कौलात नवर्यांची (नवरा चे अनेकवचन) व बायकांची संख्या याबाबत काही पर्याय नाहीत त्याबद्दल निषेध.
हम पांच हमारे पचीस असा पर्याय हवा होता.
अवांतर : कौल बहिण-भाऊ-नाते या विषयावर आहे की हिंदू मुसलमान यांची तुलनात्मक संख्या या विषयावर आहे?
अतिअवांतर : बहिणीचे रक्षण करायची वेळ भावावर येऊ नये असा समाज निर्माण होणे चांगले नाही का?
>>>आजकाल संपादन जरा मागं पडल्यागत झालंय...
+१.
शिल्पा तै, अगदीच सहमत.
इतके बदाबद लेख आणि प्रतिसाद पडतायेत, कोण कोण आणि किती संपादन करणार?? संपादकांना पु.सं.शु.
-असुर
मुस्लिमांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यांची संख्या १% पासून वाढत गेली की काय परिणाम होतात याची आकडेवारी नुकत्याच एका धाग्यावर वाचली. संपूर्ण बरोबर नसेल पण तात्पर्य तर समजून घेता येतेच.
जर अपत्यांची आबाळ होणार नसेल तर हिंदुस्थानात हिंदूंच्या संख्येचे इतरांशी असलेले गुणोत्तर कायम राहायला तुमची हरकत का?
इतर धर्मीयांच्या वाढत्या संख्येबद्दल मूग गिळून बसता आणि हिंदूची संख्या कमी* व्हावी (*-गुणोत्तर) अशी अपेक्षा ठेवणे ही तुमची बेगडी धर्मनिरपेक्षता आहे.
या अल्लाह! यहांपर ये कैसे कैसे लोग आ रहे है.. ईस पाक जमीन्पर ईनके नापाक ईरादे कभी कामयाब नही होंगे..!! अब मुसलमानोंको हिंदू के पैदा हुए बच्चोंके बाद सोचना पडेगा कि कितने बच्चे हमारे पैदा होने चाहीये! ये नाईन्साफी है.. ईन्शाल्ला हम कतई ये मंजूर नही करेंगे.. निषेध!!
;)
जय हिंद, जय महाराष्ट्र!!
१) हिंदू मुसलमान या विषयाचा इथे काही संबंध दिसत नाही. एकंदर पूर्वीचे कसे चांगले आणि आताचे कसे वाईट असे गळे काढण्याचा प्रकार वाटतो. असे धागे एवढ्यातच येउन गेलेले आहेत.
२) जर आर्थिक क्षमता, वेळ आणि पालकांची इच्छा असेल तर एकापेक्षा अधिक मुले हो देण्यास विरोध नसावा. अडीअडचणीच्या वेळी सख्खी भावंडे एकमेकांच्या मदतीस उपयोगी पडण्याची शक्यता मित्रांपेक्षा सहसा अधिक असते.
( अडचण म्हणजे दैनंदिन जीवनातील. तुम्ही म्हणता तशी रक्षण करण्याची वेळ न येणे हे स्तुत्यच आहे)
हिंदू मुसलमान या विषयाचा इथे काही संबंध दिसत नाही. एकंदर पूर्वीचे कसे चांगले आणि आताचे कसे वाईट असे गळे काढण्याचा प्रकार वाटतो.
+१. आमची भारतीय संस्कृती किती महान आणि सहिष्णू आहे असा जप करणारे पण स्वतः मात्र अत्यंत असहिष्णू असलेले अनेक लोक मी अगदी लहानपणापासून आजूबाजूला बघितले आहेत. त्यामुळे 'आमचं जुनं कसं चांगलं होतं' अशा अर्थाचे काहीही ऐकले की एक तिडिकच जाते. नेमका हाच प्रकार या कौलाच्या निमित्ताने केला जात आहे असे वाटत आहे.
माझा मूलभूत प्रश्नः आधी रक्षाबंधनाची महती काय? आणि जी काही महती असेल ती कळली नाही तर नक्की काय फरक पडणार आहे? जगात अशापध्दतीची रक्षाबंधनाची महती माहिती असलेले फार फार तर ७-८% लोक असतील (जगाच्या लोक्संख्येच्या हिंदू सुमारे १५% आणि त्यापैकी समजा अर्ध्या लोकांना ही महती माहित आहे असे गृहित धरले). उरलेल्या ९२-९३% लोकांच्या आयुष्यात रक्षाबंधनाची महिती माहित नसल्यामुळे काय आकाश कोसळले आहे?
माझ्यापुरते तरी सांगायचे झाले तर रक्षाबंधनाची महती मला माहित नाही आणि ती माहित करून घ्यायची काडीमात्र इच्छा आणि गरज मला वाटत नाही.
क्लिंटन
फरक कशानेच पडत नाहि... प्रत्येक गोष्ट / नाते / सण / सम्बध हे जर गरज आणि फरकाच्या मापात मोजायला लागलो तर कठिण आहे.... (अर्थात हे आमचे वैयक्तिक मत..........)
>>प्रत्येक गोष्ट / नाते / सण / सम्बध हे जर गरज आणि फरकाच्या मापात मोजायला लागलो तर कठिण आहे
अगदी बरोबर, हेच तर म्हणणं आहे.
उगाच असला कौल काढुन गरज, फरक, चव्हाट्यावर मतं मोजणार्याला कुठं कळतंय हे..
आणि समजा एखादा वैद्यकीय कारणावरून प्रजननोत्पादनासाठी अक्षम असेल, तर त्यानं दत्तक घेतलेल्या मुलाला/मुलीला काय बहिणीचं प्रेम कळणारच नाही की काय.
समजा ह्या सणाला परित्यक्त्या / अनाथ बहिणींची कुणाला काही सेवा करता आली तर ते कुठल्या 'महती'त धरायचं.
(कसा अचुक क्याच पकडला ;) )
माझ्यापुरते तरी सांगायचे झाले तर रक्षाबंधनाची महती मला माहित नाही आणि ती माहित करून घ्यायची काडीमात्र इच्छा आणि गरज मला वाटत नाही.
मलाही!
बाकी मी आणि माझा भाऊ अजूनही भरपूर भांडतो, सत्तत एकमेकांची उणीदुणी काढत असतो. पण वेळ आली होती तेव्हा आम्ही दोघे एकमेकांसाठी खंबीरपणे उभे होतो आणि आजही आहोत याची दोघांनाही पुरेशी जाणीव आहे. बाकी कुठल्याही गोष्टीवरून भांडू पण पैशांसाठी आमची भांडणं होणार नाहीत आणि आमचा एकमेकांना कायम अनकंडीशनल सपोर्ट आहे. मग वर्षातला एकच दिवस कशाला वेगळा काढायचा त्यासाठी? म्हटलं वर्षातले सगळे दिवस आम्ही एकमेकांसाठी काढतो.
फ्यांट्याश्टिक!
हे पटलं.
आता हा प्रतिसाद थोडा (काय, जास्तच ) अवांतर होऊ शकतो पण तरीही...
वर यमीनं मांडलेल्या मताशी आणि घटनांशी साधर्म्य साधणारा असा पण वेगळ्या नात्याचा तो व्हॅलेंटाईन डे ह्याची मला कच्चकन आठवण झाली. :)
त्यामुळं अदितीच्या "बाकी मी आणि माझा भाऊ..."इथुन सुरु होणार्या वाक्यांत भाऊ-बहिण ह्या जागी 'प्रेयसी-प्रियकर' आणि रक्षाबंधनासंदर्भातला 'तो एक दिवस' हा व्हॅलेंटाईन डे संदर्भात वाचुन पाहिलं आणि
'अरेच्चा! हे दोन्ही तर तंतोतंत जुळतंय की!' असं वाटलं. :)
माझ्या (आणि माझ्या घरच्यां)पुरतं विचारशील तर सगळ्याच मुहुर्त आणि डेज साठी हे तंतोतंत लागू पडतं. मोदक खायला गणेशचतुर्थीची वाट पहायची गरज नाही आणि वाईनची बाटली उघडायला ३१ डिसेंबरची!
गल्लत होते आहे का?
म्हणुनच आपल्या (महान) संस्कॄतीत अनेक सण-वार आहेत. अनिष्ट दिवस सोडले तर जवळपास रोज एक वेगळा सण असतो, त्यामुळे दिवसाचे महत्त्व आहेच. हा आता तुम्हाला व्हॅलेंटाईन डे ला कुणी राखी बांधावी अन रक्षाबंधनाला कुणी गुलाब द्यावा असे वाटत असेल तर काय बोला? ;-)
या संदर्भात Live and let live बरोबरच don't judge and don't comment हे सगळ्यांनी लक्षात ठेवावे असे वाटते. आपण करतो तेच आदर्श हा कुणाचाच अहंभाव नसला की सगळे उत्तम चालू शकेल...
रक्षाबंधनाला कुणी गुलाब द्यावा असे वाटत असेल तर काय बोला?
प्रथेप्रमाणे राखी मुलगी (ते देखील सख्खी, नात्यातली, मानलेली) बहीण बांधते. आता त्यातील कुणाला अथवा इतर कुणा मुलीस गुलाब द्यावासा वाटला आणि तुम्हाला घ्यावासा वाटला तर कुणाची काय हरकत असणार? पण तुम्हाला एखाद्या बहीण नसलेल्या मुलीसही गुलाब द्यावासा वाटला आणि तीने राखी बांधली तर काय ह्याचा देखील विचार करून ठेवलेला बरा. ;)
तुम्ही जे करता ते चांगलेच आहे (आणि ते अपेक्षितही आहे) पण असा विचार केला तर संस्कृतीतील प्रत्येकच गोष्ट खोडून काढता येइल. किंबहुना संस्कृतीचीच गरज राहाणार नाही.
हल्ली आपण जे आयुष्य जगतो त्यात या पूर्वीच्या शेतीप्रधान संस्कृतीतील सणावारांचा तसे म्हटले तर काहीच ताळ बसत नाही पण किमान औपचारिकता म्हणून तरी सण साजरे केले पाहिजेत आणि शक्य तेवढी माहिती पुढच्या पिढीला दिली पाहिजे. आपल्यावरच्या संस्कारांमुळेच* आपण आज इतरांपेक्षा जसे वेगळे आहोत ते टिकवायला पहिजे.
आपल्या माणसाच्या पाठी कायम खंबीरपणे उभं रहाणं, 'मी नेहेमीच तुझ्याबरोबर आहे' असा विश्वास असणं, भावंडांनी पैशांसाठी न भांडणं ही संस्कृती नाही का? संस्कृती म्हणजे नक्की काय? राखी बांधणं का बहिणी भावांचं आपसांतलं प्रेम आणि विश्वास?
>>किमान औपचारिकता म्हणून तरी सण साजरे केले पाहिजेत आणि शक्य तेवढी माहिती पुढच्या पिढीला दिली पाहिजे.
नागपंचमीला काही चिरू/कापू नये ही माहिती घरातून नाही मिळाली पण बाहेरून मिळाली. नसती ही माहिती तर काय फरक पडला असता मला? आणि मी ही औपचारिकता पाळली तर आजच्या दूधाच्या पिशव्यांच्या जमान्यात मला माझं आवडतं पेय मिळालं नसतं यापुढे काय फरक पडणार होता??
>> आपल्यावरच्या संस्कारांमुळेच* आपण आज इतरांपेक्षा जसे वेगळे आहोत ते टिकवायला पहिजे
संस्कार म्हणजे नक्की काय?
