Skip to main content

born insomniac....! झोप हविये झोप....!

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी रविवार, 22/08/2010 02:19 या दिवशी प्रकाशित केले.
झोप नाही येत यार! sometimes i feel like i am born insomniac! बेड मध्ये जाण्याआधी असं वाटतं की आज तरी थोडा वेळ झोप लागेल्,,..पण नाही...सहज चुळबुळ म्हणुन घड्याळ पाहिलं जातं..रात्रीचे २-३० वाजलेले असतात... असं वाटतं कि बराच वेळ गेला...आणि थोड्या वेळानी परत घड्याळ पाहिलं जातं ...२.१४... का होतं आहे असं! बरं दिवसा झोपावं तर कितीही प्रयत्न केला १५ मिनिटांपेक्षा जास्ती झोप लागतही नाही.. म्हणजे मला महिनोन महिने १-३ तास झोप पुरेशी होते आहे? is it so? i need help friends! असा निद्रानाश का होतो? FYI..मी जास्ती विचारात असते/ चिंतेत असते( जाई आणि चिंता?????) मग मी तो वेळ वाचण्यात्/गाणी ऐकण्यात तत्सम आवडते कार्यक्रम करण्यात घालवते.पण तरिही..असं का होतं? याचा विचार त्रास देत राहतो, मित्रांनो, प्लीज मदत करा.. झोप येण्यासाठी काय करावे? प्लीज ...!

वाचने 24218
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

अरे धम्या...पहिल्यांदा रे एअर इंडिया भोगले रे! डायरेक्ट पुणे च्या मोहात.... तुला उद्या फोटो पाठवते....गम्मत म्हणुन

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

ए, आता झाली ना १५ तासांची झोप? मग दुसरा धागा सुरु कर नव्या विषयासाठी!;)

मी आडवा पडलो तर ५ मिनीटात झोप लागते. बसून काही करत राहिलो तर रात्री २-३ वाजे पर्यन्त जागा रहातो. हा झोपेचा प्रोब्लेम म्हणजे काय आहे यार .. ?

In reply to by उपेन्द्र

... हुश्शार मानुस ऐ तुमी.. पण जावे त्यांच्या (म्हणजे आमच्या) वंशा तेव्हा कळे.... गम्मत बाजुला.. खरच सुखी आहात.. तसेच रहा

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

जाईताई, एकदाच गाडी सहकुटुम्ब चालवताना २ सेकन्द झोपलो होतो. आता आठ्वले तरी अन्गावर काटा येतो. अजून सगळे सुखरूप आहोत. तेव्हा पासून झोप alert झाली आहे. असो...

In reply to by उपेन्द्र

अरे देवा!! स्पीड किती होता? ताशी ८० किमी स्पीड असेल तर २ सेकंदात गाडी तब्बल ४५ मीटर गेलेली असते एवढ्या अंतरात काहीही होऊ शकते! खरोखरच नशीबवान आहात म्हणायचे.

शेजारी 'जाग्रुत' बायको होती आणि समोर कोणतीच गाडी नव्हती म्हणून ठीक.. डोळे उघडले तेव्हा गाडी पूर्ण उजव्या हाताला होती. रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या सिमेन्टच्या पोलवरून उड्या मारत तिला जागेवर आणली. पुढचा बम्पर बदलावा लागला. आम्हा कोणाचेही स्पेअर पार्ट बदलावे लागले नाहीत. तेव्हापासून बायको गाडीत झोपायची बन्द झाली. !!!

जाई ताई, झोप न लागणे ही गोष्ट मेंदूशी संबधित आहे. मला झोप लागत नाही अशी मानसिकता आपणच तयार करत असतो आणि आपला मेंदू ह्या गोष्टीचे आज्ञापालन करतो. मला झोप येत नाही असे म्हणण्यापेक्षा, मला खूप गाढ झोप लागते, असे सतत जाणीव ठेवली तर काही दिवसात गाढ झोप येणे सुरु होते. फक्त झोपच नाही, तर आपल्या स्वभावातल्या चांगल्या किंवा वाईट गोष्टीं ह्या मेंदूशी संबधित असतात. म्हणून स्वतःमध्ये चांगले बदल घडवायचे असतील तर अगोदर चांगली मानसिकता तयार करणे गरजेचे आहे.

नाशिकला आरोग्यधाम आश्रमात योगनिद्रेची सिडी मिळते. २ १/२ तासाची आहे. ती ऐकताना हमखास झोप लागते.

कष्टाची कामे करा, जमल्यास झोपण्याआधी ७-८ मजले जिने चढा, ७-८ मजले नसतील तर दोन मजली जिने २-४ वेळा चढ उतर करा, ते ही नसतील तर दोन तास फास्ट चाला. नक्कीच झोप लागेल.

मनापासून हसलो.....2010 चा धागा आणि अजून हि उपाय सुचवतायत