एकदम झकास लेखन आणि एका सुंदर लेखमालेचा तितकाच हृद्य आणि सुंदर शेवट!
तुमच्या भाषेत सहजता आहे, शब्दात आपलेपणा आहे, वर्णनात वाचकाला बरोबर नेण्याचं सामर्थ्य आहे! जियो!!
(ही लेखमाला संपली आहे हे सत्य मी स्वीकारतो आहे परंतु असेच उत्तमोत्तम लेखन येत राहू दे अशी तुम्हाला विनंती आहे ती नजरेआड करु नका.)
चतुरंग
शेवटच्या काही भागात काही फोटो चढवता आले तर बघा.
चांगली माहीती, थोडीशी पर्यटनविषय जसे, कुठून कुठल्या विमानसेवा, पर्यटनाला अनुकूल महीने / मोसम, बघण्यालायक काही जागा, करन्सी, थोडा खर्चाचा अंदाज दिलात तर हौशी लोक टांझानियाला जायचा विचार करु शकतील. :-)
या देशात जे काही पाहिलं ते 'माझ्या' नजरेतुन ना.. माझ्याच चष्म्यातुन... मग हे प्रवासवर्णन नाहीच की.. हे तर माझ्या त्यावेळच्या दृष्टीकोनाचं वर्णन.. अथवा माझ्या त्या क्षणांच्या अंतरंगाचं प्रतिबिंब म्हणा ना...
पु लं नी त्यांच्या प्रवासवर्णनात अश्याच आशयाचे वाक्य लिहील आहे. शेवटी हे प्रवासवर्णन आहे. तुमच्या प्रवासाचे वर्णन. एखाद्या ट्रेवल कंपनीचे जाहिरजापत्रक नाही. त्यामुळे जे लिहिले आहे आणि ज्या प्रकारे लिहिले आहे ते योग्यच आहे.
बाकी लेखमाला खुपच गोड होती. अगदी टांझानियातल्या गुज्जुभैयासारखी. वर्णन खुपच सुंदर. शेवट एकदम भावुक. आवडले मला.
पुल म्हणतात "हे प्रवासवर्णन नव्हे तर प्रवासातल्या माझं वर्णन आहे!"..
बाकी संपूर्ण लेखमाला ओघवती आणि चित्रदर्शी शैलीत आहे.. अजून वेगवेगळ्या विषयांवर लिहित रहा आम्ही वाचत आहोतच.
तूर्तास या लेखमालेबद्दल असांते! :)
लेखमालेची जितकी उत्कंठावर्धक सुरवात तितकाच हृद्य आणि भावस्पर्शी शेवट.
अर्धवटराव अगदी अप्रतिम लेखन करता आपण. पुढच्या लेखाची/लेखमालेची वाट पाहतोय.
अर्थात तुम्हाला लेखन आवडलं याचं खरं श्रेय त्या वर्ण्यविषयाला, त्या वास्तवाला, तिथल्या माणसांना. ते वास्तव इतकं मोहक होतं, इतकं सच्चं होतं की माझ्यासारख्याच्या लेखनाचीही तुम्ही प्रशंसाच केलीत.
थोडा वेळ हे आपण गृहीत धरु.(मला तरी तसं वाटत नाही.मला वाटतं प्रशंसा जी होतेय ती तुमच्या लिहिण्याची जी शैली आहे त्यामुळे. ओघवत्या भाषेमुळे प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा रहातो.)
जाऊ द्या कारण काहीही असले तरी लेखमाला आणि लेखक दोन्हीही प्रशंसेस पात्र (विचार करुनही योग्य शब्द सापडला नाही)आहेत असे मला वाटते.
माझा सहभाग एवढाच की मी ते सगळं माझ्या तोकड्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवलं.
धन्यवाद.
बर बर...
अवांतरः जर तुमची भाषा तोकडी आहे तर जरा माझा लेख (त्यातील भाषा) कोणत्या प्रकारची आहे हे जाणुन घ्यायला उत्सुक ?
