Skip to main content

तुम्ही नियमितपणे कोणते इंग्रजी वर्तमानपत्र वाचता?

लेखक इंटरनेटस्नेही यांनी सोमवार, 30/08/2010 17:57 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 464
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

माझ्या लहानपणापासुन आज पर्यंत आमच्या घरी द टाईम्स ओफ इंडियाच येतो...... वडीलांनकडुन मी ईंग्रजी वर्तमानपत्र वाचावे अशी सक्त ताकीद असुन देखील मी वारंवार टाळायचो. एक दीवस बाबांनी मला जाम फटके दीले, तेंव्हा पासुन मी रोज टाईम्स ओफ इंडियाच वाचतो....

आपले नक्की वय माहित नाही, पण आपल्या काही धाग्यांवरुन अंदाज बांधता ते १८-१९ च्या आसपास असावे असे वाटते. बरेच दिवस आपले लिखाण अतिशय गंमतीने घेत आहे, पण आज राहावले नाही म्हणुन तुम्हाला काही फुकटचे सल्ले देत आहे. मिपावर लोकांच्या डोळ्यात भरण्यासाठी अथवा आपले सदस्यत्व ठसवण्यासाठी रोज उठुन काहीतरी वेडझवे धागे काढायलाच पाहिजेत असा काही नियम नाही. इथे अनेक सदस्य केवळ प्रतिसादरुपी अ‍ॅक्टिव आहेत आणि त्यांचे अभ्यासु प्रतिसाद हे एखादा लेख वाचावा येवढ्या तन्मयतेने आणि आदराने सदस्यांकडून वाचले जातात. तेंव्हा तुम्हाला अतिशय नम्र विनंती आहे की मुक्तपणा आणि स्वैरपणा ह्यातला फरक लक्षात घेउन हे असले अतिशय फालतु आणि तद्दन रटाळ लेखन / काकु आपण थांबवावेत. अर्थात निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य तुम्हाल आहेच.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वेल सेड पराजी. धमाल मुलाने खरडी करुन रेकॉर्ड केला. त्यांच्यावर लेख लिहिला गेला. त्यामुळे कदाचीत इंप्रे ला वाटत असेल की पुढेमागे कौलांचा विषय निघाला की लोक माझंच नाव घेतील. (पण धमाल मुलाचे लेखन तेवढ्या पुरताच मर्यादित नाही के कदाचीत हे महाशय विसरले असावेत.) पांचटपणा चालवला आहे नुसता कधी पासुन. हल्ली लोकांना कश्यामुळे जळजळ होईल सांगता येत नाही.

मी रोज मराठी पेपर वाचतो. पण दिलेल्या पर्यायांत मराठी पेपर एकही नाही. वरच्या पर्यायातला डीएनए रोज घेतो व त्यातली चित्रे पाहतो.. वाचण्याबद्दल सांगता येत नाही. :) (अशिक्षित)