Skip to main content

हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा/मिळतो/ते?

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 20/08/2010 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तुत धाग्यावर आता २३० पेक्षा जास्त प्रतिसाद आलेले आहेत. यापुढील चर्चेकरता नवा धागा उघडावा. - संपादक मंडळ माझा ऑफिसमेट जयंती (हो, हे मुलाचं नाव आहे, जयंती प्रसाद) अधूनमधून 'बाबागिरी'बद्दल बोलतो. 'बाबा' म्हणजे बाबा अथवा वडील नव्हे, "बाबा" म्हणजे भोंदूबाबा, बाबा-बुवा-बापू-माता-गुरू मधले बाबा! कालसुद्धा जयंती अमका माणूस फारच बाबागिरी करतो असं मला सांगत होता. म्हणून मी त्याला व्याख्या विचारली, "'बाबा' म्हणजे नक्की कोण?" त्याचं उत्तर अगदीच चमत्कारिक नसलं तरीही विचार करण्यायोग्य वाटलं. त्याचं उत्तर असं: बाबा लोकांची तीन (जयंतीच्या बाबतीत ट्रीलॉजी जुनीच आहे.) लक्षणं असतात. यापुढे या लेखापुरतं 'बाबा' आणि बाबा हे शब्द एकच आहेत असं समजावं. १. बाबा लोकं अखंड उपदेश करतात; पण त्यातल्या अगदी कमी गोष्टी त्यांच्या स्वतःच्या बाबतीत लागू पडतात. २. बाबा लोकं कधी कोणाचंही ऐकून घेत नाहीत. ३. बाबा लोकांचे प्रचंड प्रमाणात (प्रमाणात हा शब्द महत्त्वाचा, का ते पुढे येईलच) अनुयायी असतात. प्रमाण हा शब्द अशासाठी वापरला की, तो आमच्या होस्टेलमधल्या एकाला बाबा म्हणतो. होस्टेलमधले १२-१५ पैकी दहा लोकंतरी त्याचे अनुयायी असतात. उदा: तो म्हणाला आज पिझा खाऊया, की कॅण्टीनमधे जेवणारे सगळे पिझा खायला तयार होतात. आपलं म्हणणं कितीही चुकीचं असलं तरी तेच तो पुढे दामटत रहातो. इ.इ. असो. तर आमचा हा संवाद सुरू असतानाच माझा मोबाईल वाजला, पाहिलं तर एक एसेमेस. त्याकडे मी दुर्लक्ष केलं आणि मुख्य, महत्त्वाच्या गॉसिपकडे लक्ष दिलं. तर पुन्हा एक एसेमेस. तर मग 'टॅम्प्लीस' घेऊन एसेमेस पाहिले. तर आणखी कोणी "गुरू" आणि "बापू" अनुक्रमे मला रूद्राक्ष आणि मणी विकत होते. 'डीएनडी'ला **वर मारणार्‍या या लोकांना चार भाषांत चार सणसणीत शिव्या हासडून मी पुन्हा जयंतीशी बोलायला गेले तर जयंती स्वतःच "बाबा" बनल्यागत माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करता झाला! मग मीही त्यालाही **वर मारून पुन्हा मराठी आंतरजालाकडे वळले. पाहिलं तर उपक्रमावर अनिरुद्ध बापूंबद्दल ही चर्चा आली होती. मला प्रश्न असा पडला की या बाबा, बुवा, माता, बापू, स्वामी, गुरुंना अनुयायी मिळतातच कसे? तेव्हा एक त्यामानाने जुना टेडवरचा व्हीडीओ आठवला, हा पहा. पण हे सगळं आपल्याकडे असंच होतं का? म्हणजे या व्हिडीओत डेरेक सिव्हर्स म्हणतो त्याप्रमाणे The first follower transforms a lone nut into a leader. हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा?

