Skip to main content

पुतळे हटवा! इतिहास घडवा !!

लेखक कापूसकोन्ड्या यांनी बुधवार, 25/08/2010 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याचे महापौर माननीय यानी जाहीर केल्याप्रमाणे लाल महालातून अखेर पुतळा हलणार तर! माननीय एका जबाबदार पक्षाचे असल्यामुळे ते दिलेली वाणी खरी करणारच. शेवटी दिलेला शब्द पाळणे महत्वाचे. त्या पुतळ्याचे काय करणार? सन्मानाने विसर्जीत करावा अशी एक सुचना (जर कुणाच्या भावना दुखत नसतील तरच!) --- आणखी काही सूचना. (हे सर्व केल्याने कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची खात्री असावी) १. पुणे आणि इतर महत्वाच्या शहरातील पुतळ्यांची खानेसुमारी करावी आणि एक मोठा मास्टर प्लान बनवून असे भावना दुखवणारे सर्व पुतळे त्वरीत हलवावेत किंवा विसर्जन करावेत (ज.कु.भा.दु. न.त) २.महाराजांचा जयंती उत्सव सुरू झाला तो उल्लेख इतिहासातून काढून टाकावा. ३.पूण्यातील इतिहासा चे पुर्न्लेखन करावे. हे सर्व शक्य आहे. जर 'पलायना ' मुळे शालेय पुस्तके बदलू शकतात तर ही गोष्ट किती महत्वाची असणार? तसे आपण काहीही करू शकतो फक्त राजकीय इच्छाशक्ती असणे. (हा वाद अट्टाहासाने आत्ताच पुढे येण्याचे का 'लवासा' तर नसावे?)

वाचने 27662
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

लवासाचे प्रकरण गाजत असतानाच हे प्रकरण कसे काय सुरु झाले???

आमची तर मागणी आहे की मागचा सगळा इतिहास हा खोटा असुन भारताचा खरा इतिहास हा इ.स. १९२० पासुन सुरु होतो. त्याच्या आधीच्या सर्व खुणा पुसुन टाकल्या पाहिजेत. गो-या इंग्रजांनी काळी माकडे घेवुन त्यांवर प्रयोग करुन काळी माणसे तयार केली ज्यांना लोक भारतीय असं म्हणतात. २०-२५ वर्षे झाल्यावर महात्मा गांधीजींच्या (कानाच्या पाळीला हात) प्रयत्नाने ब्रिटिश इंग्लंडमधुन भारताचा कारभार पाहु लागले. पण काही मुर्ख आणि अर्धवट लोकांना भारताला स्वातंत्र्य मिळाले असे वाटते. अहो पारतंत्र्य नव्हतेच तर स्वातंत्र्य कुठ्ले मिळणार? गप्पा नुसत्या तंमाखु खाउन पचापच थु़कणार्‍यांच्या ! तरी बरे आमच्यासारखे काही विचारवंत त्यांना शहाणे करत आहेत. येईल ! यश येईल प्रयत्नांना !! लवकरच हा खरा इतिहास आम्ही लोकांसमोर आणणार आहोत ... नक्की वाचा "भारतीय इतिहासाची चंदेरी पाने अर्थात भारत एक समृद्ध वसाहत " मागणी नोंदवा .. आज मागणी नोंदवणार्‍यास आमच्या सहीसह पहिल्या आवृत्तीची प्रत बिना पोस्टेज खर्चाची २० टक्के सवलतीत.

In reply to by अवलिया

अवलियांच्या सपुर्ण प्रतिसादाशी सहमत. हे पुस्तक बाजारात यावे हीच इच्छा !!! सदर पुस्तकास आम्ही "प्रस्तावना" लिहु असे कबुल करतो, "लोकशाही म्हणजे काय?" ह्यावर आमची आणि नानाची एकदा चर्चा झाली होती, त्याचाही ह्या पुस्तकात उल्लेख येईल अशी अपेक्षा. आणि हो, प्रकाशानपुर्व मागणी नोंदवत आहे. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

"ब्राह्माण - जगण्याची एक समृद्ध अडगळ" असा उपसंहार वाटल्यास आम्ही पण लिहु. तेवढे आमचे पण नाव समितीत टाका की.

In reply to by छोटा डॉन

सदर पुस्तकास आम्ही "प्रस्तावना" लिहु असे कबुल करतो,
सदर पुस्तक प्रस्तावनेशिवाय बाजारात येईल असं सरळच लिहा की! असो. डान्राव किंवा बिकांची प्रत घेऊन वाचेन मी!