(जिज्ञासु ) विलासराव.
मस्त झालाय हा भाग सुद्धा.
तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे हे प्रवासवर्णन नाही म्हणूनच हे आफ्रिकन वर्णन जे तुम्ही केलंय तुमच्या अनुभवातून, दृष्टीकोनातून ते वाचून आनंद झाला. एखाद्या देशाची खरी ओळख ही ४- ६ दिवस टूरीस्ट म्हणून फिरल्याने होत नाही तर ती तिथे काही काळ राहून, समाजात मिसळून च होते. अशी ओळख करून घ्यायला, समजून घ्यायला मला जास्त आवडते . तुमच्या मुळे आफ्रिकेतील एका देशाची छान पैकी ओळख झाल्यामुळे धन्यवाद :)
दिवस म्हणजे काही कॅलेंडरवरचे ३० चौकोन नव्हेत, मोजता येणारे.. रोजची नवी पहाट, संपुर्ण जगलेला दिवस आणि स्मरणात रमलेली रात्र म्हणजे तो एक चौकोन... त्या कॅलेंडरवर जरी सुट्टीचे चौकोन लाल आणि बाकिचे काळे रंगवले तरी वास्तवात कोणता लाल आणि कोणता काळा हे आधी थोडंच सांगता येतं.. कधि उत्तुंग निळा.. कधी धुक्यातला पांढरा.. कधी अश्रुंचा काळा.. कधी लाजलेला गुलाबी.. असं सुंदर कॅलेंडर प्रत्येक क्षणी जगतच असतो आपण... >>>
संपुर्ण लेखमाला झकास झाली आहे >>
बाकी अर्ध्या लेका काही फोटोज का नाही टाकले ? या करता तुला पुण्यात आल्यावर काफी का देऊ नये ?
>>आणि २५-३० दिवस म्हणजे काही कॅलेंडरवरचे ३० चौकोन नव्हेत, मोजता येणारे.. रोजची नवी पहाट, संपुर्ण जगलेला दिवस आणि स्मरणात रमलेली रात्र म्हणजे तो एक चौकोन... त्या कॅलेंडरवर जरी सुट्टीचे चौकोन लाल आणि बाकिचे काळे रंगवले तरी वास्तवात कोणता लाल आणि कोणता काळा हे आधी थोडंच सांगता येतं.. कधि उत्तुंग निळा.. कधी धुक्यातला पांढरा.. कधी अश्रुंचा काळा.. कधी लाजलेला गुलाबी.. असं सुंदर कॅलेंडर प्रत्येक क्षणी जगतच असतो आपण...
हे जास्त आवडलं, असांते :)
तुमची लेखमाला वाचून खूप बरं वाटलं. 'काफी' मजा आया :) लेखमालेची सुरूवात दणक्यात झाली (मला अजून तो छत्रपती शिवाजी ची पाटी घेतलेला गडी आठवतोय...आणि हसू आवरत नाही.) समारोपही छान जमला.
त्या नाचाचा जर व्हिडिओ सापडला तर अमृताहून गोड होईल.
असंच लिहीत रहा. त्यासाठी तुम्हाला म्यागीवर महिनाभर राहावं लागलं तरी बेहेत्तर. :)
खरंच हे जग वेगळ होतं का?..का मला ते भासलं वेगळं?.. नविन ठिकाणे नक्की काय बदलतं तेच कळत नाहिये... केवळ जागा बदलते म्हणजे मी बदलतो का? राग, आनंद दु:ख घरी असताना जितक्या वेळेला वाटतं तितक्याच वेळेला इथंही वाटलंच की... एकटेपणाचे चार क्षण जास्त आले असतील कदाचित पण तसा तो एकटेपणा माझ्या बरोबरच चालतोय की लहानपणापासुन.