वाचने 60502
प्रतिक्रिया 231

प्रतिक्रिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

राजकुमार, खिल्ली उडवण्याचे वावडे तुम्हाला कधी पासून? तुमच्या सारख्यांचे खट्याळ प्रतिसाद वाचण्यासाठी तर आम्ही इथे येतो. कोण कुठल्या बापू टिपूला इतके महत्व देताय? :)

१. रस्त्यावर मारामारी सुरु झाली की गर्दी जमते. जमलेल्या गर्दीला काय चाललंय हे बर्‍याचदा माहितही नसतं आणि मागे उभे असलेल्यांना दिसतही नसतं. फक्त काहीतरी दिसेल, ऐकू येईल म्हणून गर्दी करून उभे राहण्यात त्यांना गंमत येत असते . २. आपला पुढला रस्त्यातल्या लहानशा खड्ड्यावरून उडी मारून गेला म्हणून पाठचाही उडी मारून जातो हे दृश्य पाहिले आहे का? रस्त्याला वळसा घालून जाणे शक्य असले तरी. या जगात सर्वात सोपी गोष्ट म्हणजे भक्त मिळवणे. ;) लोकांना आपल्या बुद्धीचा वापर करायचा नसला की भक्त जन्माला येतो.

In reply to by प्रियाली

तुझं म्हणणं अगदी मान्य आहे, प्रियाली. तू या प्रतिसादात म्हटलं आहेस त्याप्रमाणे ही गर्दी बुद्धी न वापरणार्‍यांचीच असणार. पण पहिला बुद्धीविरोधक आणि/किंवा भक्त मिळवणार कसा?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खाली विकास म्हणतात पहिला प्रतिसादक मिळवणे सोपे असते. भक्त मिळायला थोडा वेळ लागतो पण मला तसा फरक दिसत नाही. ;) लोक रोजच्या कटकटींनी इतके गांजलेले असतात की मी मार्ग दाखवतो (खड्ड्यावरून उड्डाण करण्याचा) असे म्हटले की मागे जाणारे भेटतातच. पहिला भक्त हा बरेचदा घरचाच असतो. आई, बायको, मामा, आत्या वगैरे असा काही बाबा-बुवांवरून अनुभव आहे.

In reply to by प्रियाली

लोक रोजच्या कटकटींनी इतके गांजलेले असतात की मी मार्ग दाखवतो (खड्ड्यावरून उड्डाण करण्याचा) असे म्हटले की मागे जाणारे भेटतातच. जर एखाद्यास "बाबा" होयचे म्हणून तो प्रयत्न करत असला, पण त्याला कोणीच अनुयायी मिळत नसले म्हणून गांजलेला असेल तर दुसरा एखादा बाबा त्याला, "मार्ग दाखवतो", असे म्हणेल का? का येथे देखील "राज को राज रेहेनेदो", अर्थात ट्रेड सिक्रेट सांगितले जात नसेल? ;)

In reply to by विकास

जर एखाद्यास "बाबा" होयचे म्हणून तो प्रयत्न करत असला, पण त्याला कोणीच अनुयायी मिळत नसले म्हणून गांजलेला असेल तर दुसरा एखादा बाबा त्याला, "मार्ग दाखवतो", असे म्हणेल का? का येथे देखील "राज को राज रेहेनेदो", अर्थात ट्रेड सिक्रेट सांगितले जात नसेल?
प्रश्नात गडबड आहे. असं होत नाही. मागे अभिषेक बच्चनचा एक चित्रपट आला होता. आता नाव नेमके आठवत नाही. त्यात विजयराज का अशा काहीशा नावाचा एक कॉमेडियन दिल्लीला येतो आणि नाडला जातो असा प्रसंग आहे. इतका नाडला जातो की अंगावर घालण्यास कपडे उरत नाहीत. वेड लागायची पाळी आलेल्या अवस्था झालेली असते आणि त्याला घालावयास एक परकर मिळतो. लोकांना शिव्याशाप देत फिरणार्‍या या माणसाला सर्व "परकरवाले बाबा" म्हणून नमस्कार करू लागतात. ;)

In reply to by प्रियाली

तो महान चित्रपट "रन" असावा बहुतेक... आणि परकरवाले बाबा नाही काही, "पेटीकोट बाबा"... दर्शनाला येणारे लोक त्या बाबांना पेटीकोट चढवतात.