In reply to by अवलिया

अवलियाजी, आपल्या उपक्रमासही आमचा पाठिंबा आहे. चला तुम्हालाही एक ओसरी दिळी शनिवारवाड्याची. किंवा झालंच तर तो पुतळा काढून झाला की ती रिकामी जागा आहे तिथं राहुटी बांधून देऊ. तिथे तुमची साधना चालूदे. पाहीजेच तर सरकारातून शिधा आणि सोवळ्यात स्वैकाक करणारा आचारी देऊ. उदंड साहित्य निर्मीती करा.

सदा सर्वकाळी एतद्देशियांनी एकमेकांचे उणे दुणे काढुन, पाय ओढुन आत्मघात करुन घेतला... स्वातंत्र्यप्राप्ती नंतर अवघा हिंदुस्तान (आणि हिंदु विशेषकरुन) एक होइल/व्हावा अशी आशा स्वा. सावरकरांसारख्याना वाटली. पण हि हजारो वर्षाची सवय आहे हो. हे वाकडे शेपुट सरळ होणे नाहि. पण शिव-समर्थ भक्त या प्रसंगाला पुरुन उरतील. तयारीला लागा. (दुरुन मजा पाहणारा) अर्धवटराव

वसुंधरा माझा ग्रह आहे. सारे वसुंधरा वासी माझे बंधू भगिनी आहेत, माझ्या वसुंधरेवर माझे प्रेम आहे. माझी वसुंधरा महान. माझ्या वसुंधरेशी एकनिष्ठ राहण्याची पात्रता (लायकी) माझ्यात यावी म्हणून मी नेहमी प्रयत्नशील राहील.

पण जेम्स लेन आणि एका विकृत विनोदाची पार्श्वभूमी या वादाला आहे , म्हणून तो पुतळा याला खतपाणी घालतोय असा बर्याच लोकांच मत आहे . दादोजीन चा पुतळा तेथून काढू नयेच, पण ते शिल्प अधिक widescope करावा आणि त्यात शहाजीराजे, कान्होजी जेधे, बाजी पासलकर यांचीही शिल्पे अंतर्भूत करावीत , म्हणजे आपोआपच दोन्ही बाजूंचे वाद शमतील आणि तोडगा निघेल ! यावर तुमचे मत काय आहे !

In reply to by मालोजीराव

घ्या. उद्या दुसरा कोणी जेम्स लेन त्यातुनही काही विकृत विनोद निर्माण करणार नाही किंवा कुठली राजाराम ब्रिगेड काही धुमाकुळ घालणार नाही याची काही खात्री आहे का?

In reply to by मृत्युन्जय

विकृत विनोद तयार करणारी माणसे पण आपलीच आणि जेम्स लेन ला माहिती पुरवणारी पण मनसे आपलीच ! हि विकृती पसरण्याच्या आतच थोपवायला हवी ! शेवटी इतिहास हा भुतकाळ असला तरी तोच भविष्य घडवतो ..! पेशवाईत कोणीही उठसुठ बखरी लिहिल्या आहेत आणि त्यावर प्रकाश टाकणे गरजेचे सुद्धा आहे असा इतिहास संशोधक आणि सरकारचाही मत आहे ! हा आपलाच इतिहास आहे , त्याला आपण नाही जपायचा तर कोणी जपायचा , सो पुढे काय होईल यावर चर्चा करण्यापेक्षा आताच्या वादावर तोडगा काढायला हवा कि नाही (दोन स्पेसिफिक जातींचा वाद बाजूला ठेवून :) )

In reply to by मालोजीराव

१. हा ही उपाय चांगला आहे. मूळात दादोजी कोंडदेव शिवाजीमहाराजांचे शिक्षक होते, रामदास आणि शिवाजी यांच्यातही दृढ संबंध होते असं मानणारा मोठा समुदाय महाराष्ट्रात आहे. याची जाणीव ठेवायला हवी. २. या लोकांची जी काही संशोधनं आहे ती बहुतेक समाज मानणारच नाही म्हणून म्हणून हा दंडेलशाहीचा मार्ग अवलंबला जात आहे. दोनशे लोक रस्ता अडवून बसणार आणि म्हणणार हे काढा आणि ते पाडा हे सगळ्यात वाईट आहे. २०० लोक म्हणजे काही संपूर्ण समाज नव्हे. जर शिवगुरु दादोजींचा पुतळा काढल्याने सर्वच प्रश्न सुटणार असतील चालण्यासारखे पण ते होणार नाही. तसे होणार असेल तर मी तर म्हणेन पुण्यातले सगळेच पुतळे काढून टाका अगदी सावरकरांपासून सणसापर्यंत सगळ्यांचे. पण ते होणार नाही. लवासासारख्या मुद्यांवरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी चाललेला हा सारा खटाटोप आहे. कारण त्या तथाकथित आंदोलनात सहभागी असलेले लोक एकाच भागातून आणलेले वाटत होते. (आणि तसे वेष पुण्यात तरी कोणी येवढ्या मोठ्या प्रमाणात वापरत नाहीत. ते पुण्याबाहेरचे शेतकरी लोक असावेत. एकतर त्यांना फसवून आणले किंवा पैसे देऊन आणले). त्यामुळे ते २०० लोक म्हणजे समाज नव्हे. ३. पुण्यात असलेल्या पुतळ्याचं काय करायचं हे पुण्यातले लोक ठरवतील त्यावर बाहेरच्या कोणी काही दबाव आणण्याचे कारण नाही. अन्यथा हे आज पुतळा पाडणारे लोक उद्या शनिवार वाडा पाडायला निघतील.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