अवांतरः ठाण्यात एक प्रसिद्ध वैद्य होते. त्यांना एकदा संस्कार म्हणजे नक्की काय आणि त्याचं इंग्लिश भाषांतर काय करता येईल हा प्रश्न कोणीतरी विचारला. त्यांनी अगदी वेगळंच उत्तर दिलं. "काल रात्रीचा भात उरला आहे तर तो सकाळी उठून तसाच खाल्ला जात नाही. फोडणी देऊन, गरम करून तो खाल्ला जातो. शिळ्या भातावर खाण्यापूर्वी हा संस्कार केला जातो. आता या संस्काराचं भाषांतर काय करणार? लिही sanskaar!"
मला असं वाटतं त्यांचं म्हणणं असं काहीसं असावं:
रात्रभर भात ठेऊन त्यात जीवाणू, विषाणू... पैदास होऊ शकते. फोडणीमधून हिंग, हळद पोटात जातील जे काही प्रमाणात औषधांचं काम करतात आणि उष्णतेमुळे जीवाणू, विषाणूंची प्रजा मरेल.
जो भात तसाच खाल्ला तर बाधू शकेल तो फोडणीचा भात करून खाल्ल्यामुळे बाधणार नाही. त्यामुळे फोडणीचा भात बनवणे हा शिळ्या भातावर संस्कार आणि त्यावर कांदा, कोथिंबीर घालायचं असेल तर तो कदाचित सोपस्कार!
अहो शिळाम्हणजे काय? एखादी बातमी शिळी झाली म्हणजे काय हे आठवा. तस्मात.
शिळ्याला फोडणी दिली की पदार्थ रुचकर होतो हा मेन उद्देश, पण पदार्थाचे ठिक आहे हो... असो.
आपल्या माणसाच्या पाठी कायम खंबीरपणे उभं रहाणं, 'मी नेहेमीच तुझ्याबरोबर आहे' असा विश्वास असणं, भावंडांनी पैशांसाठी न भांडणं ही संस्कृती नाही का? संस्कृती म्हणजे नक्की काय? राखी बांधणं का बहिणी भावांचं आपसांतलं प्रेम आणि विश्वास?
हेच अपेक्षित आहे असे वरती म्हटले आहे. राखी बांधणे हे प्रतीकात्मक आहे.
उदा. लग्न करणे (वैदिक/रजिस्टर कसेही) जर स्त्री-पुरुषांच्या जोडीने एकत्र राहायचे ठरवले तर लग्नाची काय गरज? पण असे नसते. तो विधी हा त्या कमिटमेंटचे* प्रतीक असतो. हे उदाहरण काही अपवाद वगळता सर्व जगात आढळते. (काही लोक लग्न करूनही हा संकेत पाळत नाहीत, जोडीदाराला धोका देतात हा भाग निराळा.)
नागपंचमीला काही चिरू/कापू नये ही माहिती घरातून नाही मिळाली पण बाहेरून मिळाली. नसती ही माहिती तर काय फरक पडला असता मला? आणि मी ही औपचारिकता पाळली तर आजच्या दूधाच्या पिशव्यांच्या जमान्यात मला माझं आवडतं पेय मिळालं नसतं यापुढे काय फरक पडणार होता??
ज्या गोष्टींचा काही उपयोग नाही पण त्रास होतो अशा रूढींबद्दल काही म्हणणे नाही. सती वगैरे गोष्टी बंद झाल्या हे उत्तम. पण राखी बांधून कोणाला कोणताही विशेश अपाय / गैरसोय होणार नाही.
संस्कार म्हणजे नक्की काय?
तुम्ही भारतात लहानाच्या मोठ्या झाल्या असल्याने याची तुम्हाला माहिती आहेच. त्यातले चांगले आणि न्यूट्रल सर्वांनी चालू ठेवावेत असे वाटते.
तुमचे भाताचे उदाहरण फारसे पटले नाही, ती केवळ एक पाककृती आहे. आपण संस्कार हा शब्द मुलांना वाढवणे, आपल्या संस्कृतीनुसार बर्या-वाईटाचे धडे देणे यासंदर्भात वापरतो.
संस्कृती म्हणजे नक्की काय? मला वाटते की संस्कृतीशिवाय माणूस जनावरापासून खूप वेगळा असणार नाही.पण माझ्या मते ही संस्कृती म्हणजे धर्मातील (किंवा इतर कोणत्याही गोष्टीतील) माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ही शिकवण होय. कारण ही शिकवण खोलवर बिंबलेली नसेल तर त्याचे फार भयानक परिणाम होऊ शकतात. काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील १९८४ च्या शीखविरोधी दंगलींतून वाचलेल्यांचे भयावह अनुभव वाचले.त्यात म्हटले होते की लहानपणापासून शेजारी राहात असलेल्यांनीच आमच्या माणसांना ठार मारले! अशा दुर्दैवी घटना होणे म्हणजे ’माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे’ ही शिकवण खोलवर न बिंबल्याचेच लक्षण आहे. आणि त्याचे महाभयानक परिणाम आपण सगळ्यांनीच बघितले आहेत. माझ्या मते ही शिकवण हीच खरी संस्कृती. प्रत्येक माणसात एक जनावर दडलेला असतो. अशा दंगलींसारख्या प्रसंगी ते जनावर बाहेर यायची जोरदार शक्यता असते. ते कधीच बाहेर येऊ नये यासाठी त्या जनावराला लगाम घालणारी सद्सदविवेकबुध्दी म्हणजेच संस्कृती असे मला वाटते.
आपले संस्कृतीविषयी मत यापेक्षा वेगळे दिसत आहे.अर्थातच प्रत्येक माणूस आपले मत बनवायला स्वतंत्र आहेच. पण आपण सणावारांचा उल्लेख केला आहेत. सणवार संस्कृतीचा भाग आहेत का? आणि कालबाह्य झालेले असले तरी ते सणवार औपचारिकता म्हणून साजरे केले पाहिजेत आणि "शक्य तेवढी माहिती पुढील पिढीला दिली पाहिजे" असे विधान आपण केले आहेत. माझा नेमका याच गोष्टीला आक्षेप आहे. जुन्या सर्व गोष्टी टाकाऊ आहेत असे मला म्हणायचे नाही. आणि आताच्या काळाला हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्या सर्व गोष्टी लागू पडतील असेही नाही. तेव्हा त्यातील आताच्या काळाला लागू काय ते बघावे आणि तेवढे घ्यावे, बाकीच्या गोष्टी सोडून द्याव्यात. इतकेच नव्हे तर इतर ’संस्कृतींमधील’ चांगल्या गोष्टी असतील आणि त्या मनाला पटल्या तरी त्या विनासंकोच घ्याव्यात. मी नॉर्मन व्हिन्सेन्ट पील यांचे ’पॉवर ऑफ पॉसिटिव्ह थिंकिंग’ हे लोकप्रिय पुस्तक वाचले आहे.लेखक स्वत: ख्रिस्ती धर्मगुरू असल्यामुळे त्यात ते प्रत्येक ठिकाणी बायबलचा उल्लेख करतात.त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मला पटल्या आणि मी त्या आचरणात आणायचा प्रयत्न केला तर त्यात काय बिघडले? त्या पुस्तकात लेखक म्हणतात की आत्मविश्वास वाढवायला दररोज अनेक वेळा "I can do all things through Christ which strenghtens me" हे बायबलमधील वचन म्हणा. आजही मी ते वचन अगदी दररोज नाही तरी अनेकदा म्हणतो आणि त्याची उपयुक्तता माझ्या अनुभवास आली आहे. त्यातील Christ हा शब्द उच्चारताना माझी जीभ अडखळत नाही.समजा एखाद्याची जीभ तशी अडखळत असेल तर Christ ऐवजी गणेशाचे नाव घेतले तरी काही बिघडणार नाही कारण शेवटी तत्व एकच आहे ना? आणि Christ ऐवजी गणेशाचे नाव घेतले तर त्यावरही कोणाचा आक्षेप असायचे कारण नाही कारण वर म्हटल्याप्रमाणे शेवटी तत्व एकच आहे.
अशा आपल्याला पटतील अशा सर्व गोष्टी कोणत्याही source मधून आलेल्या असतील तरी त्या घ्याव्यात असे मला वाटते. याचे कारण अशी तत्वे ही कालातीत असतात आणि त्यावर कोणाही विशिष्ट धर्मियांची मक्तेदारी असू शकत नाही.
कालबाह्य गोष्टी पुढच्या पिढीला कळल्या नाहीत तरी त्याचा काय फरक पडणार आहे?उगीचच आमचे पूर्वज एखादी गोष्ट करत होते ती आज लागू नसली तरी ती आपण आजच्या काळातही ती करणार या हेक्याला काय अर्थ आहे? कारण अशाच हेक्यातून ’आमचे पूर्वज महान होते’ हा अत्यंत घातक अभिमान जन्माला येतो असे मला वाटते. आपले पूर्वज महान असतील तर म्हणून by default आपणही महान बनत नाही आणि उलट आपली जबाबदारी जास्त वाढते. मागे छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले यांना खुनाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्या केसचे पुढे काय झाले माहित नाही पण छत्रपतींच्या महानतेचा उदयनराजे उदोउदो करू लागले तर त्याला काही अर्थ आहे?
’आपले पूर्वज महान होते’ ब्रिगेडला अनेकदा वर्तमानकाळाचा विसर पडून ते हजारो वर्षांपूर्वीच्या भारतात वावरत असतात. त्यातूनच आपले नुकसानच होते आणि म्हणून ’आपले पूर्वज महान होते’ या अभिमानाला मी घातक म्हटले आहे.
आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा ’महान’ पूर्वजांच्या घराण्यात जन्माला आपण आलो यात आपले कर्तुत्व ते काय? देवाला वाटले असते तर त्याने आपल्याला ’महान’ पूर्वजांच्या घरात नव्हे तर ओसामा बीन लादेनच्या घरात नव्हे स्वत: ओसामा बीन लादेन म्हणून जन्माला पाठवले असते. तसे झाले तर आपण काही करू शकणार होतो का? तेव्हा आपण कोणत्या घरात जन्म घ्यावा ही एक serendipity आहे. त्याविषयी अभिमान का बाळगावा?
आपल्यावरच्या संस्कारांमुळेच* आपण आज इतरांपेक्षा जसे वेगळे आहोत ते टिकवायला पहिजे.
हा वेगळेपणा आपण मूर्तीपूजा करतो, वर्षात शेकडो वेगवेगळे उत्सव साजरे करतो वगैरे वरवरचा आहे की त्याहून जास्त मूलभूत आहे?आपण आचार-उच्चार-विचाराने सुसंस्कृत आहोत असा इतरांपेक्षा असलेला वेगळेपणा काहीतरी उपयोगाचा आहे. नुसते वरवरचे कपाळाला गंध लावणे आणि देवळाभोवती प्रदक्षिणा घालणे यातून कसला वेगळेपणा सिध्द होतो? आम्ही नमाझ पढत नाही तर प्रार्थना करतो आणि पश्चिमेकडे तोंड करून नमाझ पढत नाही तर देवळाभोवती प्रदक्षिणा घालतो असा फोल वेगळेपणा जर टिकवला जाणार असेल तर त्यातून काहीही साध्य होणार नाही हे लिहून घ्या.
