लेखकpriya_dयांनी शुक्रवार, 03/09/2010 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार!
मि मिपावर नवीनच सभासद झाले आहे. येत्या गणेशोत्सवात म्हण्ण्यासाठी (माझ्या ८ वर्षाच्या मुलाला) काही सोपे श्लोक किंवा छोटी गाणी इ. हवे आहे. कोणी मदत करु शकेल का ? लिरिक्स सुध्दा चालेल.
प्रिया
अपणी तो जैसे तैसे
थोडीऐसे या वैसे
कट जायेगी
आपका क्या होगा जनाबे आली
हे गाणे सोपे पण आहे आणि त्याला आवडेल पण गायला. :)
श्लोक म्हणायला त्याला आवडणार पन नाही आणि ते सोपे पण नसतात.
रामदासस्वामींनी बाकी मनाच्या श्लोकांत भुजंगप्रयात छान पाळला.
पण इथे रघु ठेवले ? रघू हवे ना ? पण मग रघु + उनायका होते.
इथेच रामदास स्वामींचे रामदास झालेत, असे माझे मत आहे.
कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा
सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान
दिग्दशर्क म्हणाला, व्वा व्वा !
ससा म्हणाला, चहा हवा
कोणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला, छान छान !
ससा म्हणाला, काढ पान
कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे आणि घडघड वाचले धडे
गुरुजी म्हणाले, शाबास !
ससा म्हणाला, करा पास
पण ऑलटाईम हिट मध्ये....
बाबा लगीन
कोंबडी
अरे दिवानो मुझे पहचानो
ब्राझिल
विठ्ठ्ला कोणता झेंडा
ही गाणि/श्लोक प्रसिध्द आहेत.
अजुन एक दादा महाराजाचे वर ढगाला लागली कळ पाणी...मस्तच आहे.
हे 'डॉल्बी' नक्की काय प्रकरण आहे? म्हणजे Dolby AC3, Dolby Digital, Dolby E वगैरे सगळे ठाऊक आहे, पण पब्लिक कार्यक्रमात ते नक्की काय वापरतात, व कसे? (हा उल्लेख ह्याच संदर्भात दुसर्यांदा मिपावर गेल्या दोन दिवसात वाचतोय, म्हणून कुतुहूल म्हणून विचारतोय).
ज्ञानेश्वरीतील मंगलाचरण म्हट्ल्यास समयोचित होईल.
ॐ नमो जी आद्या I वेद प्रतिपाद्या I जय जय स्वसंवेद्या I आत्मरुपा II
देवा तूचि गणेशु I सकलमतिप्रकाशु I म्हणे निव्रुत्तिदासु Iअवधारिजो जी II
हे शब्दब्रह्म अशेषI तेचि मूर्ती सुवेष I जेथ वर्णवपु निर्दोष I मिरवत असे II
अकार चरण युगुल I उकार उदर विशाल I मकार महामंडळ I मस्तकाकारें II
हे तिन्ही एकवटले I तेथ शब्दब्रह्म कवळले I तें मियां गुरुकृपा नमिलेI आदिबीज II
आता अभिनव वाग्विलासिनी I जे चातुर्यार्थ कलाकामिनी I ते शारदा विश्वमोहिनी I
नमस्कारिली मियां II
लता मंगेशकरांची सीडी मिळ्ते.
श्लोक, स्तोत्र हवे असल्यास भीमरुपी, रामरक्षा यापासुन सुरवात करा. वल्लभाचार्यांचे मधुराष्टक मस्त आहे, लहान मुलांना आवडते. उच्चार चांगले असल्यास चर्पट्पंजरिका पण चालु शकेल.
आताच ह्या वयात एकदम गीता शिकवल्यास बुद्धीला जड झाल्याने कुर्हाडीचा दांडा गोतास काळ होउन मोठेपणी हिंदूविरोधी होऊ शकतो. स्वतः त्याला समजुन घ्यायची इच्छा होईल तेव्हाच वाचु द्या. :)
गाणी हवी असल्यास खूप बालगीते आहेत त्यातले निवडा !
संस्कृतचा गोडवा अवीट आहे असे आमचे परममित्र तात्या एके ठिकाणी म्हटले होते. (संदर्भ हाताशी नाही सापडला की देतो). अर्थात त्यांनी म्हटले नसते तरीही सत्य बदलत नाही.
संस्कृत अवघड आहे असे ज्यांना वाटते त्यांनी "प्रयत्न करुन बघा ! झालाच तर फायदाच होईल !! "
क्या बात है !
होळी शिकवते आपल्यातले दुर्गुण जाळुन टाका
गटारी शिकवते अतिरेक करु नये. प्रायश्चितरुपी श्रावणात संयम पाळावा
दिवाळी शिकवते दिव्याचे महत्व. कुटुंबीयांनी एकत्र जमुन आनंद साजरा करावा.
वा ! थत्तेंची निवड अगदी सुयोग्य असुन प्रत्येकाला मार्गदर्शक अशीच आहे.
