छोटेखानी लेखांची मालिका - इथे शब्द संपतात...१
दहीभात..!
इथे शब्द संपातात!
हे भाग्यवंतांचं खाणं, हे भगवंताचं खाणं. दहीभात म्हणजे निव्वळ सुख आणि मन:शांती..!
कधी जेवणाच्या सरतेशेवटी खावा, कधी फुल जेवण म्हणून खावा.. कधी प्रवासात खावा तर कधी लांबच्या प्रवासानंतर थकूनभागून आल्यावर खावा..तर कधी तळतळत्या उन्हात झाडाखाली बसून खावा..!
पोटात गडबड? अजीर्ण? हम्म..
थोडं चवीपुरतं हिंगाष्टक चूर्ण घालून खावा.. :)
दहीभात कधीही खावा..
छानश्या कालवलेल्या दूधभाताला दह्याचं विरजण लावून केलेला दहीभात.. रासायनिक प्रक्रियेचा इतका चांगला आउटपुट जगात इतरत्र पाहायला मिळणार नाही.. :)
एखाद्या लाहनग्याच्या निरागस हास्यात जो गोडवा, तोच गोडवा दहीभाताचा!
'दहीभाताचा अमृतकाला' असं गदिमांनी (चूभूदेघे) कुठेसं म्हटलंय ते खरंच आहे..
मंडळी, आज गोपाळकाला. म्हणूनच या छोटेखानी लेखांच्या मालिकेची सुरवात दहीभाताच्या या अमृतकाल्याचा नैवेद्य दाखवून करत आहे..
वाचकांनीही दहीभाताबद्दल आपल्या भावना व्यक्त कराव्या व या अमृतकाल्याचे अंशत: ऋण फेडावे, ही विनंती..
तात्या.

प्रतिक्रिया
तात्या..हे बोवा झकास झाले
अहाहा. स्वर्गसुख मिळ्ते दहिभात खाउन.
मस्त रे तात्या !!
..विरजत लावलांय
दहिभात
मस्त आठवण करून दिलीत. आजच
मस्त मस्त लेख तात्या
तात्या रॉक्स
वॉव!!!!!!!!!! तोन्डाला पानी
छान आणि समयोचित
मस्तच..
फोटो पाहून
छान
वा वा दहीभात आवडता!
प्रतिसाद देणार्या सर्व
म्हणजे? प्रतिसाद देणारे रसिक