Skip to main content

नारळी भात

लेखक प्राजक्ताचि फुले यांनी मंगळवार, 24/08/2010 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
नारळी भात साहित्य : १ वाटी बासमती तांदुळ, १ ओल्या नारळाचा चव,पाउण वाटी साख्रर, मनुका,काजु,बदाम, वेलदोडे पुड, लवंग, केशर, खाण्याचा रंग,लिंबु, साजुक तुप,चिमुटभर मीठ पाकक्रुती: प्रथम थोड्या तुपावर लवंगा टाकुन त्यावर तांदुळ भाजुन घेणे. त्यानंतर त्यावर आधणाचे पाणी टाकुन भात मऊ मोकळा शिजवुन घ्यावा. त्यात चिमुटभर मीठ टाकावे. १ चमचा तुप घालावे.भात शिजला की परातीत काढुन घ्यावा. नंतर १ वाटी पाणी घेउन त्यात पाउण वाटी साखर घालुन पक्का पाक करावा. नंतर त्यात नारळाचा चव घालावा. त्यात लिंबु पिळावे व १ चिमुटभर रंग घालावा. त्यानंतर शिजवलेला भात घालावा. मनुका,काजु,बदाम, वेलदोडे पुड घालुन थोडी वाफ येऊ द्यावी. थोडासा परतुन घ्यावा. गरमागरम नारळी भातावर साजुक तुपाची धार सोडावी !! आणि आपल्या भाऊरायाचे तोंड गोड करावे!!!! (पहिल्यांदाच लिहितेय, काही चुकले असल्यास समजुन घ्या.आणि IT वाल्यांचा नारळी भात कसा वाटला नक्की सांगा :) )

वाचने 6555
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

पाकृ उत्तम. नारळीभात केल्याशिवाय जशी नारळी पौर्णिमेची मजा येत नाही तशीच फोटोविना पाकृंना मजा येत नाही! :)

In reply to by मेघवेडा

>>नारळीभात केल्याशिवाय जशी नारळी पौर्णिमेची मजा येत नाही तशीच फोटोविना पाकृंना मजा येत नाही! +१, हेच म्हणतो. फोटो हवाच्च म्हणजे हवाच्च !!! बाकी नारळीभात मला खुप आवडत असल्याने ही केवळ पोच, फोटो टाकल्यावर सविस्तर प्रतिसाद देईन. - छोटा डॉन

वरील दोन्ही प्रतिक्रियांशी सहमत.......फुलेबाई फोटो पाह्यजे बगा...आणि माझ्या माहितीप्रमाणे भात साधारण शिजला की त्यात नारळाचे दूध घालतात (आयटी वाले चव घालत असतील, पण त्याने चव कमी होईलसे वाटते). बाकी रेसिपी उत्तम

In reply to by सूड

नारळाचे दूध घालण्याची पध्धत कोकणात आहे का?? कारण आमच्या इथे नारळ्च घालतात खवुन...!

In reply to by प्राजक्ताचि फुले

हो.....नारळाचे दूध घालतात (निदान आमच्या घरी तरी), एकदा करुन पहा छान लागतो. जाता जाता: आपण केशर फक्त साहित्यात लिहीलेत कृतीत त्याचा उल्लेख कुठे दिसत नाही.

In reply to by मिसळभोक्ता

हहपुवा!!!!

नारळीभातात गुळ घातल्याशिवाय चव नाही. गुळ पाहीजेच. जाता जाता- उकडीच्या मोदकाच्या सारणातसुध्दा गुळच पाहीजे. साखर घालुन खमंग होत नाहीत. खरवससुध्दा गुळ घालुन चांगला लागतो. (किती जणांनी असा खाल्ला असेल असे माहीत नाही)

छान !! फोटो ? आयटी वाल्यांना भात आवडला हे वेगळे सांगायची गरज नसावी !!

साहित्य : १ वाटी बासमती तांदुळ, १ ओल्या नारळाचा चव,पाउण वाटी साख्रर,
नारळीभातात गुळाऐवजी साखर????????????? धन्यवाद.... तात्या.