लवासासारख्या मुद्यांवरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी चाललेला हा सारा खटाटोप आहे.
सहमत आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

हे माहिती असेल तर "साप भी मरें और लाठी भी ना टूटे" (Disclaimer: हा साप हा मनुष्यरुपी असुन याचे काम स्वार्थासाठी समाजातल्या काही मनुष्यरुपी गुंड उंदरांना सोबत घेवुन भ्रष्टाचाराचे विष पसरविणे आहे. बाकी आम्हांस ख-या सर्पांविषयी आदर आहे.) असं काही करता येईल काय? पुतळ्याच्या राजकारणावर चर्चा करणे म्हणजे त्यांच्या विषारी रोपट्याला खतपाणी घालण्यासारखे आहे. सुशिक्षीत शहाण्या ब्राम्हण-मराठ्यांनी वेळीच सावध होवुन आपापसात न लढता यावेळी समाजकंटकांना धडा शिकवणे गरजेचे आहे. [चांगले वागणे, चांगले असणे, सुसंकृत असणे हा कुठल्याही जातीचा, धर्माचा, देशाचा मक्ता नाहीये. सर्व जातीत, धर्मात, देशात चांगली माणसे आहेत, नीचसुद्धा आहेत. गुणाला गुण म्हणताना मन मोठे करायला हवे. दोषाला दोष देतानाही हिंमत दाखवायला हवी! 'जातीसाठी माती खावी' या म्हणीसारखा आपल्या जातीच्या लोकांचा वाईटपणा झाकून ठेवण्याचा दांभीकपणा आणि हिनपणा कुठेही नसेल.] जगन्नाथ कुंटे यांच्या नर्मदे हर हर मधुन.

In reply to by बेभान

सुशिक्षीत शहाण्या ब्राम्हण-मराठ्यांनी वेळीच सावध होवुन आपापसात न लढता यावेळी समाजकंटकांना धडा शिकवणे गरजेचे आहे.
विचारांना विचारांनीच मारल पाहिजे ! जर काही चुकीचा असेल तर सरकार इतिहास संशोधकांची समिती नेमून निर्णय घेईलच !

"रामदास आणि शिवाजी यांच्यातही दृढ संबंध होते असं मानणारा मोठा समुदाय महाराष्ट्रात आहे." सुमारे ८० प्रतिसादामधील सर्वात शहाणपणाचा (आणि समंजसपणाचा) श्री.पु.पे. यांचा हा प्रतिसाद. मागील जनगणनेत महाराष्ट्राची लोकसंख्या ९ कोटी ६८ लाख नोंदविली गेली आणि समाजनिहाय एक निष्कर्ष असा निघाला की, या जवळपास दहा कोटीच्या लोकसंख्येत "मराठा (आणि कुणबी)" समाज ४० टक्के आहे. याचाच अर्थ अदमासे पावणेचार कोटी मराठ्यांपैकी "पुतळे काढा, फोडा, इतिहास जाळा, ग्रंथभांडारांचा विध्वंस करा" आदी नाझी परंपरा चालविण्याची खुमखुमी असणारे पाऊणहजार वेगळे केले तर बाकीचे ९९% पेक्षा जास्त मराठे "रामदास आणि दादाजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते, दैवत होते" हेच मानतात. मुंबई-पुणे वगळता अगदी कालपर्यंत लेनलागण राज्याच्या बाकीच्या ३५ जिल्ह्यांना शिवलीदेखील नव्हती. पण जातीचे कावेबाज राजकारण करण्याचे विलक्षण कसब असलेल्या मुरब्बींना महाराजांविषयी बेगडी प्रेम दाखवायला एक आयते कोलित मिळाले (ज्याला टीआरपीची खाज असलेल्या वाहिन्यांनी सुफला खत घातले), आणि त्याचे परिणाम काय होत आहेत हे आपण पाहतच आहोत. मिपावर या विषयांवर वारंवार चर्चा होत आहेत. धागे आणखीनही निघतील आणि वाभाडे काढणारेही बाह्या सरसावून आपली मराठी भाषा धारदार करीत राहतील. तेव्हा विनंती एकच की, संभाजी ब्रिगेड वा त्या प्रणालीचे समर्थन करणारे म्हणजेच "समस्त मराठा समाज" अशी गृहितके कृपया मांडू नका. शिवाजी महाराजांना मानणारा जसा ब्राह्मणवृंद आहे तसाच सावरकरांना मानणाराही मराठा वर्ग आहेच आहे. इन्द्र पवार