In reply to by अनामिक

बरोबर! पेटिकोटवाले बाबा! ;) चित्रपट थोडा जुना आहे. आठवले!!!!! पांडुरंग शास्त्री नाहीत. चित्रपटाचे नाव आठवले - ब्लफमास्टर. त्यातील कव्वा बिर्यानीचा जोक पाहण्यासारखा आहे - पांचट आणि भंकस.

In reply to by प्रियाली

चित्रपटाचे नाव काय? (करमणूक प्रधान असल्यास पहायला आवडेल). :-)

In reply to by प्रियाली

लोकांना आपल्या बुद्धीचा वापर करायचा नसला की भक्त जन्माला येतो. आम्ही उगाच भक्त प्रल्हादाच्या गोष्टी वाचण्यात वेळ वाया घालवला म्हणायचे तर !!! असो... नारायण !!! नारायण !!! ;)

In reply to by मदनबाण

आम्ही उगाच भक्त प्रल्हादाच्या गोष्टी वाचण्यात वेळ वाया घालवला म्हणायचे तर !!!
वाचण्यात का बघण्यात रे मदना ??

In reply to by परिकथेतील राजकुमार

वाचण्यात... आणि ती कथा वाचतानाच एक गोष्ट मला कळली ती म्हणजे... ॐ नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र नारदाने भक्त्त ध्रुवाला विष्णू प्राप्तीसाठी ( दर्शना साठी)दिला. वरच्या माझ्या प्रतिसादात प्रल्हादाच्या जागी ध्रुव असे वाचावे. ( भगवंताचा फुल टाईम दास)

मुद्द्याला अनुसरून पण धाग्याला अवांतर एक कविता आठवली.. संत संदीप खरे यांचीच आहे... बघा पोचतय का? ;) एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना, पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची ! एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो तेव्हा होते निर्माण देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची ! एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा... कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच ! म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित ! पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन........ तुमचा नसेल विश्वास आमच्यावर, पण आमचा तर आहे ना ! " देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....

In reply to by अर्धवट

"संत" संदीप खरे यांना नास्तिक म्हणजे काय किंवा देवावर विश्वास नाही म्हणजे काय हे कळलेलं नाही एवढंच या कवितेतून मला कळलं. पुढे?

सर्वप्रथम तुमच्या या सहकारी मित्राचे नाव आणि म्हणणे ऐकून, त्याचा निषेध करायला म्हणून या बुवाबाबांनी जर, "आम्ही आमची जयंती करून देणार नाही" असा आदेश दिला, तर किती बरे होईल! ;) हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा? ते कदाचीत पहीला प्रतिसादक मिळवण्यापेक्षा अवघड असावे. ;) मात्र अनुयायी केवळ अध्यात्मिक क्षेत्रातच नाही तर इतर कुठल्याही क्षेत्रात जे मिळवतात ते कितीही (अध्यात्मात) भोंदू आणि (इतर क्षेत्रात) लबाड असले तरी त्यांच्यात काहीतरी enterprising आणि marketing skills असतात असे नक्कीच वाटते. :-)

जयंती स्वतःच "बाबा" बनल्यागत माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करता झाला! हा बाबा नक्कीच ज्ञानी दिसतोय !!! ;) (मदन बाबा प्रेम नगरीवाले)... ;)

