हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा/मिळतो/ते?
प्रस्तुत धाग्यावर आता २३० पेक्षा जास्त प्रतिसाद आलेले आहेत. यापुढील चर्चेकरता नवा धागा उघडावा.
- संपादक मंडळ
माझा ऑफिसमेट जयंती (हो, हे मुलाचं नाव आहे, जयंती प्रसाद) अधूनमधून 'बाबागिरी'बद्दल बोलतो. 'बाबा' म्हणजे बाबा अथवा वडील नव्हे, "बाबा" म्हणजे भोंदूबाबा, बाबा-बुवा-बापू-माता-गुरू मधले बाबा! कालसुद्धा जयंती अमका माणूस फारच बाबागिरी करतो असं मला सांगत होता. म्हणून मी त्याला व्याख्या विचारली, "'बाबा' म्हणजे नक्की कोण?" त्याचं उत्तर अगदीच चमत्कारिक नसलं तरीही विचार करण्यायोग्य वाटलं. त्याचं उत्तर असं:
बाबा लोकांची तीन (जयंतीच्या बाबतीत ट्रीलॉजी जुनीच आहे.) लक्षणं असतात. यापुढे या लेखापुरतं 'बाबा' आणि बाबा हे शब्द एकच आहेत असं समजावं.
१. बाबा लोकं अखंड उपदेश करतात; पण त्यातल्या अगदी कमी गोष्टी त्यांच्या स्वतःच्या बाबतीत लागू पडतात.
२. बाबा लोकं कधी कोणाचंही ऐकून घेत नाहीत.
३. बाबा लोकांचे प्रचंड प्रमाणात (प्रमाणात हा शब्द महत्त्वाचा, का ते पुढे येईलच) अनुयायी असतात.
प्रमाण हा शब्द अशासाठी वापरला की, तो आमच्या होस्टेलमधल्या एकाला बाबा म्हणतो. होस्टेलमधले १२-१५ पैकी दहा लोकंतरी त्याचे अनुयायी असतात. उदा: तो म्हणाला आज पिझा खाऊया, की कॅण्टीनमधे जेवणारे सगळे पिझा खायला तयार होतात. आपलं म्हणणं कितीही चुकीचं असलं तरी तेच तो पुढे दामटत रहातो. इ.इ.
असो. तर आमचा हा संवाद सुरू असतानाच माझा मोबाईल वाजला, पाहिलं तर एक एसेमेस. त्याकडे मी दुर्लक्ष केलं आणि मुख्य, महत्त्वाच्या गॉसिपकडे लक्ष दिलं. तर पुन्हा एक एसेमेस. तर मग 'टॅम्प्लीस' घेऊन एसेमेस पाहिले. तर आणखी कोणी "गुरू" आणि "बापू" अनुक्रमे मला रूद्राक्ष आणि मणी विकत होते. 'डीएनडी'ला **वर मारणार्या या लोकांना चार भाषांत चार सणसणीत शिव्या हासडून मी पुन्हा जयंतीशी बोलायला गेले तर जयंती स्वतःच "बाबा" बनल्यागत माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करता झाला!
मग मीही त्यालाही **वर मारून पुन्हा मराठी आंतरजालाकडे वळले. पाहिलं तर उपक्रमावर अनिरुद्ध बापूंबद्दल ही चर्चा आली होती. मला प्रश्न असा पडला की या बाबा, बुवा, माता, बापू, स्वामी, गुरुंना अनुयायी मिळतातच कसे? तेव्हा एक त्यामानाने जुना टेडवरचा व्हीडीओ आठवला, हा पहा. पण हे सगळं आपल्याकडे असंच होतं का? म्हणजे या व्हिडीओत डेरेक सिव्हर्स म्हणतो त्याप्रमाणे The first follower transforms a lone nut into a leader. हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
त्यासाठी पण वेगळी पात्रता लागते.
हा पहिला अनुयायी कसा
तु माझी अनुयायी हो मी तुझा
स्वतःचे वडील, आणि शिवाजी
अगदी असेच म्हणतो.. फक्त आमची
तो म्हणाला आज पिझा खाऊया, की
बिपिन आणि अर्धवटः
रावण हे रूपक असू शकतं. तसंही
रूपक आहे हे मान्य केलं तर मग
युद्ध माझा राम करणार
होहो असेच
की "शिवाजी दुसर्यांच्या घरी
हेच सांगितलंय
हेच वाटतंय वरच्या श्लोकातून.
"तुम्ही जे काही कर्म करताय..
मृगनयनी
जय श्रीराम !
हम्म!
असं कसं ?
-१
त्याचं असं
प्रयत्न जेव्हा संपतात तेव्हा
माझ्या मते...
रावण हे रूपक असू शकतं. तसंही
अश्रद्धांनी श्रद्धावंताची व
बरं, मग तुमची कोणावर श्रद्धा
अश्रद्धांनी श्रद्धावंताची व
संपादकांचा निषेध
अरेरे
सहमत आहे. त्यातून हे तर
जागा
विरझण शब्द काळजाला भिडला.
त्याच काय आहे...
स्कोर सेटल करण्यासाठी पातळी
>>युद्ध माझा राम करणार |
स्कोर सेटल करण्यासाठी पातळी
ह्या अन्यावाचा तोडगा बापुंनाच
अगं मृगा, तू इतकी का पझेसीव्ह
तिथे कुणीतरी तुला अप्सरा
स्कोर सेटल करण्यासाठी पातळी
+१०८ %
श्रद्धावान आणि अंधश्रद्धाळू
श्रद्धावान आणि अंधश्रद्धाळू
पुन्हा माझा प्रश्न होता तिथेच
पुन्हा माझा प्रश्न होता तिथेच
स्वतःबद्दल ही गोष्ट खपू
बोलणार्याचे तोंड कोण धरणार
बोलणार्याचं तोंड धरता येत
पण जाहीर निवेदन कधीही दिसत
पण गजानन महाराजांचे बरेच