In reply to by इन्द्र्राज पवार

इन्द्र पवार यांच्याशी सहमत !
|संभाजी ब्रिगेड वा त्या प्रणालीचे समर्थन करणारे म्हणजेच "समस्त मराठा समाज" अशी गृहितके कृपया मांडू नका
कोळसे पाटील यांसारख्या माणसाने ज्यांनी enron , daw , लवासा सारख्या जिव्हाळ्याच्या आणि लोकहिताच्या प्रश्नामध्ये शांततेनी लढा दिला त्यांनी तोड फोडी ची भाषा करणं पटलं नाही. यातून काहीच सध्या होणार नाही उलट राज- युपी बिहारीन सारखे संबंध ब्राम्हण- ब्राम्हणेतर यांचे होतील.

In reply to by इन्द्र्राज पवार

पवार साहेबांशी एकदम सहमत. मला फक्त कळत नाही आहे हे ९९ % पेक्षा जास्त संख्येने असलेले मराठे काय करत आहेत ? त्यांना या नतद्रष्टांना आवरायला कितीसा वेळ लागणार ? का करत नाहीत ते तसे ? खोटे लाख वेळा संगितले की पुढच्या पिढीला तेच खरे वाटू लागेल. तो पर्यंत फार उशीर झालेला असेल. हिच काळजी आहे. www.jayantpune.wordpress.com

In reply to by जयंत कुलकर्णी

"मला फक्त कळत नाही आहे हे ९९ % पेक्षा जास्त संख्येने असलेले मराठे काय करत आहेत ?" श्री.जयंतराव, सहमतीबद्दल धन्यवाद. आता या तुमच्या वरील प्रश्नासाठी माझी (उत्तर नसले तरी) भूमिका अशी राहिली आहे की कोणत्याही समस्येकडे (भले ती राजकारणाशी संलग्न असो वा समाजकारणाशी) पाहताना माझ्यासारखी व्यक्ती ती घटनात्मक मर्यादांच्या बाहेर गेलेली नाही हे प्रथम पाहणे, यास प्राधान्य देते. संभाजी वा जिजाऊ ब्रिगेडच्या दृष्टीने हा कचखाऊ धोरणाचा भाग झाला, त्यांच्या या मताचे परिवर्तन त्यांच्या भाषेत वा कृतीत मी करू शकणार नाही कारण परत तेच...मी घटनेचे पावित्र्य मानतो. याच चौकटीत राहून रचनेचे कोन सांभाळण्यासाठी मला (व माझ्या विचारांशी सहमत असलेल्या अनेकाना) कोणते पाऊल उचलणे शक्य आहे याचा लेखाजोखा केल्यानंतर मी "ब्रिगेडची भूमिका किती चुकीची आहे" याबद्दल अगदी ज्ञानेश महाराव, अ.ह.साळुंखे ते पुरुषोत्तम खेडेकर यांच्याशी त्या त्या वेळी पत्रव्यवहार केला आहे. श्री.साळुंखे यांचे कोल्हापुरात ज्या ज्या वेळी व्याख्यानानिमित्ताने आगमन होते त्या त्या वेळी नेमस्त मार्गानेदेखील जटील प्रश्नांची उकल काढता येते का याबाबत सविस्तर चर्चा केल्या आहेत (अगदी ब्रिगेड सदस्यांच्या गराड्यात). असे जरी असले तर तुम्ही जाणू शकता की तुमच्यासारखी एखादी सरळमार्गी अभ्यासू व्यक्ती अशा चर्चेत कधीही "हमरीतुमरी" वर येऊ शकत नाही, किंबहुना तो तुमचा उद्देश कदापिही असू शकत नाही. निष्कर्षाप्रत जरी चर्चा आली नाही तरी अनेक "मराठ्यांचे" मी प्रतिनिधीत्व करीत होतो हे श्री.साळुंखेसारख्या नेत्यांना पटले तरी मी बरेच कमावले असे मानेन. वरील अनेक प्रतिसादात "शरद पवार" यांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष उल्लेख आला आहे. त्यांची भूमिका ही (कोणत्याही विषयावर) कायमपणे एका राजकीय पुढार्‍याच्या प्रतिमेशी सुसंगत राहिली आहे पण म्हणून शरदराव समस्त "मराठा लॉबी" ची प्रतिमा आहे असे मानणे म्हणजे स्वतःचीच फसगत केल्यासारखे आहे. मी स्वतः "पवार" असूनही गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्यात पुढाकार घेतला होता कारण स्थानिक कॉन्ग्रेसच्या नेत्यांनी तथाकथीत "राजघराण्या"चे चालविलेले कोडकौतुक. आमचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. पण पुढे याच शिवसेना आमदाराने बेळगावच्या कन्न्ड वेदिकेच्या (सीमा प्रश्नांबाबत कोल्हापुरात चर्चेला आले होते त्यावेळी) दोघा पदाधिकार्‍यांना 'झी स्टुडिओ' मध्ये गुंडशाहीने ठोकले होते त्यावेळी आमदारांचा निषेध करण्यास पुढे मी आणि माझे मित्रच होतो. इतकेच काय पण त्या जखमी कार्यकर्त्यांना स्थानिक दवाखान्यात योग्य ते उपचार होऊन त्यांना सुखरूपपणे बेळगांवी पाठविण्याची दक्षता घेण्यार्‍यांसमवेत होतो. (इथे "दक्षता घेणारे" अनेक मराठेच होते हेदेखील सांगतो.) थोडक्यात हे जे ९९% आहेत ते सनद्शीर मार्गाने जे काही करता येण्यासारखे आहेत ते करीत असतात आणि मला वाटते ते एका सुजाण समाजातील सामंजस्याचे लक्षण आहे. धन्यवाद. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