--->अगदी अगदी शब्दा शब्दाशी सहमत !! :-)
'खरी अफ्रिका', 'खरा भारत' असं नसतंच मुळी काही... आपलं अंतरंग जेवढं सजग, समृद्ध, तेवढंच बाहेरचं जगही रंगीबेरंगी..
--->>> तुमची लेखमाला वाचताना पदोपदी हे जाणवलं....
आणि २५-३० दिवस म्हणजे काही कॅलेंडरवरचे ३० चौकोन नव्हेत, मोजता येणारे.. रोजची नवी पहाट, संपुर्ण जगलेला दिवस आणि स्मरणात रमलेली रात्र म्हणजे तो एक चौकोन... त्या कॅलेंडरवर जरी सुट्टीचे चौकोन लाल आणि बाकिचे काळे रंगवले तरी वास्तवात कोणता लाल आणि कोणता काळा हे आधी थोडंच सांगता येतं.. कधि उत्तुंग निळा.. कधी धुक्यातला पांढरा.. कधी अश्रुंचा काळा.. कधी लाजलेला गुलाबी.. असं सुंदर कॅलेंडर प्रत्येक क्षणी जगतच असतो आपण...
--->>>>>>क्या बात है !!
आपण अनुभवलेली प्रत्येकच गोष्ट अशी शब्द्बद्ध करताच येत नाही ..
रंगीबेरंगी आहे हे जग. आपण कोणत्या नजरेने (कुठल्या चश्म्याने खरं तर!) हे सारं पाहतोये हाच काय तो फरक.आपण नेमकं उत्तम शब्दात ते सारं ह्याठीकाणी मांडू शकलात त्याबद्दल अभिनंदन!! :-)
आणी असांते !!!!
:-)
छत्रपती !
तुमचे लेखन खुप मनापासुन वाचले खुप आवडले.
शेवटच्या लेखातुन भावनिकतेची ही चोटी लकेर दिसुन आली.
शेवटी खुप छान लिहिले आहेच, पण थोडे अजुन लिहिने बाकी राहिले आहे असे उगाच मनाला वाटते आहे.
कदाचीत आजुन वाचायला मिळावे असे मन म्हणत आहे.
असो
भेटु पुन्हा ..
- शब्दमेघ
अतिशयच आवडली ही लेखमालिका!! मला वाटते, मला 'माझे खोबार' नंतर इतकी प्रचंड आवडलेली मालिका... सगळ्यात जास्त आवडली ती तुमची लेखनशैली! अतिशय चपखल वाक्यं व उपमांचा वापर करून तुम्ही अगदी प्रथितयश लेखकासारखे लिखाण केलेले आहे, कृपया त्याला कमी लेखू नका.. :)
आता तुम्ही केलेली जी काही भटकंती आहे ती मालिका रूपामध्ये आलीच पाहीजे..
प्रतिक्रिया
क्या बात है अर्धवटराव!!
रंगरावांशी करड्या मजकुरासगट
हेच म्हणतो
सहमत!
छान छान
सुंदर..
अर्धवटराव तुम्चे लेख असेच
या देशात जे काही पाहिलं ते
+१
फारच छान भौ.
लेखमालेची जितकी....
मस्त होते सगळे भाग! तुम्ही
आपले प्रत्येक भाग वाचत आहे
शेवट
आपले प्रत्येक भाग वाचलेत..
मस्त
दिवस म्हणजे काही कॅलेंडरवरचे
अत्यंत सुंदर
सुरेख
>>आणि २५-३० दिवस म्हणजे काही
वा वा वा...
छान
असांते
मस्त मस्त मस्त...!
लेखमाला खूप आवडली.
लेखमाला आवडली रे
खरंच हे जग वेगळ होतं का?..का
शेवट का?
असांते
लेखमालेचा साजेसा शेवट! लेखाचा
संपूर्ण लेखमाला उत्तम ! असे
अतिशयच आवडली ही लेखमालिका!!
लेखमाला खूप आवडली.