एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा
एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||धृ||
किती वारी चालू आता किती दिंडी चालू
संसारातून सोडवी आता नको वेळ घालू
आतूरले डोळे माझे वाहे चंद्रभागा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||१||
किती ग्रंथ वाचले अन म्हटल्या मी ओव्या
संतांच्या साथीने कितीक आरत्या म्हणाव्या
शिणलो रे मी आता होई पापभंगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||२||
जळावीण मासा जिव धरी कैसा
मायेविणा पोर प्रेम पाही जैसा
नको धरू राग आता नेई तुझ्या संगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||३||
आयुष्य नासले अनंते हाती केले पाप
पुण्य नाही केले कर आता माफ
शेवटाला आलो रंगलो तुझ्या रंगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||४||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०८/२०१०
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3540
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाषाणभेद'जी!.. खूप
हॅ हॅ हॅ.... कसचं कसचं अवो ती
In reply to पाषाणभेद'जी!.. खूप by मृगनयनी
सुंदर अभंग ! !
खरोखर सुंदर
वाह पाभे..
छान
वाह वा.