आणि दुसरे म्हणजे अनेकदा आपल्याकडील लोकांचा holier than thou असा दृष्टीकोन असतो. म्हणजे आमची ’संस्कृती’ महान, आमचे संस्कार सर्वश्रेष्ठ वगैरे वगैरे. मोठ्या गोष्टींचे जाऊ द्या पण आपल्याकडील भ्रष्टाचार ट्रॅफिक पोलिसवाल्याला लाच देण्यापासून सुरू होतो. आणि बऱ्याचदा आपणही त्यात सामील असतो. मी अमेरिकेत असताना ज्या माणसाकडून जुनी गाडी विकत घेतली त्या गाडीच्या उजव्या टर्निंग इंडिकेटरमध्ये नारंगी रंगाचा दिवा बसविला होता.नियमाप्रमाणे फक्त रूग्णवाहिका तशा रंगाचा दिवा वापरू शकतात.त्याबद्दल पोलिसाने मला थांबविले आणि दंड केला.समजा मला वाटले असते तरी मी त्या पोलिसाला ’किती घेणार’ असे विचारायची हिंमतच करू शकलो नसतो कारण तसे विचारले असते तर दुसऱ्या क्षणी त्याने माझी रवानगी तुरूंगात केली असती ही पक्की खात्री मला होती. आपला देश किती वाईट आणि अमेरिका किती चांगली असे मला म्हणायचे आहे असा याचा अर्थ घ्यायचा असला तर जरूर घ्या. पण अशा छोट्याछोट्या गोष्टींमध्येही आपण शिस्तशीरपणे वागण्यात एक समाज म्हणून कमी पडतो की नाही? म्हणजे कुठेतरी काहीतरी एक समाज म्हणून आपले चुकत आहे की नाही? अशा छोट्याछोट्या बघायला गेलो तर या गोष्टी कधी मोठ्या बनतात तेच आपल्याला कळत नाही. तरीही आपला आम्ही सर्वश्रेष्ठ, आमचे संस्कार सर्वश्रेष्ठ असा जयघोष चालूच असतो. मागे जसपाल भट्टीने म्हटले होतेच ना "सौ मै से नब्बे बेईमान. फिर भी मेरा भारत महान".
क्लिंटन
मी स्वतः विशेष काही सणवार करत नाही...एक तर लक्षातच राहत नाही...आणि राहिले तरी पूर्वीच्या स्त्रियांना जे शक्य होते ते आताच्या स्त्रियांना शक्य असेलच असे नाही...पण तरी पूजा केली कि मनाला समाधान वाटते किंवा शांत वाटते म्हणून करावी...ज्यांना असे काही वाटत नसेल त्यांना उगाच जबरदस्ती नको..
आणि संस्कृती म्हणजे माणसाने माणसासारखे वागणे हे जरी असले तरी एका विशिष्ट समूहाचे काही आचार असतात आणि जरी ते कालबाह्य असले उदा. वटपौर्णिमा, तरी प्रतीकात्मक काहीतरी कार्याला हरकत नाही...इथे वटपौर्णिमेचे उदा. दिले आहे त्यामध्ये उगाच वडाच्या फांद्या तोडून त्याला दोरे गुंडाळण्यापेक्षा फारतर वडाची पूजा करावी आणि वड नसेल त्याच्या फोटोची करा...उगाच वृक्षतोड नको...पूर्वी हि प्रथा स्त्रियांना घराबाहेर पडण्यासाठी आणि socialize होण्यासाठी सुरु केली असावी...आता संदर्भ बदलले तरी वर सांगितल्याप्रमाणे थोडेफार modify करून सण साजरा करायला हरकत नाही...ज्यांची इच्छा आहे त्यांनी करावा आणि नाही त्यांनी नका करू...आता रक्षाबंधन हा प्रकार प्रतीकात्मक आहे...राख्या बांधल्याने लगेच कोणी पुरुष त्या स्त्रीची रक्षा करेलच असे नाही..
हे आपले माझे मत...बाकी तुमचे चालू द्या...
क्लिंटनसाहेब.. खेदाने असे म्हणावेसे वाटतेय कि तुम्हाला भारत कळालाच नाही.. तुमचे काही विचार खरोखरीच प्रशंसनीय, अभ्यास दांडगा आहे..पण त्या अभ्यासात तुम्ही नकारात्मक गोष्टी जास्त अभ्यासल्यात.. जास्त काही लिहित नाही , पण तुम्ही भारत या विषयाबद्दल फारच निगेटिव्ह बोलत आहात म्हणून सांगतो कुठलाही देश विकसनशील अवस्थेतून प्रवास करत असतो तेंव्हा ह्या समस्यांमधून जावेच लागते (समस्या= भ्रष्टाचार वगैरे).. धीर धरा.. भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे..
(जसपाल भट्टी नावाचा मनुष्य नालायक होता, त्याची उथळ टाळ्याखाऊ वाक्ये तुम्ही उचलावीत हे पटले नाही.)
कुठलाही देश विकसनशील अवस्थेतून प्रवास करत असतो तेंव्हा ह्या समस्यांमधून जावेच लागते (समस्या= भ्रष्टाचार वगैरे).. धीर धरा.. भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे..
अगदी मान्य.
पण यात सणवार, ती "सो कॉल्ड महान" भारतीय संस्कृती (किंवा गेलाबाजार हिप्पी संस्कृतीसुद्धा) यांचा काय संबंध?
जसपाल भट्टी या हुशार आणि चांगल्या विनोदी कलाकाराचा अपमान आवडला नाही. साध्या साध्या गोष्टीतलं व्यंग दाखवून हसवणारा माणूस, विनोदी अंगाने चुकीच्या गोष्टींवर टीका करणारा माणूस जर तुमच्या लेखी नालायक असेल तर आम्ही पामरांनी काय बोलावं?
जाता जाता: भाईकाका उर्फ पु. ल. देशपांडे यांची काही वाक्य (Nile च्या खरडवहीतून चिकटवत आहे):
"ऐतिहासिक काळ हा फारच सुबत्तेचा होता आणि त्या काळी सगळयांची चरित्रं धुतल्या तांदळासारखी होती ह्मा भ्रमाची लागण तर भयंकर वाढत चाललेली आहे."
"बोल होतोस की नाही भारतीय!' असं दरडावून विचारलं तर मी देखील'नाही होत जा' म्हणेन! "
"कलेच्या खऱ्या उपासकाला आणि रसिकाला तर राष्ट्रीयतेचं कुंपण देखील संकुचित वाटतं."
"न पेलणार्या पट्टीत गाउ नये बेटा नाहीतर सगळं आयुष्य बेसुर होउन जातं!"
>>पण यात सणवार, ती "सो कॉल्ड महान" भारतीय संस्कृती (किंवा गेलाबाजार हिप्पी संस्कृतीसुद्धा) यांचा काय संबंध?
माझा वरील प्रतिसाद हा क्लिंटन यांच्या भल्यामोठ्या प्रतिसादाला उपप्रतिसाद होता..
>>जसपाल भट्टी या हुशार आणि चांगल्या विनोदी कलाकाराचा अपमान आवडला नाही.
मलाही त्याचा अपमान करणे आवडले नसते.. पण त्या विनोदी कलाकाराने विनोदाच्या नादात देशाचाच अपमान करून ठेवलाय.. भारतात बेईमानी आहेच.. पण बेईमानी फक्त भारतातच होते का? आज ऊठसूठ कोणीही (अतिशहाणा!) ते वाक्य ऊच्चारतो अन फार मोठा पराक्रम केल्याचा अविर्भाव आणतो..
ऐतिहासिक काळ हा फारच सुबत्तेचा होता आणि त्या काळी सगळयांची चरित्रं धुतल्या तांदळासारखी होती ह्मा भ्रमाची लागण तर भयंकर वाढत चाललेली आहे.
भ्रम कसा? जर आपल्याकडे सुबत्ता नसती तर हजारो वर्षे मुस्लिमांनी येउन काय लुटल असत ? आपल्याकडे मुळातच इतक होता की सुलतानांनी फस्त करूनही शिल्लक राहिलेला मेवा लुटायला टोपीकर आले!
सामान्य नागरिकाच्या चारित्र्यावर देशाचे चारित्र्य अवलंबून असते. त्याशिवाय सर्वश्रेष्ठता येत नाही. क्लिंटन यांनीही तेच सिद्ध केले आहे. ( अर्थात सर्वश्रेष्ठतेस पोचूनही तो देश सभ्यपणे वागत नाही हा त्यांच्या संस्कारांचा भाग)
त्यामुळे दीर्घकाळ सुवर्णयुगात राहिलेल्या भारतात ते नसेल हे तार्किकदृष्ट्या पटत नाही.
सदर वाक्य पु.ल. देशापांडे यांचं आहे, माझं नाही.
त्यातून लुटालूट करून सगळ्यात पहिले लुटलं असेल तर चरित्रं ... ते असणारे राजकारणी, नेते हल्ली दिसत नाहीत. चुकलात तुम्ही भाईकाका!!
दीर्घकाळ सुवर्णयुगात रहाणार्या भारतात रस्त्यावर पिंका टाकणारे, रस्त्यावर कुठल्याही दिशांनी गाड्या हाकणारे, भरवस्तीत रात्री उशीरापर्यंत जोरजोरात आवाज करणारे, खाऊ खाऊन प्लास्टीक, कागदांचा कचरा ट्रेन, बसबाहेर फेकून देणारे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणारे, इ.इ. लोक सुसंस्कृत आहेत हे मला पटत नाही.
त्यामुळे दीर्घकाळ सुवर्णयुगात राहिलेल्या भारतात ते नसेल हे तार्किकदृष्ट्या पटत नाही.
नसेल नाही, नव्हते असे म्हणायचे आहे. मग अर्थ बदलतो.
सदर वाक्य पु.ल. देशापांडे यांचं आहे, माझं नाही.
त्यांचे किंवा कोणाचही आहे म्हणून ते सत्य होत नाही. सारासार विवेक वापरल्यास कोणालाही कळेल. तुम्ही इथे दिलेत म्हणून तुम्हाला उद्देशून प्रतिसाद दिला.
दीर्घकाळ सुवर्णयुगात रहाणार्या भारतात रस्त्यावर पिंका टाकणारे, रस्त्यावर कुठल्याही दिशांनी गाड्या हाकणारे, भरवस्तीत रात्री उशीरापर्यंत जोरजोरात आवाज करणारे, खाऊ खाऊन प्लास्टीक, कागदांचा कचरा ट्रेन, बसबाहेर फेकून देणारे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणारे, इ.इ. लोक सुसंस्कृत आहेत हे मला पटत नाही.
नाहीयेतच आणि होणार्यांना होउ देत नाहीत असे मी म्हटले आहे. पूर्वी होते असा एक साधार तर्क आहे.
खेदाने असे म्हणावेसे वाटतेय कि तुम्हाला भारत कळालाच नाही
मला भारत कळला नसेल तर तुमच्यासारख्या ज्यांना भारत कळला आहे अशा लोकांनी तो समजावून सांगितल्यास बरे होईल. नव्हे तशी माझी आग्रहाची विनंतीच आहे. आणि भारताचा भविष्यकाळ उज्वल असावा असेच मला वाटते आणि तो उज्वल असल्यास आपल्याला होईल तितकाच आनंद मलाही होईल.
पण त्या अभ्यासात तुम्ही नकारात्मक गोष्टी जास्त अभ्यासल्यात
भारतातल्या सगळ्या गोष्टी वाईट आहेत असे मला अजिबात म्हणायचे नाही. आपल्याकडील अनेकांचा भारतीय संस्कृती वगैरे विषय निघाले की आमची संस्कृती महान आणि सहिष्णू इथपासूनच सुरवात करणे हा दृष्टीकोन असतो. संस्कृती म्हणजे अशा लोकांना नक्की काय अभिप्रेत असते याचे उत्तर मला आजपर्यंत मिळालेले नाही.तरी त्यांच्या बोलण्यावरून पूजाअर्चा-कर्मकांडे-सणवार हे सुध्दा ’सो कॉल्ड’ संस्कृतीचा एक भाग असतात असे वाटते.