जियो थत्ते ! जियो !!
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे
अपराध माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा तू , घाल पोटी
-----------------------------------------------------------
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा , माता जाकी पार्वती पिता महादेवा.
एकदंत दयावंत चार भुजाधारी,
माथे पे तिलक सोहे , मूस की सवारी
पान चढे फूल चढे और चढे मेवा
लडूवन का भोग लगे , संत करे सेवा
जय गणेश जय गणेश देवा , माता जाकी पार्वती पिता महादेवा.
अंधन को आख देत , कोढीन को काया
बांझन को पुत्र देत , निर्धन को माया
सूर्य शाम शरण आये , सफल कीजे सेवा
सूर्य शाम शरण आये , सफल कीजे सेवा
जय गणेश जय गणेश देवा , माता जाकी पार्वती पिता महादेवा.
इथे चाल ऐकत येइल - http://www.lyricsmasti.com/song/6404/get_lyrics_of_Jai-Ganesh-Jai-Ganes…
अलन्कापुरी पुण्यभुमी पवित्र,
तेथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र,
तया आठविता महापुण्य राशी
नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी
लिहिताना स्वत:शी गुणगुणून बघितले, तर नीट लिहायला मदत होईल.
उदा. असे म्हणून बघा.
अलङकापुरी पुण्यभूमी पवित्र, (क च्या आधी ङ येतो, न नाही. भू, भु नाही.)
तेथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र,
तया आठवीता महापुण्य राशी (पुन्हा तेच.)
नमस्कार माझा तया ज्ञानबाशी (सहा सात मात्रा जास्त होतायत)
ज्ञानियांच्या राजाचा उल्लेख करताय राव! काही नियम तरी पाळा.
सही बदला चा अर्थ उत्तम सूड असा नसून तुमची स्वाक्षरी बदलून टाका असा आहे.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारची मीटरे ठोकाठोक करून दुरुस्त करून मिळतील.)
अशी हवी.
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
एवढ्या मोठ्या संख्येत, विविध प्रकारचे प्रतिसाद मिळतील असे वाटले नव्हते. माझा मुलगा 'देवा तुझे किती सुंदर आकाश' हे गाणे आणि मारूती स्तोत्र म्हणणार आहे.
सर्व्वांनी वेळ काढून दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल पुन्हा एकदा धन्यवाद.
प्रिया
प्रतिक्रिया
सोपे
हे गाणं नवं का जुनं?
In reply to सोपे by नितिन थत्ते
कोणतंही
In reply to हे गाणं नवं का जुनं? by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत
In reply to कोणतंही by नितिन थत्ते
शुभंकरोती म्हणायला शिकवा.
येत्या गणेशोत्सवात
घु ह्रस्व ?
In reply to येत्या गणेशोत्सवात by विसोबा खेचर
माझे आवडते गाणे,
हे गाणे म्हणतांना....
In reply to माझे आवडते गाणे, by ज्ञानोबाचे पैजार
ह्यावेळी डॉल्बीवर काय फेमस आहे ते माहित नाही.
अवांतरः डॉल्बी
In reply to ह्यावेळी डॉल्बीवर काय फेमस आहे ते माहित नाही. by वेताळ
भगवद्गीता शिकवा. का ते
सध्या "मुन्नी बदनाम हुई" हि
ज्ञानेश्वरीतील मंगलाचरण
मध्यंतरी यू ट्युबवर बाप्पाची
पसायदान
श्लोक, स्तोत्र हवे असल्यास
आताच ह्या वयात एकदम गीता
In reply to श्लोक, स्तोत्र हवे असल्यास by अवलिया
इथे मुलांची मराठी बोलायची
In reply to श्लोक, स्तोत्र हवे असल्यास by अवलिया
संस्कृतचा गोडवा अवीट आहे असे
In reply to इथे मुलांची मराठी बोलायची by नगरीनिरंजन
मराठी शिका नाहीतर संस्कृत
In reply to संस्कृतचा गोडवा अवीट आहे असे by अवलिया
सुसंस्कृत होणे यात संस्कार
In reply to मराठी शिका नाहीतर संस्कृत by परिकथेतील राजकुमार
+१ सहमत
In reply to सुसंस्कृत होणे यात संस्कार by अवलिया
सण
In reply to +१ सहमत by वेताळ
क्या बात है ! होळी शिकवते
In reply to सण by नितिन थत्ते
व्ह- साठी फ- करणे
In reply to क्या बात है ! होळी शिकवते by अवलिया
मोरया मोरया मी बाळ
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...
स्तोत्र
श्लोक
सुधारणा, म्हणून बघा
In reply to श्लोक by कुक
सही बदला
In reply to सुधारणा, म्हणून बघा by मिसळभोक्ता
किंचित बदल
In reply to सही बदला by राजेश घासकडवी
स्मार्ट मीटर
In reply to किंचित बदल by चतुरंग
गणेशोत्सवासाठी ना!
सर्वांना मनःपूर्वक