मला वाटलं अदिती काय 'करिअर' वगैरे बदलायचा विचार करते आहे की काय? ;) पहिला अनुयायी मिळवणे हे तितकेसे अवघड नसावे. पुलंच्या भाषेत सांगायचे तर "बेंबट्या, कुंभार हो जगात गाढवांस तोटा नाहीं!" (पालथा घडा)चतुरंग

In reply to by चतुरंग

"बेंबट्या, कुंभार हो जगात गाढवांस तोटा नाहीं!" युद्ध माझा राम करणार| गाढव माझ्यात संचार करणार कुंभार जिंकणार निश्चित|| :)

In reply to by चतुरंग

पहिला अनुयायी मिळवणे हे तितकेसे अवघड नसावे. पुलंच्या भाषेत सांगायचे तर "बेंबट्या, कुंभार हो जगात गाढवांस तोटा नाहीं!" ह्म्म्म्म ! अगदी खरं आहे ! :) "प्रतिसाद" खेचण्यासाठी बाबा-बुवांच्या विषयाव्यतिरिक्त दुसरा "हुकमी एक्का" असू शकतो का? ;) नाही तर ते कुठल्या तरी स्त्री-मुक्ती चळवळीच्या की कुठल्याश्या म्हातार्‍या परदेशी "आयडॉल " बद्दल धागा काढला जातो ..... आणि धाग्याचं नाव वाचून _त्रा सुद्धा ढुन्कून बघत नाही... त्या धाग्याकडे! .. मग २ दिवस वाट पाहिली जाते....आणि मग नन्तर "बान्ध" सुटल्यावरती आपल्या कम्पूतल्या प्रत्येकाला "व्यनि" किन्वा 'फोन' करून करून हैराण केले जाते, "ए.. टाक ना प्रतिसाद माझ्या धाग्याला.. कसेही टाका.. पण टाका.. ना..... काय ** राव... काय रे **शेठ.... मी एवढं स्त्री-मुक्ती'बद्दल लिहिलय.. पर्शियन की (रशियन.. की अमेरिकन ;) ) आयडॉल' टाकलाय... लिहा ना.. काहीतरी... 'कोरम' भरलेला दिसला पाहिजे!!!!!.. तुम्ही माझ्या गोटातले ना!!!! ;) =)) =)) .. बास काय रे हुप्प्या!!! =)) =)) =)) =)) =)) इ. इ. .... मुक्तवचने उधळून "कोरम" भरवला जातो! ;) पण येवढे श्रम करण्यापेक्षा.. एखाद्या "सेन्सीटिव्ह" विषयावर काही तरी लिहिले... प्रसन्गी दुसर्‍या "सन्केतस्थळा"चा आधार घेतला... तर कुठे बिघडले ? ? ? ?? ;) "सम्पादक मन्डळा"ची परवानगी असल्यावर काय अशक्य आहे? ? ? ? ? नाही का? मग भले... या सन्केतस्थळावरील .. .. .. "श्रद्धावानां"च्या भावना दुखावल्या गेल्या तरी चालतील.. पण आपले स्वतःचे नाव "रोशन" झाले पाहिजे! नाही का? ;) ;) :| आणि मग सगळी कुम्भारा'च्या कम्पूतली शिस्तबद्ध गाढवे जमतात... आणि सुरू होतात! बाबा-बुवांना शिव्या घालता घालता... हिन्दु देवदेवतांचीही टर उडवली जाते... रामाला लाचार केले जाते... लक्ष्मणाला अपशब्द वापरले जातात.... पण त्याचं गाढवांना काय हो! ... गाढवंच ती.... बुद्धीचा काय सम्बंध?... कुम्भार स्वतःच निर्बुद्ध असल्यावर गाढवांकडून तरी काय अपेक्षा करणार ? :| आता या समूहातली कुम्भाराची गाढवे कोणती? भाड्याने आणलेली कोणती ? ... हे मात्र सांगणं.. मुश्कील होतं! ;) पण सांगायचा उद्देश इतकाच... की गाढवांना तोटा नाही हो!!....

