नारळी भात
साहित्य : १ वाटी बासमती तांदुळ, १ ओल्या नारळाचा चव,पाउण वाटी साख्रर,
मनुका,काजु,बदाम, वेलदोडे पुड, लवंग, केशर, खाण्याचा रंग,लिंबु, साजुक तुप,चिमुटभर मीठ
पाकक्रुती:
प्रथम थोड्या तुपावर लवंगा टाकुन त्यावर तांदुळ भाजुन घेणे. त्यानंतर त्यावर आधणाचे पाणी टाकुन भात मऊ मोकळा शिजवुन घ्यावा. त्यात चिमुटभर मीठ टाकावे. १ चमचा तुप घालावे.भात शिजला की परातीत काढुन घ्यावा.
नंतर १ वाटी पाणी घेउन त्यात पाउण वाटी साखर घालुन पक्का पाक करावा. नंतर त्यात नारळाचा चव घालावा. त्यात लिंबु पिळावे व १ चिमुटभर रंग घालावा. त्यानंतर शिजवलेला भात घालावा. मनुका,काजु,बदाम, वेलदोडे पुड घालुन थोडी वाफ येऊ द्यावी. थोडासा परतुन घ्यावा.
गरमागरम नारळी भातावर साजुक तुपाची धार सोडावी !! आणि आपल्या भाऊरायाचे तोंड गोड करावे!!!!
(पहिल्यांदाच लिहितेय, काही चुकले असल्यास समजुन घ्या.आणि IT वाल्यांचा नारळी भात कसा वाटला नक्की सांगा :) )
वाचने
6555
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
+१
In reply to छान! by मेघवेडा
वरील दोन्ही प्रतिक्रियांशी
नारळाचे दूध घालण्याची पध्धत
In reply to वरील दोन्ही प्रतिक्रियांशी by सूड
हो.....नारळाचे दूध घालतात
In reply to नारळाचे दूध घालण्याची पध्धत by प्राजक्ताचि फुले
साखरभात आणि नारळीभात यात फरक
साखरभातामध्ये नारळ नसतो...
In reply to साखरभात आणि नारळीभात यात फरक by मधुशाला
मग ?
In reply to साखरभातामध्ये नारळ नसतो... by प्राजक्ताचि फुले
ठ्ठो!!!!
In reply to मग ? by मिसळभोक्ता
बापरे
In reply to साखरभातामध्ये नारळ नसतो... by प्राजक्ताचि फुले
गुळ पाहीजेच.
हांगाश्शी.. लाख
In reply to गुळ पाहीजेच. by चिंतामणी
नारळी भात गुळाचाच करतात आणि
सुन्दर आहे
छान !! फोटो ?
साहित्य : १ वाटी बासमती
आमच्या कडे साखरच घालतात
In reply to साहित्य : १ वाटी बासमती by विसोबा खेचर