Skip to main content

मोगरा

लेखक शुचि यांनी बुधवार, 01/09/2010 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
हा मोगरा नक्की चोंबडा आहे माझी पक्की खात्री आहे तू जेव्हा कधी स्वप्नात येतोस माझ्याशी गुजगोष्टी करतोस हा मोगरा बहरतो नक्की हा आपल्या गोष्टी ऐकतो चोरून ऐकतो अन मोहरतो लक्षलक्ष चांदणकळ्या मिरवतो अंगोपांगी सौंदर्यानी ऊतू जातो टप्पोर्‍या फुलांनी डवरून धुमसतो सुगंधी निश्वास उसासे टाकतो नक्कीच!! कारण आजकाल हा रोज बहरतो आजकाल मोगरा रोज बहरतो ....!!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3553
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

कविता आवडली. (आस्वादक)बेसनलाडू येथे मोगर्‍याला चोंबडा म्हटलंय ते का हे स्पष्ट झालेले नाही. किंवा कवितेतून जे स्पष्ट होते आहे, त्यावरून मोगर्‍याला चोंबडा म्हणता येणार नाही, असे वाटते. फार फार तर आगाऊ, भोचक अशा अर्थाचे काहीतरी म्हणता आले असते. (छिद्रान्वेषी)बेसनलाडू

अवखळ शब्दरचना पण छान जमलिये!

शुचि यांचं सर्वच लेखन मला अतोनात म्हणजे अतिशय आवडतं. खुपच छान आहे पद्य. चोंबडा कोंबडा

कविता आवडली .