४|| ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे| काळाग्नी काळरुद्राग्नी, देखता कांपती भये|| ५|| ब्रम्हांडे माईली नेणों आंवाळे दंतपंक्ती| नेत्राग्नी चालील्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळे|| ६|| पुच्छ ते मुर्डीले माथा, किरीटी कुंडले बरी| सुवर्ण कटी कांसोटी , घंटा किंकिणी नागरा|| ७|| ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपात़ळु| चपळांग पाहता मोठे, महाविद्युल्लतेपरी|| ८|| कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे| मंद्रादीसारखा द्रोणु क्रोधे उत्पाटिला बळे|| ९|| आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती| मनासी टाकीले मागे, गतिसी तुळणा नसे|| १०|| अणुपासुनि ब्रम्हांडाएवढा होत जातसे, तयासी तुळणा कोठे, मेरुमंदार धाकुटे || ११|| ब्रम्हांडाभोवते वेढे, वज्रपुच्छे करु शके| तयासी तुळणा कैंची, ब्रम्हांडी पाहता नसे|| १२|| आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा| वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळा|| १३|| धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्रसमस्तही|पावती रुपविद्यादी स्तोत्रपाठेकरुनिया|| १४|| भूतप्रेतसमंधादि रोगव्याधीसमस्तही| नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने|| १५|| हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी| दृढदेहो, निसंदेहो, संख्याचंद्रकळागुणे|| १६|| रामदासी अग्रगण्यु, कपीकुळासी मंडणु| रामरुपी अंतरात्मा, दर्शने दोषनासती|| १७|| || इती श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतीस्तोत्रं सम्पूर्णं ||

अलन्कापुरी पुण्यभुमी पवित्र, तेथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी

In reply to by कुक

अलन्कापुरी पुण्यभुमी पवित्र, तेथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी लिहिताना स्वत:शी गुणगुणून बघितले, तर नीट लिहायला मदत होईल. उदा. असे म्हणून बघा. अलङकापुरी पुण्यभूमी पवित्र, (क च्या आधी ङ येतो, न नाही. भू, भु नाही.) तेथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठवीता महापुण्य राशी (पुन्हा तेच.) नमस्कार माझा तया ज्ञानबाशी (सहा सात मात्रा जास्त होतायत) ज्ञानियांच्या राजाचा उल्लेख करताय राव! काही नियम तरी पाळा.

In reply to by मिसळभोक्ता

सही बदला चा अर्थ उत्तम सूड असा नसून तुमची स्वाक्षरी बदलून टाका असा आहे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारची मीटरे ठोकाठोक करून दुरुस्त करून मिळतील.) अशी हवी.

In reply to by राजेश घासकडवी

-- मिटरठोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारची मीटरे ठोकाठोक करून दुरुस्त करून मिळतील.)

In reply to by चतुरंग

हल्ली स्मार्ट मीटरे मिळतात म्हणे. त्यांना ठोकावे लागत नाही. फक्त चुम्माचाटी केली की चालतात. (हा शब्द आता नेहमीच्या वापरात आणण्याचा एक के प्र.)

मग हे पाहिजेच!!! "देवा हो देवा, गणपती देवा, तुमसे बढकर कौन? और तुम्हारे भक्तजनोंमें, हमसे बढकर कौन!!!!" बधा पहिलं बक्षिस मिळतं की नाही ते!!!! :)

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! एवढ्या मोठ्या संख्येत, विविध प्रकारचे प्रतिसाद मिळतील असे वाटले नव्हते. माझा मुलगा 'देवा तुझे किती सुंदर आकाश' हे गाणे आणि मारूती स्तोत्र म्हणणार आहे. सर्व्वांनी वेळ काढून दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल पुन्हा एकदा धन्यवाद. प्रिया