In reply to by मृगनयनी

तुमच्या त्या "युद्ध कोणी दुसराच करणार। मी वानर बसून खाणार" असल्या महावाक्याने आमच्या भावना दुखावतात त्याचे काय? आम्ही घेतला का कधी आक्षेप त्यावर. प्रत्येकाला आपापल्या बुद्धीचे प्रदर्शन करण्याची समान संधी असावी.

माताय पॉपकॉर्न, चणे, दाणे, लाह्या जे काय मिळेलत ते घेउन या रे. झाडावर जागा रिझर्व करुन बसलो आहे. आवांतरः बाकी आम्हाला अ.बापुंचा फोटु पाहिला की खात्यापित्या चाळीतला गवळी भाई आठवतो. (कर्णिने नाय हो चेहर्‍या मोहर्‍याने. ;) )

In reply to by अनाम

खरं हो... माझ्या एका साध्यासुध्या मित्रानं एका पानपट्टीवाल्याला विचारलं होतं.. तुम्ही अरुण गवळींचा फोटो का लावलाय दुकानात म्हणून.. बिच्चारा.. आता साधी विडी घ्यायला तो पानपट्टीवाला सोडुन पुढच्या चौकात पायपीट करत जावं लागतं बिचार्‍याला.. बाकी चालु द्या...

In reply to by अर्धवट

माझ्या एका साध्यासुध्या मित्रानं एका पानपट्टीवाल्याला विचारलं होतं.. तुम्ही अरुण गवळींचा फोटो का लावलाय दुकानात म्हणून.. बिच्चारा.. अगायायायायायाया...खपलो वारलो हसून हसून

In reply to by यशोधरा

पॉपकॉर्न वगैरे आपापलं आणायचं गं... पण हरकत नाही. नीट सांभाळून बस. पडशील एखाद वेळेस हसताना वगैरे... हे घे

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मी तर या प्रतिसादाच्या शिर्षकाचा आधी भलताच अर्थ घेतल्याने जागा पकडून बसणार होतो ;) पण नंतर कळले की हे दोन आयडीज ना उद्देशून संबोधन आहे, एकाच आयडीला नाही. :-) आणि काहीच थ्रील वाटेनासे झाले. :(

In reply to by विकास

विकासदादा,आलाच आहात तर बसा थोडावेळ, हे बिपिनदादा महाराजांनी आणलेले पॉपकॉर्न खाऊन जा. पॉपकॉर्नची इच्छा केली की पॉपकॉर्न हजर! समस्त बापू लोकांला हे कांपिटीशन व्हनार हाय! अवांतरः बिपिनदादा थँक्यू :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हा भला थोरला पॉपकॉर्नचा फोटो इथून कृपया कुणी संपादक काढून टाकेल काय? स्क्रोल करताना मधेच येतो आणि भातातल्या खड्या सारखा खटकतो.

In reply to by सहज

सुरवातीला लोकांचे प्रॉब्लेम सोडवा. ते सुटले की बायप्रॉडक्ट = ऑपॉप भक्त!
असहमत!! ;) आमच्या शेजारच्या बिल्डींगमध्ये एका गुजराथी बाईच्या नवरात्रीच्या दिवसांत अंगात येत असे. एकदा तिने सांगितले की इथे कोणाची तरी आंगठी हरवली आहे आणि ती समोरच्या खांबाच्या उजवीकडे पडली आहे. अहो! काय आश्चर्य? आंगठी लगेच मिळाली. लोकांनी बाईंच्या पायावर लोळण घेतली. दुसर्‍या दिवशी बाईंचे शेजारी सांगतात की ती आंगठी बाईंचीच होती. गेली कित्येक वर्षे त्यांच्या बोटात पाहिली होती. यावरून, स्वतःचे प्रॉब्लेम सोडवले तरी भक्त मिळतात असे वाटते. ;)

In reply to by Nile

अरे तु तर बिकाबाबाला शरण गेला आहेस ना? तरी तुला प्रॉब्लेम्स? मार्केट डाउन करु नकोस बिकाबाबांचे!