हे ९९% बद्दल थोडेसे माझे विचार असे आहेत. हे लोक सर्व प्रांतात आणि सर्व समाजात असतात.हे निसर्गदत्त शहाणपण येते कोठून? हा एक मोठ्ठा जगन्नाथाचा रथ आहे. कुणाचे ऐकावे आणि कुणाचे नाही हे त्यांना बरोबर समजते. भारतीय राजकिय व्यवस्थे मध्ये तीच एक समाधानकारक बाब आहे.आणि त्याचा आपणा सर्वाना आभिमान हवा.

In reply to by इन्द्र्राज पवार

इंद्रराज, आपल्या समंजस भुमिकेचे आणि वस्तूनीष्ट विचारांचे कौतूक मी पूर्वीही जाहीरपणे केलेले आहेच. ते परत एकदा करतो. आपण जर घटनेचा विचार केला तर आपल्याला लोकशाहीवर विश्वास ठेवावा लागेल. जर लोकशाहीवर विश्वास ठेवला तर आपण निवडून दिलेले लोकप्रतिनीधी आपले प्रतिनिधीत्व करतात यावरही विश्वास ठेवावा लागेल. म्हणजे हे लोकप्रतिनिधी जे निर्णय घेतात ते आपणच निर्णय घेतला असे मानले पाहिजे. हे जर खरे असेल तर शालेय पुस्तकातील दादाजी कोंडदेवांचा उल्लेख व त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जर आपल्या लोकप्रतिनिधींनी रद्द केला तर काय समजायचे ? त्यावेळी किती लोकांनी यांचा विरोध केला ? (सत्तेतल्या ) कोणीही नाही. नाहीतर हा निर्णय झालाच नसता. मग बहुसंख्य जनतेचा याला पाठिंबा होता असेच म्हणावे लागेल. याचाच अर्थ हे वीष जनतेच्या मनात कालवण्यात हे नालायक यशस्वी झाले आहेत. मला हीच काळजी आहे. मला वाटते मला काय म्हणायचे आहे ते मी सांगू शकलेलो आहे. नसल्यास परत प्रयत्न करेन. माझा राजकारणाचा अभ्यास आपल्या एवढा नाही हे मी आत्ताच मान्य करतो.