कर्मकांडे-पूजाअर्चा म्हणाल तर चार स्तोत्रे म्हणून, पूजा करून काही फरक पडतो असे मला तरी वाटत नाही. सर्वच गोष्टींच्या बाबतीत, विशेषत: अशा गोष्टींच्या बाबतीत चर्चा करताना माझा दृष्टीकोन अतिशय fastidious असतो.कुठल्यातरी ग्रंथात काहीतरी लिहिले आहे म्हणून ते मी प्रमाण मानू शकत नाही. ते आपल्या बुध्दीला पटले तरच ते मला प्रमाण वाटते. गीतेतील कर्मण्येवाधिकारस्ते वरही (मला संस्कृत अभ्यास करण्याएवढे समजत नसल्यामुळे) इतर लेखकांची मिमांसा वाचून त्यातून मला पटेल तेच मत मी बनविले आहे. आणि अशा कोणत्याही गोष्टीवर मत बनविताना प्रत्येक क्षणी, वाक्यावाक्याला उलटे प्रश्न विचारणे आणि त्या प्रश्नांच्या उत्तरातून स्वत:ला convince करणे आणि आपण स्वत: convince व्हायला सर्वात कठिण माणूस बनणे हाच खरा शास्त्रीय दृष्टीकोन आहे. तो मला पूर्णपणे अंमलात आला आहे असा माझा दावा अजिबात नाही पण त्यादृष्टीने वाटचाल तर सतत चालूच असते.त्या दृष्टीने विचार करता कर्मकांडे-पूजाअर्चा-सणवार यांचा विचार करता मला खरोखरच आजपर्यंत काहीही worthwhile मिळालेले नाही.
आणि मी जेव्हाजेव्हा ’भारतीय संस्कृतीवाल्यांशी’ याविषयी चर्चा करतो तेव्हा तेव्हा मला जाणवते की एकीकडे आमची संस्कृती किती सहिष्णू असा जयघोष करणारे लोकच असे प्रश्न उभे केले तर संतापून जातात आणि स्वत: पूर्णपणे असहिष्णू बनतात. जर सहिष्णूपणा हा तुमचा मोठा गुण असेल आणि माझे मत तुम्हाला पटत नसेल तर मला समजावून सांगा नाहीतर वेडा म्हणून सोडून द्या. संतापून जाऊन कसे चालेल? काही लोक असे प्रश्न पहिल्यांदा उभे केल्यावर संतापत नाहीत तर मी जेव्हा वाक्यावाक्याला नवे प्रश्न उभे करू पाहतो तेव्हा संतापतात. अशा अनेक लोकांशी मी अगदी शाळेत असल्यापासून चर्चा करायचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या या attitude मुळे माझा तर पूर्ण भ्रमनिरास झाला आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते.
बायबलमध्ये सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे लिहिले आहे आणि त्याविरूध्द मत मांडले म्हणून धर्मगुरूंनी गॅलिलिओ आणि कोपर्नीकसला तुरूंगात डांबले होते. निदान इतिहाराच्या पुस्तकात तरी तसेच लिहिले आहे. आज २०१० मध्ये काही मूठभर कट्टर लोक सोडले तर सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे कोणीच म्हणेल असे वाटत नाही. उत्क्रांतीलाही नाकारणारे असे लोक आहेतच पण ते संख्येने त्यामानाने थोडे आहेत.एक समाज म्हणून ख्रिस्ती समाजाने बायबलमध्ये लिहिलेली गोष्ट नाकारायचे धैर्य दाखविले तर आपण आपल्याच शास्त्रांमधील कालबाह्य गोष्टी (समजा असतील तर त्या) नाकारायचे धैर्य का दाखवत नाही? अगदी उच्चशिक्षित लोकही या गोष्टीला तितक्या सहजासहजी तयार होतील असे दिसत नाही.माझ्या आक्षेपाचे तेच कारण आहे.
आणि भारताचा भविष्यकाळ उज्वल असावा असेच मला वाटते आणि तो उज्वल असल्यास आपल्याला होईल तितकाच आनंद मलाही होईल.
दुर्दैवाने तसे होणार नाही.
भारतातल्या सगळ्या गोष्टी वाईट आहेत असे मला अजिबात म्हणायचे नाही. आपल्याकडील अनेकांचा भारतीय संस्कृती वगैरे विषय निघाले की आमची संस्कृती महान आणि सहिष्णू इथपासूनच सुरवात करणे हा दृष्टीकोन असतो.
ही वस्तुस्थितीच आहे. यात न कळण्यासारखे काय आहे ? साधे उदाहरण देतो. हिंदू धर्म फार पुरातन आहे पण ज्ञात इतिहासात इ.स. ० साली ख्रिश्चन धर्माचा उदय झाला आणि बहुदा इ.स ६०० मधे इस्लामचा जन्म झाला. आता इ.स ० पासून या तिन्ही धर्माच्या लोकांनी इतर धर्मीयांच्या केलेल्या हत्या, लूटालूट, अनन्वित अत्याचार आणि जबरदस्तीने धर्मांतर यांची बेरीज करा. याची तुलना केल्यास हिंदू धर्म आणि आपण महान आणि सहिष्णु का ते स्पष्ट होईल.
कर्मकांडे-पूजाअर्चा म्हणाल तर चार स्तोत्रे म्हणून, पूजा करून काही फरक पडतो असे मला तरी वाटत नाही.
तुम्हाला पडत नसेल. बहुसंख्यांना पडला, आणि इतरांना उपयोग होईल असे वाटले तेव्हा आणि शिवाय समाजबांधणीसाठी याची निर्मिती करण्यात आली असावी. आपण प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नाही पण जर देव वगैरे सगळे खरे असेल तर ते डायरेक्ट अॅप्लिकेशन नाही का ;)
तुम्ही संस्कृतचा अभ्यास केलेला नाही पण मी थोडाफार केलाय आणि ज्यांनी भरपूर केलाय ते ही तुम्हाला हे सांगतील की ती स्तोत्रे किंवा संस्कृतमधील काहीही उदा. सुभाषिते म्हणून आपले शब्दोच्चार सुधारतात.
आणि अशा कोणत्याही गोष्टीवर मत बनविताना प्रत्येक क्षणी, वाक्यावाक्याला उलटे प्रश्न विचारणे आणि त्या प्रश्नांच्या उत्तरातून स्वत:ला convince करणे आणि आपण स्वत: convince व्हायला सर्वात कठिण माणूस बनणे हाच खरा शास्त्रीय दृष्टीकोन आहे
चूक. हा तो नाही. प्रत्येक जण जर स्वत: सगळे शोध लावत बसला तर आज जगतो तसे आयुष्य कधीही, कोणीही जगू शकणार नाही. तुम्ही रोजच्या व्यवहारात वापरत असलेल्या वस्तूंमधील सर्व गोष्टी तुम्हाला माहित नसतील आणि त्यामुळे तुम्हाला समजलेल्याही नसतील, पण केवळ काम होते एवढेच पाहून तुम्ही त्या अंगिकारता / वापरता. आपल्या परंपरा, कर्मकांडे वगैरेचे उपयोग हे तुम्ही तिसर्यांदा विचारलेले आहेत. मी दोनदा वर सांगितले आणि आता मला कंटाळा आलाय परत...
आणि मी जेव्हाजेव्हा भारतीय संस्कृतीवाल्यांशी’ याविषयी चर्चा करतो तेव्हा तेव्हा मला जाणवते की एकीकडे आमची संस्कृती किती सहिष्णू असा जयघोष करणारे लोकच असे प्रश्न उभे केले तर संतापून जातात आणि स्वत: पूर्णपणे असहिष्णू बनतात. जर सहिष्णूपणा हा तुमचा मोठा गुण असेल आणि माझे मत तुम्हाला पटत नसेल तर मला समजावून सांगा नाहीतर वेडा म्हणून सोडून द्या. संतापून जाऊन कसे चालेल? काही लोक असे प्रश्न पहिल्यांदा उभे केल्यावर संतापत नाहीत तर मी जेव्हा वाक्यावाक्याला नवे प्रश्न उभे करू पाहतो तेव्हा संतापतात. अशा अनेक लोकांशी मी अगदी शाळेत असल्यापासून चर्चा करायचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या या attitude मुळे माझा तर पूर्ण भ्रमनिरास झाला आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते.
उत्तम. पुन्हा तेच. तुम्ही माझाच मुद्दा सिद्ध करत आहात. तुम्ही हातीपायी धड आहात आणि इथे हिंदुस्तानात हिंदूंच्याच धर्माविषयी नव्या उत्साहाने वादविवाद करत आहात यापेक्षा सहिष्णुतेचे चांगले उदाहरण कोणते ? शेजारील देशांमध्ये जा आणि हे करून बघा. आम्ही परिणाम पाहायला आतुर आहोत.
आपण आपल्याच शास्त्रांमधील कालबाह्य गोष्टी (समजा असतील तर त्या) नाकारायचे धैर्य का दाखवत नाही?
तुम्ही ज्या ख्रिस्ती समाजाचे बायबलमध्ये लिहिलेली गोष्ट नाकारायचे धैर्य वगैरे उदाहरण देत आहात त्या लोकांनी आपलाच धर्म स्थापन करणार्याला क्रूसावर चढवले होते आणि पृथ्वी गोल आहे असे सांगणार्या गॅलीलीओला विष पाजले होते.
आपल्याकडेही बर्याच सुधारणा झाल्यात की- सतीबंदी, ग्रहण, केशवपन वगैरेस बंदी, तर स्त्री शिक्षण, विधवापुनर्विवाह वगैरे. किंबहुना इतक्या स्वाभाविक (obvious) झाल्या आहेत की त्या सुधारणा असे तुमच्या लक्षातही आले नाही. अजूनही होतील.
ही वस्तुस्थितीच आहे. यात न कळण्यासारखे काय आहे ? साधे उदाहरण देतो. हिंदू धर्म फार पुरातन आहे पण ज्ञात इतिहासात इ.स. ० साली ख्रिश्चन धर्माचा उदय झाला आणि बहुदा इ.स ६०० मधे इस्लामचा जन्म झाला. आता इ.स ० पासून या तिन्ही धर्माच्या लोकांनी इतर धर्मीयांच्या केलेल्या हत्या, लूटालूट, अनन्वित अत्याचार आणि जबरदस्तीने धर्मांतर यांची बेरीज करा. याची तुलना केल्यास हिंदू धर्म आणि आपण महान आणि सहिष्णु का ते स्पष्ट होईल.
साहेब आपण एका धोकादायक विभागात (murky territory) प्रवेश करत आहोत.हिंदूंनी इतरांवर जाऊन आक्रमणे केली नाहीत पण आपल्याच शूद्र बांधवांवर अन्याय केला त्याचे काय? आजही पूर्णपणे जातीव्यवस्थेतून होणारा अन्याय गेला आहे असे कोण छातीठोकपणे म्हणू शकेल काय? आणि तरीही आपण महान आणि सहिष्णु हा जयघोष का? यावर आम्ही शूद्रांच्या कत्तली केल्या नाहीत पण मुसलमानांनी इतर धर्मियांच्या त्या केल्या असे म्हणत परत holier than thou असा दृष्टीकोन ठेवायचा असेल तर त्यावरही माझे उत्तर आहे. पण उगीच चर्चा विनाकारण लांबवायला नको म्हणून आवरते घेतो. आपली इच्छा असल्यास तेही उत्तर मी द्यायला तयार आहे.