In reply to by सहज

तेहेतीस कोटी देवांवर श्रद्धा ठेवणारे आम्ही दोन बाबांचे अनुयायी नाही का होउ शकत? (तिकडे साउथ मध्ये आंबाबाई (की भगवान) अन तो कल्की नाही का "नवरा-बायको" अवतार? दोघांना फुल्ल मार्केट आहेच. तुम्ही आणि बिका दोघे साटेलोटे करुन वेळा ठरवुन घ्या, एक बॉम्बे स्टाक एक्स्चेंज दुसरा एन. वाय! ;-) )

In reply to by Nile

>आम्ही दोन बाबांचे अनुयायी नाही का होउ शकत? ...तुम्ही आणि बिका दोघे साटेलोटे करुन वेळा ठरवुन घ्या इथे मी बाबा / बापू/ बुवा / गुरु इ. कसलाही दावा न करता, नाईल स्व:ताच अनुयायी व्हायला उतावीळ दिसतोय. यावरुन पहीला अनुयायी कसा 'मिळतो' याचे प्रात्याक्षीक मिळाले की.

In reply to by सहज

वा तुम्ही आमचे सगळे प्राब्लेम सोडवणार असाल तर तुम्हाला बाबाच काय देव पण करुन टाकु की आम्ही. =)) पण आधी प्राब्लेम्स सोडवा मग करु.

कुठल्याही व्यक्तिला नेहेमीच अद्भुताचे अलौकिकाचे वेड असते. मुळात कुठलाही माणुस जन्मजात निरीश्वरवादी नसतो. त्याच्या आयुष्यातील काही घटना त्याच्या परमेश्वरावरची श्रद्धा एकतर अजुन प्रगाढ करतात किंवा त्याला नास्तिक बनवतात. परमेश्वरावरची श्रद्धा ही आयुष्यातल्या अनपेक्षिताचे पडसाद असतात. अनपेक्षितपणे चांगली गोष्ट घडली तर परमेश्वरावरची श्रद्धा वाढते आणि अनपेक्षित आरिष्टामुळे तोच माणुस नास्तिकही बनु शकतो. कुठल्याही बुवा बाबावरची श्रद्धा ही त्या परमेश्वरावरच्या श्रद्धेचे एक्स्टेंशन असते. बुवा किंवा बाबांवरचे श्रद्धा ही एखाद्या माणसाची मानसिक गरजही असु शकते. कधीकधी ही मानसिक गरजच अध्यात्माचे स्वरुप धारण करते. एखाद्याला नैराश्येच्या गर्तेतुन जो बाहेर काढतो तोच माणुस त्याच्यासाठी मग परमेश्वराचा अवतार बनतो. मानसिक आजार हा जागातला सर्वात मोठा आजार आहे. प्रत्येक माणुस कधी ना कधीतरी डिप्रेशन मधुन जात असतो. त्यावेळेस जर त्याला अश्या मानसिक आधारतुन काही फायदा होत असेल तर वाईट काहीच नाही. राहता राहिल प्रश्न पहिला अनुयायी मिळायचा. तर या प्रश्नाचे उत्तर बापुच जाणोत.

In reply to by मृत्युन्जय

मुळात कुठलाही माणुस जन्मजात निरीश्वरवादी नसतो.
साफ असहमत. घरून बंबार्डींग झाल्यामुळेच माणूस, खरंतर मुलं, देवावर विश्वास ठेवायला शिकतात. एखाद्या घटनेमुळे निरीश्वरवादी होणारा माणूस माझ्यातरी बघण्यात नाही; (माझ्यासकट) माझे अनेक मित्र निरीश्वरवादी आहेत, ते सगळे व्यवस्थित विचार करून या विचारापर्यंत आले आहेत. हा दुसर्‍या चांगल्या चर्चेचा विषय होऊ शकतो. पण तरीही मूळ गृहितकाला साफ विरोध!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुळात कुठलाही माणुस जन्मजात निरीश्वरवादी नसतो. ठीक आहे मी वेगळ्या शब्दात मांडतो मुळात कुठलाही माणुस जन्मजात आस्तिक नसतो तसा निरीश्वरवादीही नसतो

