आतून किर्तन-वरून तमाशा
मिसळपावच्या वाचकांनो सप्रेम नमस्कार!!! मिसळपावची मनसबदारी मिळाल्याचा विरोप येऊन पडला होता पण दरबारात हजर झालो नव्हतो. आता झालो आणि एक पोस्ट टाकलीसुध्दा. आता ही माझी स्वत:ची ओळख करून देणारी पोस्ट - मिसळपाववर अशी पध्दत आहे की नाही ते माहित नाही पण अपने बारे में जरूर कुछ कहना चाहुंगा. तसा कानूनी पूछताछ करणारा रेडिमेड फॉर्म आहे व्यक्तिरेखा तयार करताना पण त्यात जास्त काही सांगता येत नाही. म्हणून इतर सगळ्या फॉर्म सारखा तोही निम्मा-अर्धा कोराच सोडून दिलाय. इथे का आलो?? येऊन काय करणार?? नसतो आलो तर काय फरक पडला असता? काय मिळणार इथे येऊन? असे निरर्थक प्रश्न पडायचे ते पडलेच. लोक बाहेर होळीचा रंग खेळत आहेत, दिलखुलासपणे एकमेकांना यथेच्छ अल्पगालीप्रदान करीत आहेत, देश, भाषा, राजकाराणी आणि कळीचे ठरणार्या अनंत मुद्यांच्या नावाने ठो!! ठो!! सुरू आहे, कुणी हजारो मैलावरच्या देशात जाऊन कुठल्यातरी जन्मात जुळलेल्या ऋणानुबंधांना या जन्मात घट्ट करून येत आहे, कुणी पृथ्वीच्या त्या टोकावर बसून या टोकाच्या मायभूमीची, इथल्या माणसांची, इथल्या पक्वान्नांची रोज याद करीत आहे, कुणी आपलं दिल इथं हनुमंतासारखं उघडून दाखवत आहे तर कुणी छंदी-फंदी कविता-लेख-कथा-किस्से-अनुभव अभ्यासपूर्वकपणे शब्दबध्द करीत आहे, वास्तविक जीवनात भेटू शकणार नाहीत एवढे दोस्तलोग इथे रोज मैफिल जमवत आहेत आणि तुम्ही हे सगळं खिडकीत मख्खपणे बसून पाहात आहात. होईल का हे शक्य? मी तर कधीच मुसलमान व्हायला तयार होतो हो, पण मला तसा हुकूम होत नव्हता ना. आज तो झालेला पाहिला आणि कुबूल है! कुबूल है! कुबूल है! असं तीनदा म्हणून इथं आलोय. आजपर्यंत जे काही र, ट, फ शिकलो आहे ते पुन्हा इथे गिरवून पाहाणार आहे - देता येईल तेवढं देणार आहे- नेता येईल तेवढं नेणार आहे ! आता देणे-घेणे आले म्हटले की त्यासोबतच्या सगळ्या गोष्टी आल्याच - वाद आले, रूसवे आले, कट्टरता आली सगळं-सगळं आलं. पण वादाच्या बाबतीत मी थोडा दुर्बळ माणूस आहे (मिसळपाववर यायचे म्हणजे कडकडीत वाद घालता यायला पाहिजे ही रिक्विसाईटच वाटतेय मला)...म्हणजे कुस्त्यांच्या फडात जग गाजवून आलेले नामचीन पैलवान शड्डू ठोकून एकमेकांना आसमान दाखवत असतील, तर मध्ये काही बोलायची हिंमत नाही आपल्यात (हाडं जास्त नाही झाली अंगात) - पण या कुस्त्या चालु असताना शिट्ट्या फुंकायला, उलट्या-पालट्या उड्या मारायला कमी करणार नाही. तर आता या माणसाबद्दल बोलतो. बंदा मराठवाड्याच्या राजधानीत (औरंगाबादसंभाजीनगर) तजुर्मेकार (अनुवादक हो!) म्हणून काम करतोय - लाथ मारीन तिथं पाणी काढीन या वाडवडिलांच्या म्हणीवर विश्वास ठेऊन नोकरीवर वर्षाभरापूर्वीच लाथ मारलेली आहे आणि नवी लाथ मारलेल्या ठिकाणी दिवसभर पुरेल इतकं पाणी निघालेलं आहे. बाजारातल्या चार-दोन पुस्तकांवर भाषा करायचा चानस मिळालेला आहे - अजून चार-दोन छापखान्यात आहेत. वाचता येईल तेवढं वाचलेलं आहे, ऐकता येईल तेवढं ऐकलेलं आहे आणि डोळे बराच काळ उघडे राहात असल्यानं बरंच काही पाहावं लागलेलं आहे. इतर कुणाच्याही धंद्यासारखी आमचीही नाळ गेटससाहेबाच्या या संगणकात घुसलेली असल्यानं, आम्ही दिवसभर संगणकालाच मिठी मारलेली असते (खर्या मिठ्या ज्यांना मारायला पाहिजेत तेही लोक संगणकातच असतात हे सांगणे नलगे !) फॉर दि टाईम बिईंग बडबडीसाठी ब्लॉगही लिहीतो हेही सांगाव लागणार नाही, तरी उगाच आपलं सांगून ठेवतो. तर या पार्श्वभूमीवर होईल तेवढं आतून किर्तन-वरून तमाशा करणार आहे - चूकभूल द्या-घ्या. बाकी सर्व क्षेम !
प्रतिक्रिया
http://www.misalpav.com/node/
पुलंचा शब्द
स्वागत!
स्वागत !
:-)
>> आता देणे-घेणे आले म्हटले
आला आला !!
स्वागत
दमदार एंट्री! तमाशा (का
असेच म्हणतो!
या.. पुढची कुस्ती कुठची
अरे वा जोरदार ओळख मिसळपाव वर
मिसळपाववर यायचे म्हणजे कडकडीत
वावा..
+१
मिसळपाववर यायचे म्हणजे कडकडीत
मालक, मालक
खूपखूप धन्यवाद!
ओ यशवंतबुवा!
हाहा!
साला येश्या!!! तुझं लेखन
सहमत.
कापले जाणार नाहीत असं वाटतंय...
एखादा रामलाल आधीच अॅरेंज
सगळीकडे रामलाल उपयोगी पडतोच असे नाही! ;)
वेल्कम.....! :)
आदेश द्या
वा एन्ट्री मारावी तर अशी..
या या...अन स्वताचा गैरसमज
एन्ट्री
वा वा वा! छान एंट्री /