शेजारील देशांमध्ये जा आणि हे करून बघा. आम्ही परिणाम पाहायला आतुर आहोत.
वर एका प्रतिसादाला मी उत्तर दिलेच आहे. इथे शेजारी राष्ट्राचा संबंध काय? शेजारी राष्ट्रातील लोक *****र आहेतच. माझा मुद्दा असा की आपण क्लेम करतो तितके सहिष्णू नाही. एकीकडे म्हणायचे की चार्वाक या पूर्णपणे विरोधी तत्व मांडणाऱ्यालाही देवळातून प्रवचन करायला आम्ही परवानगी दिली इतके आम्ही सहिष्णू. आणि दुसरीकडे प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात हा सहिष्णूपणा तितक्या प्रमाणावर आढळत नाही असे म्हटले तर शेजारी राष्ट्राकडे बोट का दाखवले जाते?स्वत:ला सहिष्णू म्हणणवणाऱ्यांची मोठी जबाबदारी असते. ती पूर्णपणे पार पाडली जात नाही असे म्हटले तर आम्ही शेजारी राष्ट्रापेक्षा चांगले असे म्हणून प्रश्न सुटत नाही. ते लोक ****र आहेत याविषयी मला तरी कसलीच शंका नाही.माझा प्रश्न आहे- आपले काय? आपण जेवढा दावा करतो तितके चांगले आहोत का?
क्लिंटन, आपण आधीच्या एका प्रतिसादात म्हटलय की ..
मी नॉर्मन व्हिन्सेन्ट पील यांचे ’पॉवर ऑफ पॉसिटिव्ह थिंकिंग’ हे लोकप्रिय पुस्तक वाचले आहे.लेखक स्वत: ख्रिस्ती धर्मगुरू असल्यामुळे त्यात ते प्रत्येक ठिकाणी बायबलचा उल्लेख करतात.त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मला पटल्या आणि मी त्या आचरणात आणायचा प्रयत्न केला तर त्यात काय बिघडले? त्या पुस्तकात लेखक म्हणतात की आत्मविश्वास वाढवायला दररोज अनेक वेळा "I can do all things through Christ which strenghtens me" हे बायबलमधील वचन म्हणा. आजही मी ते वचन अगदी दररोज नाही तरी अनेकदा म्हणतो आणि त्याची उपयुक्तता माझ्या अनुभवास आली आहे.
आणि वरिल प्रतिसादात असं म्हणताय
कर्मकांडे-पूजाअर्चा म्हणाल तर चार स्तोत्रे म्हणून, पूजा करून काही फरक पडतो असे मला तरी वाटत नाही. सर्वच गोष्टींच्या बाबतीत, विशेषत: अशा गोष्टींच्या बाबतीत चर्चा करताना माझा दृष्टीकोन अतिशय fastidious असतो.कुठल्यातरी ग्रंथात काहीतरी लिहिले आहे म्हणून ते मी प्रमाण मानू शकत नाही.
हा थोडा विरोधाभास नाही का वाटत?
नॉर्मन व्हिन्सेंट पीलनी काही फारमोठे भव्यदिव्य सांगितले आहे असे अजिबात नाही.आत्मविश्वास खालावलेल्या परिस्थितीत आपण स्वत:लाच ’तू ही गोष्ट करू शकतोस’ असे बजावले तर त्याचा उपयोग होतो असे बहुतेक सगळ्यांनीच अनुभवलेले असेल. तेव्हा नॉर्मन व्हिन्सेन्ट पील यांच्या विधानाची applicability मला पटली आणि म्हणून ते विधानही पटले. ते विधान पटले याचे कारण ते नॉर्मन व्हिन्सेन्ट पील यांनी कुठल्यातरी पुस्तकात म्हटले आहे हे नाही तर त्या विधानाची उपयुक्तता मला पटली हे आहे. जर त्यांनी चर्चमध्ये जाऊन अमुकअमुक कर्मकांड कर असे म्हटले असते तर नेमका तो भाग वगळून मी इतर गोष्टी घेतल्या असत्या.
यात विरोधाभास कसा?
सकळी उठल्या उठल्या / झोपायच्या आधी / अडचणीच्या वेळेस देवाचं नाव घेणं / मंत्र म्हणणं किंवा आय कॅन डू इट विथ क्राइस्ट्स हेल्प म्हणणं ( किंवा कोणतीही एखादी ठराविक गोष्ट करणं ) हे एकाच कॅटेगिरीत नाही येत का?
तुमच्या प्रतिसादातला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला आलेली प्रचिती ...आता एखाद्याला देवळात / चर्च मधे जाउन किंवा पूजाअर्चा करूनही तशीच अनुभूती येत असेल तर ?
आणि कर्मकांड फक्त चर्च किंवा देवळात जाउन करतात असं थोडंच आहे ? तुमचा अनुभव आणि एखाद्या देवभोळ्या माणसाला जप करून आलेला अनुभव यांत काहीच फरक नाही ...
अशी अनुभूती एखाद्याला जप करून येत असेल तर त्याने तो मार्ग जरूर अवलंबावा त्याविषयी मला काहीही म्हणायचे नाही.
माझा मूळ मुद्दा:मी एक बुध्दीप्रामाण्यवादी व्यक्ती आहे त्यामुळे माझ्या convince होण्यासाठी असलेल्या अपेक्षापण जास्त आहेत.एखाद्या अशिक्षित माणसाला देवळाभोवती चार प्रदक्षिणा घाल की तुझे प्रश्न सुटतील असे सांगून चालेल. पण माझ्या अपेक्षा यापेक्षा नक्कीच जास्त आहेत. पण अशा विषयावर चर्चा करायला लागले तर मोठ्या सहिष्णू भारतीय संस्कृतीचे पाईक समजणारे लोक संतापून जातात आणि स्वत:च असहिष्णूपणे वागतात. त्यावर काही बोलले की शेजारी राष्ट्राकडे बोट दाखवून ’असे मुद्दे शेजारी राष्ट्रात मांडलेत तर हातीपायी सुखरूप राहणार नाहीस’ असे म्हणतात. इथे शेजारी राष्ट्राचा संबंधच काय समजत नाही.जर का तुम्ही खरोखरच सहिष्णु असाल आणि तरीही माझे मत तुम्हाला पटत नसेल तर त्यावर intellectual चर्चा करा नाहीतर सोडून द्या. संतापून जाऊन कसे चालेल?तुम्ही स्वत:ला मोठे सहिष्णू म्हणवत असाल तर शेजारी राष्ट्राकडे बोट दाखविण्यापेक्षा अजून genuine सहिष्णूपणा तुम्ही दाखवावा ही अपेक्षा नक्कीच आहे. पण ते तसे होत नाही यावर माझा आक्षेप आहे.
काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील १९८४ च्या शीखविरोधी दंगलींतून वाचलेल्यांचे भयावह अनुभव वाचले.त्यात म्हटले होते की लहानपणापासून शेजारी राहात असलेल्यांनीच आमच्या माणसांना ठार मारले!
अशा किंवा यापेक्षा भयंकर गोष्टी इतर देशातही झाल्या आहेत. होतील.
प्रत्येक माणसात एक जनावर दडलेला असतो. अशा दंगलींसारख्या प्रसंगी ते जनावर बाहेर यायची जोरदार शक्यता असते. ते कधीच बाहेर येऊ नये यासाठी त्या जनावराला लगाम घालणारी सद्सदविवेकबुध्दी म्हणजेच संस्कृती असे मला वाटते.
प्रत्येक नाही तर काही माणसांमधे. ज्यांच्या सद्सदविवेकबुध्दी/ विवेकावर विकार मात करतात ते.
सद्सदविवेकबुध्दी आणि संस्कृती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दुसरीमुळे पहिली येइलच असे नाही आणि पहिली असली म्हणजे दुसरी आहेच असेही नाही.
आताच्या काळाला लागू काय ते बघावे आणि तेवढे घ्यावे, बाकीच्या गोष्टी सोडून द्याव्यात. इतकेच नव्हे तर इतर संस्कृतींमधील’ चांगल्या गोष्टी असतील आणि त्या मनाला पटल्या तरी त्या विनासंकोच घ्याव्यात.
काळाला लागू असे नाही तर योग्य ते घ्यावे आणि अनिष्ट प्रथा उदा. सती बंद व्हाव्यात याला कोणाचाच आक्षेप नाही.
त्यातील Christ हा शब्द उच्चारताना माझी जीभ अडखळत नाही.
याचे कारण तुमचा जन्म सहिष्णु अशा हिंदू कुटुंबात झालेला आहे. तुमच्यावर ते संस्कार झालेले आहेत. जर तुमच जन्म शेजारील देशात झाला असता तर तुम्ही हा वाद घालणे सोडाच, विचारही कुठे बोलू शकला नसतात.
कालबाह्य गोष्टी पुढच्या पिढीला कळल्या नाहीत तरी त्याचा काय फरक पडणार आहे?उगीचच आमचे पूर्वज एखादी गोष्ट करत होते ती आज लागू नसली तरी ती आपण आजच्या काळातही ती करणार या हेक्याला काय अर्थ आहे?
सापेक्षता. आत्ता तुम्हाला निरुपयोगी असणारी गोष्ट भविष्यात एखाद्याला उपयोगी पडू शकते त्यमुळे तुम्ही ती नष्ट करणे अयोग्य आहे. सगळ्याच गोष्टींना अर्थ किंवा उपयोग असतो असे नाही. परंपरेचा उपयोग आपल्या समूहाचे इतरांपासून वेगळेपण टिकवून अंतर्गत एकी राखणे यासाठी होत असेल /होईल असा उद्देश असावा जो फलद्रूप झालेला दिसत आहे.
हा अत्यंत घातक अभिमान जन्माला येतो असे मला वाटते. आपले पूर्वज महान असतील तर म्हणून by default आपणही महान बनत नाही आणि उलट आपली जबाबदारी जास्त वाढते. मागे छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले यांना खुनाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्या केसचे पुढे काय झाले माहित नाही पण छत्रपतींच्या महानतेचा उदयनराजे उदोउदो करू लागले तर त्याला काही अर्थ आहे?
अभिमान घातक नसतो, कृती घातक असते. पूर्वज महान होते हे सत्य आहे आणि त्याचा अभिमान असणे चांगलेच. तुम्ही उल्लेखलेल्या किंवा जगातील इतरांना कसलाच अभिमान नाही असा तुमच गैर्समज आहे का ? उठसूठ हिंदूंना का धारेवर धरता ? ताठ मानेने जगण्यासाठी तो आवश्यक असतो. तुम्हाला तसे करायचे नसल्यास तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.
तुमच्या उदाहरणातील इसम हा छत्र्पतींचा वारस नाही. जैविकदृष्ट्या नाहीच आणि आचार-विचार, चारित्र्य या दृष्टीने तर नाहीच नाही.
आपण आपल्या छत्रपतींचा त्यांच्या महान कार्याबद्दल उदो उदो करणे, स्फूर्ती घेणे याला तुमचा आक्षेप नसावा.
’आपले पूर्वज महान होते’ ब्रिगेडला अनेकदा वर्तमानकाळाचा विसर पडून ते हजारो वर्षांपूर्वीच्या भारतात वावरत असतात. त्यातूनच आपले नुकसानच होते आणि म्हणून ’आपले पूर्वज महान होते’ या अभिमानाला मी घातक म्हटले आहे.
हे ब्रिगेडचे लोक निव्वळ गुंड असून त्यांचा आणि आपल्या संस्कृतीच्या अभिमानाचा काहीएक संबंध नाही. उदाहरण चुकले आहे.
आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा ’महान’ पूर्वजांच्या घराण्यात जन्माला आपण आलो यात आपले कर्तुत्व ते काय? देवाला वाटले असते तर त्याने आपल्याला ’महान’ पूर्वजांच्या घरात नव्हे तर ओसामा बीन लादेनच्या घरात नव्हे स्वत: ओसामा बीन लादेन म्हणून जन्माला पाठवले असते. तसे झाले तर आपण काही करू शकणार होतो का? तेव्हा आपण कोणत्या घरात जन्म घ्यावा ही एक serendipity आहे. त्याविषयी अभिमान का बाळगावा?
कुठलेही उदाह्रण घ्या, सगळ्याच गोष्टी नशिबाने घडतात. मग कसलाच अभिमान धरता येणार नाही. तुम्ही धरा असा आग्रह नाही पण धरणेच चूक असे म्हणणे अयोग्य आहे.
हा वेगळेपणा आपण मूर्तीपूजा करतो, वर्षात शेकडो वेगवेगळे उत्सव साजरे करतो वगैरे वरवरचा आहे की त्याहून जास्त मूलभूत आहे?आपण आचार-उच्चार-विचाराने सुसंस्कृत आहोत असा इतरांपेक्षा असलेला वेगळेपणा काहीतरी उपयोगाचा आहे. नुसते वरवरचे कपाळाला गंध लावणे आणि देवळाभोवती प्रदक्षिणा घालणे यातून कसला वेगळेपणा सिध्द होतो? आम्ही नमाझ पढत नाही तर प्रार्थना करतो आणि पश्चिमेकडे तोंड करून नमाझ पढत नाही तर देवळाभोवती प्रदक्षिणा घालतो असा फोल वेगळेपणा जर टिकवला जाणार असेल तर त्यातून काहीही साध्य होणार नाही हे लिहून घ्या.
दोन्ही आवश्यक आहेत, एकही सोडून देता येणार नाही. यासाठीच मी आचार-विचार असा शब्द वापरला आहे. विचाराने सुसंस्कृत असलेच पाहिजे. परंपरांचा एक उपयोग वर दिलाच आहे शिवाय बर्याचदा या गोष्टी प्रतीकात्मक असतात. कसले प्रतीक हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला ती कृती निरर्थक वाटेल.
आपला देश किती वाईट आणि अमेरिका किती चांगली असे मला म्हणायचे आहे असा याचा अर्थ घ्यायचा असला तर जरूर घ्या. पण अशा छोट्याछोट्या गोष्टींमध्येही आपण शिस्तशीरपणे वागण्यात एक समाज म्हणून कमी पडतो की नाही? म्हणजे कुठेतरी काहीतरी एक समाज म्हणून आपले चुकत आहे की नाही?
आपल्या या छोट्या बाबतीत कमी पडतो हे खरेच. पण या बाबतीत प्रवीण असलेले अमेरिकन्स मोठ्या गोष्टींमधे काय करतात? आज त्यांच्या सुप्रीमसीच्या हव्यासापोटी शीतयुद्ध झाले. रशियाला संपवण्यासाठी जन्माला घातलेली मुस्लिम दहशतवादाची पिलावळ त्यांनाच डोईजड झाली आहे आणि आपला काही संबंध नसताना आपल्यालाही. तेलाच्या हव्यासापोटी इराकवर स्वारी करून तो जिंकून घेतला. सगळेच वाईट आहेत.
अशा छोट्याछोट्या बघायला गेलो तर या गोष्टी कधी मोठ्या बनतात तेच आपल्याला कळत नाही. तरीही आपला आम्ही सर्वश्रेष्ठ, आमचे संस्कार सर्वश्रेष्ठ असा जयघोष चालूच असतो.
आपले संस्कार उत्तम आहेतच, पण बहुसंख्य लोक ते आचरणात आणत नाहीत. ज्यांना आणायचे आहे त्यांना आणू देत नाहीत. तुम्ही पावसात गेलात आणि असलेली छत्री न उघडता भिजलात तर तो तुमचा दोष. छत्रीचा नव्हे
मागे जसपाल भट्टीने म्हटले होतेच ना "सौ मै से नब्बे बेईमान...
ही सत्य परिस्थिती असून आपण लवकरच खड्ड्यात जाणार आहोत.
सद्सदविवेकबुध्दी आणि संस्कृती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
संस्कृती म्हणजे काय हे १००% स्पष्ट नसल्यामुळे अशी वेगवेगळी मते असायची शक्यता आहेच. माझ्या मते सद्सद्विवेकबुध्दी आणि ’माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे’ हे दोन मानवी संस्कृतीतेच सर्वात महत्वाचे घटक आहेत.इतरांचे मत वेगळे असू शकते.
याचे कारण तुमचा जन्म सहिष्णु अशा हिंदू कुटुंबात झालेला आहे. तुमच्यावर ते संस्कार झालेले आहेत. जर तुमच जन्म शेजारील देशात झाला असता तर तुम्ही हा वाद घालणे सोडाच, विचारही कुठे बोलू शकला नसतात.
मान्य. पण आपला शेजारी देश हा आदर्श मिपावरील तरी कोणाला वाटत असेल असे वाटत नाही.तेव्हा शेजारी देशाशी तुलना का? अशा धर्मांधपणाचा आणि संकुचितपणाचा आपण सगळेच निषेध करतो. आपल्या शेजारी देशातील परिस्थिती आपल्या देशात येण्यासारखी दुर्दैवाची बाब दुसरी नसेल. सहिष्णूपणा असा कळत-नकळत हिंदू कुटुंबात बिंबवला जात असेल तर त्याचे स्वागत करावे तेवढे कमीच आहे.माझा आक्षेप ’हिंदू धर्म/संस्कृती सहिष्णू आणि सर्वश्रेष्ठ’ असे म्हणणे पण स्वत:ची वर्तणूक त्याच्या विरूध्द ठेवणे या दुटप्पीपणाला आहे. ’आक्षेपाचे कारण ’ या याच चर्चेवरील माझ्या प्रतिसादात मी यावर अधिक लिहिले आहे.
काळाला लागू असे नाही तर योग्य ते घ्यावे आणि अनिष्ट प्रथा उदा. सती बंद व्हाव्यात याला कोणाचाच आक्षेप नाही.
अर्थातच या काळाला लागू ते घ्यावे यात ’योग्य’ हा पण एक aspect मी गृहितच धरला होता.
आत्ता तुम्हाला निरुपयोगी असणारी गोष्ट भविष्यात एखाद्याला उपयोगी पडू शकते त्यमुळे तुम्ही ती नष्ट करणे अयोग्य आहे.
भविष्यकाळात उभ्या राहू शकणाऱ्या समस्यांवर आपण तोडगा काढू शकत नाही का?हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी लिहिले असेल तेच सगळ्या समस्यांवर लागू पडावे हा अट्टाहास का?
परंपरेचा उपयोग आपल्या समूहाचे इतरांपासून वेगळेपण टिकवून अंतर्गत एकी राखणे यासाठी होत असेल /होईल असा उद्देश असावा जो फलद्रूप झालेला दिसत आहे.
असे एकी राखण्यासाठी विविध वरवरच्या उपायांवर आपल्याला अवलंबून राहावे लागते ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.मी सारखे अमेरिकेचे उदाहरण देत आहे असे म्हणायचे तर जरूर म्हणा पण अमेरिकेत ख्रिसमस हाच एक मोठा सण आहे. हॅलोविन हा काही मोठा सण म्हणता येणार नाही. न्यू यॉर्क किंवा शिकागो सारख्या मोठ्या शहरांमध्ये माहित नाही पण मी जिथे राहत होतो त्या अमेरिकेतील भागात ख्रिसमसचे अस्तित्व घरांवर केलेल्या रोषणाईशिवाय अजिबात जाणवायचे नाही.अर्थातच मी चर्चमध्ये गेलेलो नव्हतो पण ख्रिसमसनिमित्त विशेष प्रार्थनांचे आयोजन केले असायची शक्यता आहेच. बाकी आपल्याकडे गणेशोत्सवात चालतो तसा रस्त्यांवर धुडगूस नाही, लाऊडस्पीकरवरून बोंबाबोंब नाही की कोणताही public nuisance नाही.बहुसंख्य अमेरिकन सुटीचा फायदा घेऊन पर्यटनासाठी जातात. भारतात आहेत तितके विविध उत्सव नसतानाही एक देश म्हणून अमेरिका एकत्र आहेच ना?आपल्यालाच अशा वरवरच्या उपायांची गरज का लागते?
तुम्ही उल्लेखलेल्या किंवा जगातील इतरांना कसलाच अभिमान नाही असा तुमच गैर्समज आहे का ? उठसूठ हिंदूंना का धारेवर धरता ?
जगातील इतरांना काय वाटते हा मुद्दा माझ्या मते गैरलागू आहे.मी एखादी गोष्ट कष्टाने मिळवली असेल तर त्या गोष्टीचा अभिमान बाळगणे योग्य आहे पण जी गोष्ट मला काहीही न करता अमुक एका घरात जन्म घेतला म्हणून आपसूक मिळाली आहे त्याविषयी अभिमान बाळगणे समर्थनीय नाही असे मला वाटते. मी हिंदू समाजातच जन्माला आलो आहे आणि त्या कारणाने मला हिंदू समाज आणि भारत देशच आपला वाटतो (जाज्वल्य अभिमान वगैरे नाही पण आपुलकी मात्र नक्कीच आहे) आणि माझा समाज अशा कर्मकांडांमध्ये गुरफटून पडला आहे या गोष्टीचे मला (माझ्या मतांनुसार) वाईट वाटते आणि म्हणूनच मी या गोष्टींवर टिका करत असतो. मला भारताविषयी वाटतो तो आपलेपणा पाकिस्तानविषयी अजिबात वाटत नाही आणि ते खड्ड्यात गेले तरी मला काहीही वाटणार नाही (झाला तर आनंदच होईल) त्यामुळे त्या लोकांच्या भवितव्याविषयी मी काहीही बोलत नाही. आता याला उठल्यासुटल्या हिंदूंना धारेवर धरणे म्हणत असाल तर मात्र काही इलाज नाही. आता कोणी विचारेल की आपुलकी आणि जाज्वल्य अभिमान यात फरक काय? माझ्या मते जाज्वल्य अभिमान हा आपले मत संकुचित बनवतो.आम्ही तेवढे शहाणे आणि सगळ्या जगाची अक्कल आम्हालाच असा दृष्टीकोन जाज्वल्य अभिमान बनवितो तर आपुलकी म्हणजे असा जाज्वल्य अभिमान वजा संकुचितपणा आणि जे काही चांगले असेल ते घ्यावे मग ते भले कुठूनही आलेले असू दे असा दृष्टीकोन. (अर्थात हे माझे मत झाले)
आपण आपल्या छत्रपतींचा त्यांच्या महान कार्याबद्दल उदो उदो करणे, स्फूर्ती घेणे याला तुमचा आक्षेप नसावा.
दुर्दैवाने आपल्याकडे केवळ उदोउदो करण्यातच धन्यता मानली जाते. स्फूर्ती घेणे वगैरे गोष्टी करायच्या भानगडीत कोणीच पडत नाही याचे मात्र वाईट वाटते. छत्रपती त्यामानाने बरेच सुदैवी. त्यामानाने डॉ.आंबेडकरांच्या नावाचा नुसता जयघोष करून स्वार्थाची पोळी भाजणारे लोक त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त आहेत त्याचेही वाईट वाटते.
सगळ्याच गोष्टी नशिबाने घडतात.