In reply to by मृत्युन्जय

निरीश्वरवादी नसतो हे मान्य (कारण ईश्वर म्हणजे काय हे कुठे माहिती असते?) पण मूल अश्रद्ध मात्र असते. म्हणजे आपली आई आपल्याला दूध देणार आहे अशी श्रद्धा नसते त्यामुळे ते दूध मिळेपर्यंत रडत असते. किंवा आपले खेळणे घरी आलेले पाहुणे बाळ घेऊन जाणार नाही अशी श्रद्धा त्याला ठेवता येत नाही. पहिले काही दिवस आई शाळेत सोडते तेव्हा ती थोड्यावेळाने आपल्याला घेऊन जाणार आहे ही श्रद्धा नसते. :) ही श्रद्धा अनुभवांती निर्माण होत जाते.

In reply to by नितिन थत्ते

उदाहरण चुकीचे आहे असे वाटते. असे बघा. या बाबतीत लहान मुलांचेच कशाला मोठ्या माणसांचे पण उदाहरण घ्या ना. मोठेपणी तुम्ही म्हणता तशी श्रद्धा निर्माण झालेली असते तरी माणुस दु:खीकष्टी होतो , टेन्शन घेतो. आणि हे सगळे तो देवावार किंवा बाबावर श्रद्धा असुन करतो. लहान मुलांचे तसेच आहे. श्रद्धा किंवा विश्वास म्हणा हवा तर, त्यांनाही असतो. पण रडणे ही स्वाभाविक क्रिया असते. मोठा माणुस प्रार्थना करतो, लहान मुले वेगळ्या प्रकारे व्यक्त करतात एवढेच.

In reply to by मृत्युन्जय

परमेश्वरावरची श्रद्धा ही आयुष्यातल्या अनपेक्षिताचे पडसाद असतात. अनपेक्षितपणे चांगली गोष्ट घडली तर परमेश्वरावरची श्रद्धा वाढते आणि अनपेक्षित आरिष्टामुळे तोच माणुस नास्तिकही बनु शकतो.
आज पर्यंत मी ज्या ज्या अंधश्रद्धाळु लोकांना माझा देव नावाच्या फुटकळ संकल्पनेवर विश्वास नाही असे सांगितले आहे त्यांचे मला साधारण एकाच अर्थाचे उत्तर येते "तुझ्यावर अजुन प्रसंग*/वेळ नाही आला/ली" . इथे हे प्रसंग/वेळ म्हणजे फक्त वाईटच असतात, जिथे मनुष्य असहाय्य असतो ते पसंग. त्यामुळे तुमचे वाक्य खंप्लिट रांग आहे इतके नमुद करतो. आपलं तर सपष्ट मत आहे, जे माहित नव्हतं त्याला 'देव' नाव दिलं का साला ताप नाय डोक्याला. अहो, लहानपणी आईबाप आपल्या पोराला "आइच्या पोटात बेबी कुठुन आली"चं उत्तर देवाची कृपा देतात ना तसेच. ज्यांची बुद्धी काही गोष्टी समजुन घेण्यात अपरी असते त्यांच्या तब्येतीला देव संकल्पनेच्या कुबड्या बरोबर मानावतात. बुद्धीने धडधाकट असलेल्यांना अश्या कुबड्यांची गरज कशाला? *(हा प्रसंग म्हणजे अतीप्रसंग नाही बरंका रे चावट परा)

