नुकतेच भगीरथ ही रविंद्र भट लिखीत कादंबरी वाचली. कादंबरी बरी वाईट हे लिहीण्यासाठी हा धागा नाही पण त्यात जो विचार लेखकाने मांडला होता तो मिपा वाचकांना समजावा हा उद्देश.
लेखकाने मांडलेल्या मतानुसार, आर्य हे टोळ्याने भारतात आले. त्यापैकी एका टोळीचा नायक विश्वामीत्र होता. भारतातील मुळ रहिवासी हे शेती, व्यापार करावयाचे. त्यानी गावे वसविली होती. ते सुस्थीतीत रहात होते. आर्य हे आक्रमक होते. मुळ रहीवाश्याकडे आर्यांसारखी आधुनीक शस्त्रे नव्हती. आक्रमक आर्यानी अन्नासाठी मुळ रहिवाश्यावर आक्रमण केले. त्याना दास (दस्यु) बनविले. त्यांच्याकडुन शेती शिकली. त्यांच्या बरोबर विवाह संबध जुळवले. आपली राज्ये स्थापन केली.विश्वामित्राचे वंशज मनु याने अयोध्येची स्थापना केली. त्याचा पुत्र इक्ष्वाकु. इक्ष्वाकुच्या नावाने तो वंश प्रसिध्द झाला.
(याच वंशात पुढे श्रीरामाचा जन्म झाला.)
या वंशात सगर नावाचा राजा झाला. त्याच्या काळात भयंकर दुष्काळ पडला. त्याच्या मनात विचार आला हिमालयातील बर्फाचे पाणी जे उत्तरेकडे वाहुन जाते. ते जर वळवुन भारतात आणले तर येथे परत पाण्याचा दुष्काळ पडणार नाही.त्याने ६० हजार नागरीक घेऊन हिमालयाकडे प्रयाण केले. निसर्गाशी व रानटी टोळ्याशी लढता लढता त्याचे निधन झाले. पुढे त्याच्या वंशजानी हे कार्य चालु ठेवले. त्याचा खापर पणतु भगीरथ याने हे कार्य पुर्ण केले. बांध घालुन हिमालयातील दरीत पाणी अडवले. व बाजुच्या पर्वतातील गुहा आरपार कोरुन त्या गुहेतुन ते पाणी भारताकडे वळवले. या कामी भारतील इतर राजकुलांचे ही सहकार्य झाले. व मानवी प्रयत्नातुन गंगा भारतात आली.
वाचने
5584
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय माहिती नाही हो पण अस
भगीरथ
आधुनिक इतिहासकारांच्या मते
प्रचंड गोंधळ आहे. मीआर्य या
In reply to आधुनिक इतिहासकारांच्या मते by पाषाणभेद
छान लेख...
अजुन काही...
In reply to छान लेख... by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)
तसं असेल तर
मान्य की ही कविकल्पना वाटते.
In reply to तसं असेल तर by राजेश घासकडवी
द्राविडी प्राणायाम
In reply to मान्य की ही कविकल्पना वाटते. by मृत्युन्जय
स्वर्ग म्हणजे कदाचित हिमालय
In reply to द्राविडी प्राणायाम by राजेश घासकडवी
गंगा ही या विशिष्ट मार्गाने
In reply to द्राविडी प्राणायाम by राजेश घासकडवी
त्या काळच्या संसाधनांच्या,
In reply to तसं असेल तर by राजेश घासकडवी
भगीरथ वैग्रे इश्श्यू अपार्टः
In reply to तसं असेल तर by राजेश घासकडवी
रविंद्र भटांची ही कादंबरी
उप्रोल्लेखित पुस्तक वाचलेलं
अप्पा काका हे पुस्तक वाचण्यासारखे आहे त्या बाबतीत,
In reply to उप्रोल्लेखित पुस्तक वाचलेलं by अप्पा जोगळेकर
असे का?
पुराणात ते लिहीलेले आहे तर
In reply to असे का? by क्लिंटन
फुकाचा अभिमान काय कामाचा?
In reply to पुराणात ते लिहीलेले आहे तर by मृत्युन्जय
मान्य.
In reply to फुकाचा अभिमान काय कामाचा? by क्लिंटन
भारताचाअर्धा पेला रिकामा आहे, आणि अर्धा भरलेला आहे.
In reply to फुकाचा अभिमान काय कामाचा? by क्लिंटन
सहमत
In reply to फुकाचा अभिमान काय कामाचा? by क्लिंटन
असे का?प्रश्न मनोरंजक आहे.
In reply to असे का? by क्लिंटन
बा विंजीनेरा, का असे
In reply to असे का?प्रश्न मनोरंजक आहे. by विंजिनेर
भगीरथ इंजीनियर ?