Skip to main content

जर पुन्हा जन्म घेताना देवानी जर choise दिला तर कोण कुठे जन्म घ्याल ?

लेखक गांधीवादी यांनी बुधवार, 25/08/2010 08:55 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1126
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

त्यातही केवळ महाराष्ट्रातच..... भव्य हिमालय तुमचा आमुचा, केवळ माझा सह्यकडा गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा......

In reply to by प्रचेतस

गांधीबाबा काय गॅरटी? देव आहे ह्याला काय पुरावा? पूर्नजन्म होतो हे सिध्द करु शकाल काय? सुप्रसिध्द हिंदु संस्कृतीनुसार किती जन्मानंतर मनुष्यजन्म प्राप्त होतो?

माझ्या पुढच्या पिढ्यांनी भारतातच रहावे ही ईच्छा, कारण तोपर्यंत भारत नक्किच एक प्रगत राष्ट्र झालेला असेल... (माझा पुनर्जन्मावर काडीमात्र विश्वास नाही..)

In reply to by अनिल २७

आपण पुनः पुन्हा जन्मास येतो काय ? " alt="" />

In reply to by गांधीवादी

या पुस्तकात चक्क लिहिले आहे की (पान ३) - अतृप्त इच्छा राहीलेली माणसे मेल्यावर पिश्शाच्च योनीत जन्मतात आणि झाडावर जाऊन बसतात. मिपावर वेळोवेळी झाडे पकडणारी माणसे कुठल्या योनीतील असावीत याची कल्पना आली. बाकी, थिऑसॉफिकल सोसायटीचे नाव आल्यावर पुस्तकाची महती कळली. ;)

In reply to by अनिल २७

मग आता कसा जन्म झाला ?

In reply to by अनिल २७

अमेरिकन डॉलर २०१२ मधे संपुष्टात येईल असे एका रेसिडंट अर्थतज्ञ्यांचे मत असल्याचे अलिकडे बाजूच्या एका संस्थळावर वाचनात आले होते, तेव्हा अमेरिका बाद. अमेरिका बाद, तेव्हा (आणि आमचे पूर्वीचे राज्यकर्ते असल्यानेही) ब्रिटन बाद. जपान आता इतिहासजमा झाले आहे. चीन आता उडत असले तरी लवकरच ते कोसळेल असे अंदाज अनेक अर्थतज्ञ्य व्यक्त करीत आहेत. आणि त्यातून परत सगळ्यांनी एकसारखेच काहीही करायचे हे काही आमच्या रक्तात नाही. आम्ही तर घरात, दुकानांत, रस्त्यावर, हपिसात, कुठेही स्वतःचे काहीतरी वेगळे केले(च) पाहिजे अशा निर्धाराचे. मिपासारख्या संस्थळावर देखील मालक/चालकांनी काही प्रस्ताव मांडला की आम्ही स्वतःची अगदी विरूद्ध मते मांडण्यास तय्यार, खाजगी संस्थळ असले म्हणून काय झाले? मत द्यायची संधि मिळाली की ते देता यावे अशी व्यवस्था केली आहे ना? अगदी कुठेही रांग लावावयाची वेळ आली तरी आम्ही वेगळी 'रांग' तयार करतो. ह्या सगळ्यामुळे चीन दुसर्‍यांदा बाद. जर्मनी वगैरे बाद कारण काम वगैरे खूप करावे लागते म्हणे तिथे? आता दिलेल्या इतर पर्यायांत आमचा महान भारतच छान की हो! प्रत्येक व्यक्तिस स्वतःचे मत व्यक्त करायची मुभा आणि परत तसे करतांना स्वतःसाठी अशा काहीच जबाबदार्‍या पार पाडण्याची जरूरी नाही अशीही मुभा. कायम स्कॅंडल्स सुरू (गेल्या महिन्यातच सुमारे ४१६३८१ स्कँडल्स ऐकली/वाचली/चर्चिली आम्ही). त्यातून वास्तव कसेही असो, पण
माना आज की रात है लंबी, माना था दिन भारी, पर जग बदला, बदलेगी एक दिन तक़दीर हमारी उस दिन के ख्वाब बुनाओ, सुख सपनों मे सो जावो, मै गाऊं तुम सो जाओ
असे सांगणारा आमचा बहारदार राज्यशकट.. इतकी हेवा वाटणारी परिस्थिती फक्त फिलीपीन्स आणि पू. तिमोरची असेल. हे दोन पर्याय दिले असते तर जरा डोके खाजवावे लागले असते. पण ते दिलेले नाहीत. तेव्हा बिंधास मत आमच्या महान, सर्वशक्तिमान, सर्वसमावेशक, 'उद्याच्या' सुपर पॉवर भारतास दिले आहे. हा अगदी नो-ब्रेनर कौल होता.

हाड त्याच्या आयला..... लै फालतु प्रश्न....पुढच्या जन्मी तुमला कोन आय म्हनुन आवडेल ते आदि लिवा आन मंग आसले भिकारि प्रश्न विचारा...

आम्ही जन्म मरणाच्या फेर्‍यातून सुटून मुक्त व्हायच्या मागे आहोत. त्यामुळे सदर कौल गैरलागू.

ह्यासोबत काय टाईमचा च्वाईस है का? म्हणजे आत्ताच्याच काळात की आणखी १०० वर्षांनी / ५०-१०० वर्षं पुर्वी असा काही?

In reply to by धमाल मुलगा

आनि आई-बापाचा पन च्वाईस असाया हवा. सोताच्या इच्छेनीच जलम घेयाचा तर आमाला गर्भ-शिरिमंत वगैरे व्हायला अवडंल. म्हंजे आमी कितीबी खर्च क्येला तरी बापाचा पैसा संपला नाय पायजे. आनि येकदा ह्ये असं गर्भ-शिरिमंत झालो की कुटं जल्माला आलो त्येनं काय फरक पडनार हाये. येके ठिकानी जल्म घेयाचा अनि गाव कोळपत फिरायचं. --असुर

पर्याय जर फक्त वर दिलेल्या पुरते मर्यादित असतील तर जर्मनीत जन्म घ्यायला आवडेल. पण choice असला तर फ्रान्स पण चालेल. भारतात मात्र कदापिही जन्म नको...

आम्ही जन्म-मरणाच्या फेर्‍यातुन कधीच मुक्त झालो आहोत. परावर्ड कलिन्स

मागच्या सर्व जन्मात पृथ्वीवर सगळीकडे जन्म घेऊन झाला आहे. नॉट ईंटरेस्टेड.. ;-) आता पुढचा जन्म परग्रहावर :-)

..खरच देवानी इतके प्रसन्न होउन 'चॉईस' वगरै दिल तर त्याला सांगेन, 'मला कुठेही ढकल,.....पण या 'युयुत्सु'ना मात्र भारतात पाठव. .....असे म्हणतात काय आमच्या भारताला!!!!! दुष्ट माउ

मी कोणालाही असा choice देणार नाही...उगाच लोकात माझ्या कामाविषयी गैरसमज पसरवू नका अन्यथा तुमचे फेरे संपणार नाहीत हे पहिले जाईल... कळावे.