In reply to by जयंत कुलकर्णी

कुलकर्णी साहेब मीदेखील इन्द्राज पवारांशी सहमत आहे. माझे बरेच मराठा मित्र आहेत. त्यातील काही तर अगदी जिवाभावाचे आहेत. कोणीच या संभाजी ब्रिगेड सारखे वांझोटे नाहीत. जातीपातीवरुन राजकारण कोणालाच आवडत नाही. पण त्या ब्रिगेडींच्या नादी कोण लागणार? त्यांना(ब्रिगेडींना) काहीच फरक पडत नाही. ? सामान्य माणुस त्यांना समजावयाला गेला तर ते हमरीतुमरी वर येउन मारामारी करु शकतात. सामान्य माणुस पण मारामारी करु शकतो पण त्याला सार्वजनिक जागेत तमाशा नको असतो. समाजात जसे थोडे गुन्हेगार असतातच. आपण त्यांना जाउन समजावयाचा प्रयत्न करतो का? तसेच ९९% मराठा समाज पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच पसंत करत असणार ना?

In reply to by मृत्युन्जय

नमस्कार ! माझे सर्वच मित्र मराठा आहेत. :-) त्यांचे कुठे आणि काय चुकत आहे हे सांगणे मी माझे कर्तव्य समजतो.

In reply to by इन्द्र्राज पवार

पवार साहेब आपल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार मानावेत तेवढे थोडे आहेत.मी कधीच कोणाची जात विचारायला जात नाही पण आपल्याच समाजात लहानाचा मोठा झाल्यामुळे अमुक एक अडनाव म्हणजे अमुक एक जात हे ठोकताळे मला पण कळायची इच्छा नसूनही कळत गेले.तर सांगायचा मुद्दा म्हणजे माझे काही मराठा मित्र आहेत आणि ते विचारी आणि सज्जन असेच आहेत हे वेगळे सांगायला नकोच. संभाजी ब्रिगेड या गुंड संघटनेला जितकी मी नावे ठेवतो तितकीच ते ही ठेवतात.पण अनेक (विशेषत: पुणे २९ आणि ३० यासारख्या भागांमधील) लोकांच्या परिचयात तितक्या प्रमाणात मराठा लोक आले नसतील तर संभाजी ब्रिगेडमुळे त्यांना ’सगळे मराठा संभाजी ब्रिगेड समर्थक’ असेच वाटायचा संभव आहेच ना? यातूनच वातावरण अजून गढूळ व्हायची शक्यता आहे. आधीच जातीपाती, भाषा, पोटजाती आणि इतर अनेक अनंत मुद्द्यांवर आपला समाज विभागला गेलेलाच आहे.त्यात संभाजी ब्रिगेडसारखे महामूर्ख लोक ब्राह्मण विरूध्द मराठा या काल्पनिक वादाला नवीनच तोंड फोडत आहेत. या आणि अशा विविध फाटाफुटींमधूनच भारताच्या शत्रूंचे काम सोपे होणार आहे. त्याला आपल्या प्रतिसादाने आपण उत्तर दिले आहेत.मला वाटते की हाच प्रतिसाद वर्तमानपत्रात प्रसिध्द व्हायला हवा. आपल्या समाजात फाटाफूट पाडायच्या कोणत्याही प्रवृत्तीला असेच उत्तर दिले गेले पाहिजे. क्लिंटन

पवार साहेब अगदी बरोबर मांडलेत. उत्तम आणि शांतपणे दिलेल्या प्रतिसादाबद्दल शतशः आभारी आहे.एकूणच प्रतिक्रिया देण्यार्‍या (माझ्या सह) सर्वाना आपण ताळ्यावर आणलेत. तुमच्याविषयी असलेला पूर्वग्रह (चांगला) ध्यानात धरून तुमच्या प्रतिसादाचीच वाट पहात होतो.इतर प्रतिसाद पाहता धागा का काढला असे वाटू लागले होते. पण मग कुणीतरी काढलाच असता ना? असो. आज समाजात तुमच्या सारखे संयत विचार आणि आचार असणारे बहूसंख्य आहेतच म्हणून तर आपण टिकून आहोत. अवांतर लेनलागण हा शब्द खुप आवडला. मनाचे आरोग्य उत्तम असेल तर असल्या रोगांची लागण लवकर होउ शकत नाही.

In reply to by कापूसकोन्ड्या

"लेनलागण हा शब्द खुप आवडला. मनाचे आरोग्य उत्तम असेल तर असल्या रोगांची लागण लवकर होउ शकत नाही." सहमतीबद्दल मनापासून धन्यवाद ! "स्वाईन फ्लु" किंवा "डेंग्यू" यांची लागण लागते जिच्यावर सुदैवाने मायबाप सरकार कसे का होईना औषधपाणी शोधून काढते, पण "लेन" सारख्या रोगांची लागण आपण स्वतःच लावून घेतो वा आपले बांधवच दारात तिला दावणीला बांधून ठेवून आपल्यालाच विचारतात, "दादा, आत्ता रं काय करायचं?" अशावेळी त्या रोगाची लागण वाडीत पसरू नये म्हणून चूड घेऊन जागच्याजागीच जाळून टाकावी हे उत्तम. (आत्ताच वर काही प्रतिसादात बघा....थोरल्या महाराजांपासून झालेली ही लागण शाहू महाराजांपर्यन्त आली आहे... पुढे कुठे येऊन थांबणार? आणि काय मिळविणार आपण त्यातून?) इन्द्रा