नाही सगळ्या गोष्टी नशीबाने घडतात असा fatalist दृष्टीकोन अजिबात नाही.आपल्या प्रयत्नांचाही आपल्याला जे फळ मिळते त्यात वाटा असतो.आणि असे ’भगिरथ प्रयत्न’ करून एखादी गोष्ट साध्य केली तर त्याचा जरूर अभिमान ठेवावा.पण केवळ जन्माने जी गोष्ट मिळाली त्याचा अभिमान ठेवू नये असे माझे मत आहे.
शिवाय बर्याचदा या गोष्टी प्रतीकात्मक असतात. कसले प्रतीक हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला ती कृती निरर्थक वाटेल.
आणि त्या प्रतीकांमागे कोणतेकोणते ’गूढ अर्थ’ असतात बरोबर?प्रतीके आणि गूढ अर्थ याचा उल्लेख केला नाही असे ’भारतीय संस्कृतीचे अभिमानी’ मला अजूनपर्यंत भेटायचे आहेत.
पण या बाबतीत प्रवीण असलेले अमेरिकन्स मोठ्या गोष्टींमधे काय करतात? आज त्यांच्या सुप्रीमसीच्या हव्यासापोटी शीतयुद्ध झाले. रशियाला संपवण्यासाठी जन्माला घातलेली मुस्लिम दहशतवादाची पिलावळ त्यांनाच डोईजड झाली आहे
राजकारणी लोक हलकट असतात हे जगमान्य सत्य आहे.भारतातही अकाली दलाला संपवायला जन्माला घातलेली भिंद्रनवालेची पिलावळ अशीच डोईजड झाली होती आणि भारताची एकात्मता याच पिलावळीने मुळापासून हादरवली होती.
आपले संस्कार उत्तम आहेतच, पण बहुसंख्य लोक ते आचरणात आणत नाहीत. ज्यांना आणायचे आहे त्यांना आणू देत नाहीत. तुम्ही पावसात गेलात आणि असलेली छत्री न उघडता भिजलात तर तो तुमचा दोष. छत्रीचा नव्हे
आपले संस्कार उत्तम आहेत असे ज्यांना वाटत असेल त्यांना जरूर तेच continue ठेवूदेत. माझ्यामते आपल्या आजूबाजूला एकूण परिस्थिती अशी आहे की त्या संस्कारांमध्ये काळानुरूप योग्य ते बदल करावेत हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी लिहिले ते जरी चांगले असले तरी सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडायला पुरेसे आहे असे दिसत तरी नाही म्हणून बदल करावेत. यात "ज्यांना आचरणात आणायचे आहे त्यांना आणू देत नाही" या वाक्याला माझा आक्षेप आहे.असे घरोघरी जाऊन कोणी बंदी घालत असेल असे म्हणायला काय जागा आहे?
मग वर्षातला एकच दिवस कशाला वेगळा काढायचा त्यासाठी? म्हटलं वर्षातले सगळे दिवस आम्ही एकमेकांसाठी काढतो.
सहमत आहे म्हणूनच आम्ही व्हॅलेंटाईन डे वगैरे साजरे करत नाही. उगाच कशाला १ दिवस वेगळा काढा.
कौलाचा उद्देश हा भारतीय संस्कृती किती महान वगैरे आणि तसेच लहानपणचा nostalgia दाखवणे आणि इतरांना त्या nostalgiaत सहभागी करणे हा आहे असे वाटते.
माझा मूलभूत प्रश्नः आधी रक्षाबंधनाची महती काय? आणि जी काही महती असेल ती कळली नाही तर नक्की काय फरक पडणार आहे?
या विधानाशी असहमत. जर कुणाला माहीती करून देयची असेल आणि करून घेयची असेल, कुणाला आठवत असेल तर करुंदेत की. आपल्यावर जर कोणी अमुक एका सणाबद्दल बळजबरी करत असेल तर त्याला नक्की आक्षेप घ्यावा. मात्र या कौलात तसे काही वाटण्यापेक्षा वरील मुद्दे जास्त वाटले. असो.
कल्चरल गोष्टी या त्या संस्कृतीतील व्यक्तींबद्दल मर्यादीत असतात त्यात आकडेवारीचा संबंध येत नाही. तसा आणायचा झाला तर अनेक गोष्टींचा आणता येऊ शकतो. तो एक सण आहे, त्यात लोकांना आनंद होतो, होउंदेत ना. आनंद होण्याची एकच व्याख्या नसते. समाधानी असण्याची एकच व्याख्या नसते. आणि नशिब तशी नसते! :) नाहीतर डॉक्टर-इंजिनियरींगच्या प्रवेशासारखे त्याचे देखील ६ वी पासून कोचींग क्लासेस काढून काहीजण स्वतःचे "सम धन" शोधतील. ;)
रक्षाबंधनाबद्दलः त्याचा पुर्वीचा उद्देश बदलून सामाजीक उद्देश केला तर त्याला इतर संस्कृतीतील / श्रद्धेच्या व्यक्तींकडून पण चांगला प्रतिसाद येऊ शकतो. तसा भारतात तर बर्याचदा आपण असे फोटो पाहीले आहेत. ज्यात भिन्न धर्मियांच्या मुलांचे रक्षाबंधन चालते. आता ती गोष्ट भारताबाहेरही होत आहे. त्या संदर्भात नंतर कधीतरी माहीती देईन...
१) तुम्ही कोणता सण मनापासून साजरा करता?
२)तुम्ही स्वतःला नक्किच भारतीय समजत असाल, का बरे?
३)संस्कृतीचे (त्यातील अनिष्ट प्रथा नव्हे) पालन न करणे तुम्हास भुषणावह वाटते का?
(बरेच सण.. बहुदा सर्वच सण असे आहेत कि ते साजरे न केल्यास काहीच फरक पडत नाही!! )
उत्तरे--- (खरे म्हणजे अशी उत्तरे द्यायचे अजिबात बंधन माझ्यावर नाही. तरीही आता माझा मूड आहे म्हणून उत्तरे देत आहे)
१) तुम्ही कोणता सण मनापासून साजरा करता?
कोणताही नाही. तो माझा पर्सनल चॉईस झाला. त्याविषयी इतर कोणाचाही आक्षेप असायचे कारण नाही आणि आक्षेप असला तरी who cares!
२)तुम्ही स्वतःला नक्किच भारतीय समजत असाल
मी भारताचा पासपोर्ट धारक आहे त्यामुळे मी भारतीय समजण्याबरोबरच भारतीयच आहे. पण त्याचा या चर्चेशी काय संबंध?
३)संस्कृतीचे (त्यातील अनिष्ट प्रथा नव्हे) पालन न करणे तुम्हास भुषणावह वाटते का?
नशीब अनिष्ट प्रथांचे अस्तित्व तरी मान्य केलेत.असो.अमुक एक गोष्ट करा किंवा करू नका असे हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या कुणा ढुढ्ढाचार्याने म्हटले म्हणून त्यावर मी काय करावे किंवा करू नये याविषयीचे माझे निर्णय अजिबात अवलंबून ठेवत नाही. एखादी गोष्ट मला पटली तर ती मी करतो आणि पटली नाही तर साक्षात बृहस्पतींनी सांगितले तरी करणार नाही. यात काही भूषणावह वाटायचा/न वाटायचा संबंध येतोच कुठे?
बहुदा सर्वच सण असे आहेत कि ते साजरे न केल्यास काहीच फरक पडत नाही!
That's the point. मला वैयक्तिक पातळीवर कोणताही सण साजरा केला नाही तरी काहीही फरक पडत नाही.
क्लिंटन
बाकी चर्चा चालू देत किंवा कसेही, पण एक मत नोंदवावेसे वाटते की केवळ हिंदू धर्मामध्ये (मुळात "हिंदू" हा केवळ धर्मच आहे हे मला मान्य नाही, किंबहुना धर्माचे अवडंबरच मुळात "हिंदू" जीवन पद्धतीमध्ये नाही हे माझे मत आहे. लोकांनी आपल्या सोयीनुसार "हिंदू" पणाची वाट लावलेली आहे - पण इथे सारे "हिंदू" धर्म आहे हे गृहीतक धरुन बोलत असल्याने) अनिष्ट प्रथा आहेत असे नाही, तर प्रत्येक धर्मामध्ये त्या आहेत.
या दुसऱ्या प्रश्नावर माझा आक्षेप आहे.हा मुद्दा आता लक्षात आल्यामुळे नवा प्रतिसाद लिहित आहे. मला एकही सण साजरा करण्यात इंटरेस्ट नसला तर ते देशद्रोही कार्य आहे का? वैयक्तिक आयुष्यात अमुकएखादी गोष्ट केली किंवा केली नाही किंवा एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवला/ठेवला नाही तर त्यामुळे माझ्या भारतीयत्वाला धोका कसा पोहोचतो? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे इतरांचे भारतीयत्व ठरवायचे मापदंड ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
मागे आंतरजालावर गुगल ग्रुपमध्येही मी या चर्चेत मांडली तीच मते मांडली तर त्यावर एका महाभागाने मला ’तू ख्रिस्ती की मुसलमान’ हा प्रश्न विचारला होता. आणि असेच लोक सहिष्णुतेचा जयघोष करतात ही गोष्ट वेगळी. म्हणजे माझे मत यांच्या मतापेक्षा वेगळे असेल तर लगेच मी अहिंदू ठरतो! जणू काही कोण हिंदू आणि कोण नाही हे ठरवायची ठेकेदारी यांनाच दिलेली!
त्यापेक्षा आपला दुसरा प्रश्न विशेष वेगळा नाही. आपल्या या प्रश्नाचा मी जाहिर आणि कडकडित निषेध करत आहे.
या दुसऱ्या प्रश्नावर माझा आक्षेप आहे.हा मुद्दा आता लक्षात आल्यामुळे नवा प्रतिसाद लिहित आहे.
तुम्ही आता कितीही लिहा हो.. माझा काहीच आक्षेप नाही..बाकी ठेकेदारी, मक्तेदारी असे जे काही छान छान लिहिले आहे त्या प्रांतात आम्ही येत नाही.. चालू द्या..
>>आपल्या या प्रश्नाचा मी जाहिर आणि कडकडित निषेध करत आहे.
चालेल...
कौलाच्या तिसर्या पर्यायात "मोठे कुटुंब ही हिन्दुन्चि काळाची गरज" असे लिहिले आहे म्हणुन हिंदू मुसलमानांची संख्या हाही विषय आहे असे वाटले.
क्लिंटन व विकास यांना तसे का वाटले नाही ते कळत नाही.
कौलाच्या तिसर्या पर्यायात "मोठे कुटुंब ही हिन्दुन्चि काळाची गरज" असे लिहिले आहे म्हणुन हिंदू मुसलमानांची संख्या हाही विषय आहे असे वाटले.वाट
क्लिंटन व विकास यांना तसे का वाटले नाही ते कळत नाही.
कौलकर्त्याला असे अभिप्रेत आहे असे मला नक्कीच वाटले होते.पण रक्षाबंधनाच्या संबंधी हा वेगळाच मुद्दा मध्ये आणायचे प्रयोजनही मला समजले नाही. तरीही मी त्यावर भाष्य केले नाही कारण यातूनच चर्चेला विनाकारण वेगळे वळण लागेल.
क्लिंटन
तरीही मी त्यावर भाष्य केले नाही कारण यातूनच चर्चेला विनाकारण वेगळे वळण लागेल.