सर्वश्री जयंत कुलकर्णी (ज्यांच्या 'मराठा लाईट इन्फंट्री' मालेचे मी मित्रांत जाहीर वाचन केले होते), , क्लिंटन, मृत्युंजय आणि धागाप्रवर्तक कापूसकोंडा.... या चौघांच्या समतोल प्रतिक्रियांचे कुणीही सारासार विवेकबुद्धी व्यक्ती स्वागतच करेल कारण त्यांच्या शब्दात ते प्रतीत झाले आहे ती खरी काळाची गरज आहे. काही मुद्यांचे निराकरण किंवा अधिक स्पष्टीकरण या संदर्भात आवश्यक आहे आणि ज्या अर्थी हा विषय आता वैचारिक पातळीवर घेतला गेला आहे त्याचे स्वरूप रुंदावण्याची काळजी घेत आहे. चांगले असो वा वाईट, पण भारतीय समाजरचनेतील अनन्यसाधारण वैशिष्ट्यांमुळे लोकशाहीतील 'जनतेच्या सहभागाचे' रुपांतर 'जातींच्या सहभागात' झाले व जातीय पातळीवर उभे केलेले राजकीय पक्ष एकमेकांशी आपल्या जातीला अधिक प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी भांडू लागले. हिंदु महासभा आणि रा.से.संघ जसे जन्माला आले तसेच मुस्लिम लीग आणि जमाते इस्लामीही जन्मल्या. आरक्षणाच्या नावाने द्रमुकने मिळविलेले राजकीय यश अन्य राज्यातील एस.सी.,एस.टी.ना हुरूप देवून गेले. आता हे जातीचे राजकारण नेत्यांनी जनतेच्या "हिता"साठी केले की जनतेने "आम्हाला असे जातिनिहाय उन्नतीसाठी वागवा" म्हणून नेत्यांना निवडून दिले हा वादाचा जरी नसला तर तार्किक मुद्दा होऊ शकतो. आजची कोणतीही निवडणुक (अगदी टिनपाट ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत) प्राधान्याने जातीच्या ढालीवर लढविली जाते हे नाकारण्यात अर्थ नाही (मी दिल्लीत आहे आणि पुढील दोन महिन्यात कोल्हापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आहे. सहज आमच्या भागातील मतदार संघाचा कानोसा घेण्यासाठी तेथील दोनचार मित्रांना ई-मेलद्वारे विचारले, त्यापैकी एकाने मला लिहिले, "तू काय आता इकडे येऊ नकोस. आपला मतदार संघ रिझर्व्ह झाला". त्याला मी पत्रातून झाडले, तर हा माझ्यावरच वैतागला आणि वर "तुझ्यासारखी दोनचार टाळकी मराठ्यांत आहेत म्हणून आपली प्रगती होईना" हा शेरा. काय बोलायचे या युक्तीवादावर? म्युनिसिपालिटीच्या निवडणुकीवर जर 'मराठा' समाजाची प्रगती अवलंबून आहे तर ती कशा प्रकारची प्रगती असेल हे सांगण्यास कुठल्या रमलज्ञाची गरज भासणार नाही. फासेच काय लायकीचे खुळखुळणार आहे हे त्याच्या वाक्यातच आहे.). कॉलेजच्या वर्ग प्रतिनिधीच्या निवडणुकीतदेखील तो किंवा ती "आपल्या" जातीतीलच आहे का हे विद्यार्थीच नव्हे तर संबंधित "मॅनेजमेन्ट" देखील पाहते. हे कटू असले तरी सत्य आहे. ही लागण (दुर्दैवाने) कलाक्षेत्रालाही लागली आहे. अमुक एका स्पर्धकालाच "एसएमएस करा" असा कुठल्यातरी गडावरून हुकूम सुटतो आणि साखर कारखान्यांचे चेअरमन आणि त्यांचे बगलबच्चे शेअरहोल्डर शेतकर्‍यांना तसे आदेश देतात. फार विचित्र स्थितीत आलो आहोत आपण या क्षणी. दादोजी कोंडदेवांचा धडा क्रमिक पुस्तकातून काढून टाकणे किंवा त्या नावाने दिला जाणारा पुरस्कार रद्द करणे ह्या घटना वा निर्णय एका गटाने "इतिहासाला विरोध" केला म्हणून नव्हे तर बहुजन समाजाच्या "फिक्स्ड व्होट बँके" ला नजरेसमोर ठेऊन घेतलेल्या बाबी आहेत हे समजणारा वर्ग आज इथे या क्षणी मिपावरही आहे, पण जसे सुभाषित आहे 'कावळ्यांच्या कलकलाटापुढे राजहंसही मानससरोवर सोडून जातो'.... नेमकी हीच हतबलता नेमस्त विचारांच्या झाडाखाली वाढलेल्या तुम्हाआम्हामध्ये आली आहे. त्यामुळे एक सच्चा लोकशाहीप्रेमी म्हणून नियत मार्गाने जितके करता येईल तितके आपण करीत आहोतच. ज्या लोकप्रतिनिधींकडे आपण आशेने पाहतो तेदेखील एकाच टांकसाळीत तयार झाल्याचे चित्र समोर येत आहे. संभाजी ब्रिगेङच्या कृत्याचा निषेध करणार्‍यामध्ये बीजेपीचे आमदार होतेच. पण वेळ आली तर "आपणही अशा मनगटगिरीमध्ये मागे नाही" हे दाखविण्याची संधी ही मंडळी सोडत नाही. जामनेर (जि.जळगांव) चे बीजेपीचे आमदार श्री.गिरिश महाजन, ही एक अभ्यासू आणि संतुलित भूमिका मांडणारी सुशिक्षित अशी व्यक्ती मानली जाते. पण मिडियाच्या कॅमेरे आपल्यावर रोखले जाणार आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ब्रिगेडच्याच आवेशात आज जळगांव सिव्हील सर्जनच्या इमारतीवर हल्ला बोल केला आणि 'हॉस्पिटलची मॅनेजमेंट व्यवस्थित नाही" म्हणून सर्वासमक्ष सर्जनना बांगड्यांचा आहेर दिला. त्यावर कडी म्हणजे "स्टार माझा" सारखे एकेकाळी सारासार विचार करून बातम्या देणारे चॅनेलही "स्टार माझाच्या बातमीचा दणका. सिव्हील सर्जनला बांगड्या भरल्या..." असा ब्रेकिंग न्यूजचा फ्लॅश देत राहिले. का? तर, आदल्या दिवशी लोकमत "आमच्या बातमीचा दणका" असा दिवसभर थयथयाट करीत होते. ही रॅट रेस आज नागरी जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. अशिक्षित, निमशिक्षित, उच्चशिक्षित आमदार हे जर अशाच तराजूच्या पारड्यात (एकत्रीत) बसून अशा मार्गाने आपल्या मतदारांना वारा घालणार असतील तर झाली महाराष्ट्र राज्याची सर्वांगाने प्रगती ! संत रामदासांनी करुणाष्टके लिहिताना हीच अगतिकता व्यक्त केली आहे : "स्व-जन-जन-धनाचा कोण संतोष आहे | रघुपतिविण आता चित्त कोठे न राहे || जिवलग जीव घेती प्रेत सांडोनि देती |" ~~ हे जीव घेणारे जिवलग आपलेच आणि आपल्यातच आहेत. इन्द्रा

जाहीर वाचना बद्दल आभार ! आता कोल्हापूरला येतो फी वसूल करायला. फार काही नाही..... १/२ बीअर आणि तांबडा पांढरा रस्सा व गप्पा. :-)

चर्चा आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. धन्यु...! -दिलीप बिरुटे

सर्व चर्वीत चर्वण झाले पण तो पुतळा सध्या कुठे आहे? पुण्यातील लोकांनी खुलासा करावा. कुठे तरी धूळ खात पडण्या पेक्षा त्याचे विसर्जन करावे.(ज.कु.भा.दु.न.त.)

सर्व चर्वीत चर्वण झाले पण तो पुतळा सध्या कुठे आहे? पुण्यातील लोकांनी खुलासा करावा. कुठे तरी धूळ खात पडण्या पेक्षा त्याचे विसर्जन करावे.(ज.कु.भा.दु.न.त.)

In reply to by कापूसकोन्ड्या

जेव्हा हलवण्यात आला होता तेव्हा पु.ल. देशपांडे उद्यानात ठेवण्यात आला होता. त्यानंतरहि तो पुतळा पुण्याच्या बाहेरच हलवा (किंवा त्यांच्या मूळ गावी हलवा) अशा मागण्या करण्यात आल्याचं ऐकिवात आहे (खरं कि खोटं ते माहित नाही )! पुढे काय झालं माहित नाही.