असेच म्हणतो. चर्चा जर योग्य वळणावर आणि मूळ संदर्भावर रहावी असे वाटत असेल तर असल्या गोष्टी चार चार वेळा आणून अवांतर आणि भांडणाचे निमंत्रण देण्यापेक्षा दुर्लक्ष करणे योग्य वाटते.
विभक्त कुटुंब असेल तर असे होणारच...पण एकत्र कुटुंबात राहणे आजकाल शक्य नाही...पण किमान दोन बाळे तरी असावीत...एकाला दुसरा बरा.
एकाच कौलात बर्यापैकी जास्त मुद्दे मांडलेत...त्यामुळे कारण कळत नाही.
>> ३ माणसान्च्या कुटुंबात ऱक्शाबन्धनाची काय महती कळणार ?
ज्या मुलींना सख्खा भाऊ नाहिये त्या कृष्णाला राखी बांधतात. पण कुटूंबात आइ वडीलांना फक्त मुलगाच असेल तर मात्र त्याला कोण राखी बांधणार? पंण सख्खी बहीण फक्त ३ माणसांच्या कुटूंबातच नसते असे काही नाही. ओळखीत अनेक कुटुंबे आहेत ज्यांना ३ मुले , ४ मुले अगदि क्वचित ५ मुले आहेत पण त्या घरात मुलगी नाही.
शिवाय नातेवाईकांशी संबध चांगले असले तर चुलत बहीण , मामे / आते बहीण ह्या पण राख्या बांधू शकतात.
त्यामुळे '३ माणसान्च्या कुटुंबात ऱक्शाबन्धनाची काय महती कळणार ? ' हा प्रश्नच बाद ठरतो.
खाली कुणीतरी म्हटले आहे -
>> वर्षातला एकच दिवस कशाला वेगळा काढायचा त्यासाठी? म्हटलं वर्षातले सगळे दिवस आम्ही एकमेकांसाठी काढतो.
आम्ही (मी व माझी बहीण) पण वर्षातले सगळे दिवस एकमेकांसाठी काढतो. पण तरीही राखी पोर्णिमा खास वाटते. सण साजरे करायला , मौजमजा करायला, गोडधोड खायला आधिच आवडते शिवाय कामाच्या व्यापातून एक दिवस खास फक्त बहीणीसाठी देता येतो. एक वेगळीच मजा असते त्या दिवशी.
ज्यांना सण साजरा करण्यातच रस नाहिये त्यांना या दिवसाची मजा कशी कळणार?
अगदी ८-१० भावंडे असायची अशा पूर्वीच्या काळी सुध्दा रक्षाबंधन हे आजच्यापेक्षा काय वेगळे होते? भावाला एक राखी बांधली आणि ओवाळणी घेतली, दोन चार गोड पदार्थ खाल्ले की झाले असेच असायचे ना? मग कसली रक्षाबंधनाची महती आणि कसले काय? आणि हो रक्षाबंधनाची नक्की महती ती काय? एकीकडे म्हणायचे की भावाने बहिणीचे रक्षण करायचे म्हणून! पण बहिण लग्न करून गेल्यावर काय? अर्थातच लग्न झाल्यावर बहिणीला अडीअडचणीच्या प्रसंगी मदत करू नये असे अजिबात नाही पण या सगळ्यात त्या बहिणीचा पती आणि सासरची मंडळींची नक्की भूमिका काय? का ते नामानिराळे राहतात?
आता परत ८-१० भावंडे होणे नाही. आणि तसे होऊही नये. असे असताना आहेत ती नाती टिकवून, वाढतील कशी ते बघायला हवे. उगीचच कालबाह्य प्रथा चालू राहणार नाहीत म्हणून दु:ख करण्यात काय हशील आहे?
क्लिंटन
मला कोणीतरी रक्षाबंधन या सणाबद्द्लची धार्मिकता/ कथा/ संदर्भ इ. सांगेल का? उत्तर भारतीय गोष्टींमधून फक्त ऐतिहासिक संदर्भ वाचलेत ( राणी पद्मिनीनं मुघल बादशहा ला पाठालेली राखी ).
राखी पौर्णिमेपेक्षा आमच्याकडे भाउबीज बर्यापैकी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते..
ह्या सणाबद्दल माहिती वाचायला आवडेल
"३ माणसान्च्या कुटुंबात ऱक्शाबन्धनाची काय महती कळणार ? "
या प्रश्नाचे दोन नैसर्गिक उत्तर-पर्याय आहेत :
"होय"
"नाही"
"माहित नाही" असा तिसरा पर्यायही असू शकतो. हा पर्याय "काही फरक पडत नाही"पेक्षा वेगळा आहे.
हे पर्याय कौलात दिलेले नाहीत. त्यामुळे कौलाला उत्तर दिलेले नाही.
- - -
आमच्या लहानपणी आम्ही गावंढळ लोक रक्षाबंधनाच्या दिवशी "नारळी पूर्णिमा" साजरी करत असू. ओल्या नारळाच्या करंज्या असायच्या... आणि नारळीभात. मजाच.
आमचे कुटुंब ३ माणसांचे नव्हते तरी आम्हाला रक्षाबंधनाची महती कळली नाही."
मग पुढे शाळेतली सगळी पोरे मोठ्यामोठ्या राख्या घालून यायला लागली, तेव्हा आम्ही हट्ट करून आईबाबांकडून राख्या आणवल्या...
का नाही कळणार महती? मोठ्या लहान कुटुंबांचा संबंध येत नाही असे वाटते.
मला सख्खा भाऊ नाही, म्हणून मला भावांचे महत्त्व नाही असे आहे का?
का माझे चुलत/मावस/अजून थोडे लांबचे इत्यादी इत्यादी भाऊ नाहीत?
प्रतिक्रिया
निषेध
माम्या....
In reply to निषेध by नितिन थत्ते
आजकाल संपादन जरा मागं
In reply to माम्या.... by वेताळ
+१.
In reply to आजकाल संपादन जरा मागं by शिल्पा ब
कुलक्षयाचि भिती भेडसावते..
In reply to +१. by असुर
कुणाच्या? असं काहीतरी उगाच
In reply to कुलक्षयाचि भिती भेडसावते.. by अविनाशकुलकर्णी
वेताळा
In reply to माम्या.... by वेताळ
माम्या काय करणार येवुन तिथे?
In reply to वेताळा by शेलार मामा मालुसरे
वेताळा
In reply to माम्या काय करणार येवुन तिथे? by वेताळ
मामा मामा नक्की भेटु...
In reply to वेताळा by शेलार मामा मालुसरे
बघ बर का ? मी वाट बघेन.
In reply to मामा मामा नक्की भेटु... by वेताळ
+१
In reply to निषेध by नितिन थत्ते
तिरशिंगराव माणूसघाणे
In reply to +१ by तिमा
या अल्लाह! यहांपर ये कैसे
In reply to तिरशिंगराव माणूसघाणे by Pain
नितिन थत्ते
In reply to निषेध by नितिन थत्ते
+१
In reply to नितिन थत्ते by Pain
फरक कशानेच पडत नाहि...
In reply to +१ by क्लिंटन
>>प्रत्येक गोष्ट / नाते / सण
In reply to फरक कशानेच पडत नाहि... by प्रशान्त पुरकर
+१ पटेश.........
In reply to >>प्रत्येक गोष्ट / नाते / सण by अर्धवट
+१
In reply to +१ by क्लिंटन
फ्यांट्याश्टिक! हे पटलं. आता
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या (आणि माझ्या
In reply to फ्यांट्याश्टिक! हे पटलं. आता by धमाल मुलगा
गल्लत होते आहे का? म्हणुनच
In reply to माझ्या (आणि माझ्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
या संदर्भात
In reply to गल्लत होते आहे का? म्हणुनच by Nile
३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
समजलं नाही
In reply to ३_१४ विक्षिप्त अदिती by Pain
संस्कार आणि सोपस्कार
In reply to समजलं नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझं इंटरप्रिटेशन
In reply to संस्कार आणि सोपस्कार by प्रियाली
त्यापेक्षा हे कसं वाटतं?
In reply to माझं इंटरप्रिटेशन by ३_१४ विक्षिप्त अदिती
भारी
In reply to माझं इंटरप्रिटेशन by ३_१४ विक्षिप्त अदिती
३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to समजलं नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
विषय भरकटत असला तरी या गोष्टी लिहिणे गरजेचे वाटते.
In reply to ३_१४ विक्षिप्त अदिती by Pain
मी स्वतः विशेष काही सणवार करत
In reply to विषय भरकटत असला तरी या गोष्टी लिहिणे गरजेचे वाटते. by क्लिंटन
अरेरे..
In reply to विषय भरकटत असला तरी या गोष्टी लिहिणे गरजेचे वाटते. by क्लिंटन
कुठलाही देश विकसनशील
In reply to अरेरे.. by अनिल २७
>>पण यात सणवार, ती "सो कॉल्ड
In reply to कुठलाही देश विकसनशील by ३_१४ विक्षिप्त अदिती
३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कुठलाही देश विकसनशील by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वारी, रांग नंबर!
In reply to ३_१४ विक्षिप्त अदिती by Pain
३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to स्वारी, रांग नंबर! by ३_१४ विक्षिप्त अदिती
आक्षेपाचे कारण
In reply to अरेरे.. by अनिल २७
क्लिंटन
In reply to आक्षेपाचे कारण by क्लिंटन
चर्चा विनाकारण लांबत आहे तरीही
In reply to क्लिंटन by Pain
क्लिंटन, आपण आधीच्या एका
In reply to आक्षेपाचे कारण by क्लिंटन
नाही विरोधाभास नाही
In reply to क्लिंटन, आपण आधीच्या एका by पुष्करिणी
सकळी उठल्या उठल्या /
In reply to नाही विरोधाभास नाही by क्लिंटन
प्रतिसाद
In reply to सकळी उठल्या उठल्या / by पुष्करिणी
क्लिंटन
In reply to विषय भरकटत असला तरी या गोष्टी लिहिणे गरजेचे वाटते. by क्लिंटन
प्रतिसाद
In reply to क्लिंटन by Pain
मग वर्षातला एकच दिवस कशाला
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत - असहमत
In reply to +१ by क्लिंटन
एका वाक्यात उत्तरे द्या..
In reply to +१ by क्लिंटन
उत्तरे
In reply to एका वाक्यात उत्तरे द्या.. by अनिल २७
आभारी आहे..
In reply to उत्तरे by क्लिंटन
बाकी चर्चा चालू देत किंवा
In reply to उत्तरे by क्लिंटन
जाहिर निषेध
In reply to एका वाक्यात उत्तरे द्या.. by अनिल २७
धन्यवाद..
In reply to जाहिर निषेध by क्लिंटन
कौलाच्या तिसर्या पर्यायात
In reply to नितिन थत्ते by Pain
प्रकाटाआ
In reply to कौलाच्या तिसर्या पर्यायात by नितिन थत्ते
वाटले होते
In reply to कौलाच्या तिसर्या पर्यायात by नितिन थत्ते
सहमत
In reply to वाटले होते by क्लिंटन
नितिन थत्ते
In reply to कौलाच्या तिसर्या पर्यायात by नितिन थत्ते
विभक्त कुटुंब असेल तर असे
>> ३ माणसान्च्या कुटुंबात
In reply to विभक्त कुटुंब असेल तर असे by शिल्पा ब
समजले नाही
मला कोणीतरी रक्षाबंधन या
सहमत
In reply to मला कोणीतरी रक्षाबंधन या by पुष्करिणी
मूळ प्रश्नाचे उत्तर
का बरे?
का नाही कळणार महती?
In reply to का बरे? by चित्रा
म्हणजे
In reply to का नाही कळणार महती? by केशवपुत