In reply to by Nile

आज पर्यंत मी ज्या ज्या अंधश्रद्धाळु लोकांना माझा देव नावाच्या फुटकळ संकल्पनेवर विश्वास नाही असे सांगितले आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात फरक आहे नाही का? त्यांचे मला साधारण एकाच अर्थाचे उत्तर येते "तुझ्यावर अजुन प्रसंग*/वेळ नाही आला/ली" . इथे हे प्रसंग/वेळ म्हणजे फक्त वाईटच असतात, जिथे मनुष्य असहाय्य असतो ते पसंग. त्यामुळे तुमचे वाक्य खंप्लिट रांग आहे इतके नमुद करतो. इतरांनी काय सांगितले त्याच्यावरुन माझ्या मतावर भाष्य करु नये हे उत्तम. देवावर विश्वास चांगल्या गोष्टींमुळे सुद्धा बसतो. आणि कधी कधी कुठलीही चांगली वाईट घटना न घडता सुद्धा बसतो. मी या प्रकारातला श्रद्धाळु आहे. आणि जर तुमचा देव नावाच्या संकल्पनेवर विश्वास नसेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. श्रीराम लागूंचा देखील नाही आहे. लाखातल्या ५-७ लोकांचा नसल्यामुळे देव नावाची संस्था नष्ट होत नाही. बाकी हा फुटकळ शब्द काही रुचला नाही. असो. तुमची मर्जी. देव करो आणि तुमचा स्वत:च्या संकल्पनेवरचा विश्वास अढळ राहो. आपलं तर सपष्ट मत आहे, जे माहित नव्हतं त्याला 'देव' नाव दिलं का साला ताप नाय डोक्याला. उदा? अहो, लहानपणी आईबाप आपल्या पोराला "आइच्या पोटात बेबी कुठुन आली"चं उत्तर देवाची कृपा देतात ना तसेच. ज्यांची बुद्धी काही गोष्टी समजुन घेण्यात अपरी असते त्यांच्या तब्येतीला देव संकल्पनेच्या कुबड्या बरोबर मानावतात. बुद्धीने धडधाकट असलेल्यांना अश्या कुबड्यांची गरज कशाला? उदा? बाकी देव कुबडी म्हणुन वापरत असाल तर तुम्ही दुबळे नक्कीच. पण माणुस दुबळा आहे म्हणुन देव अस्तित्वात नाही असा अर्थ तर होत नाही ना? बाकी तुम्ही खंप्लिट रांग म्हणा आम्ही खंप्लिट करेक्ट म्हणतो. फरक कोणाला पडतो इथे?

In reply to by मृत्युन्जय

श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात फरक आहे नाही का?
एखाद्या आपली श्रद्धा हीच अंधश्रद्धा आहे हे माहित नसेल तर तो तिला श्रद्धाच म्हणतो. नागाची पुजा, वडाच्या झाडाची पुजा वगैरे लोक श्रद्धेनेच करतात. पुर्वी आकाशात स्वर्ग आहे आणि जमिनीखाली नरक आहे अशीही लोकांची श्रद्धा होती, अजुनही असेल काहींची.
देव नावाची संस्था नष्ट होत नाही.
देव नावाची संस्था कशी आहे काय आहे वगैरे सांगितलेत तर बरे होईल. अश्या कुठल्याही संस्थेबद्दल ऐकुन नाही.

In reply to by मदनबाण

बाकी काहीही म्हणा, एवढं लोळून लोळूनच जायचं तर तेवढी विल-power हवीच...आणि लोळणे, घास खाणे आणि एका पायावर ६ महिने उभे राहणे यापलीकडे या बाबाने काही केलं दिसत नाही.. तेवढं करायलाही मानसिक ताकद हवीच म्हणा.. असो..तुमचं चालु द्या.

परिस्थितीने गांजलेले लोक पाहून त्यांना जपजाप्य किंवा तत्सम प्रकार करायला सांगायचे. बर्‍याच लोकांना असं सांगितलं की योगायोगाने एखाद्याची परिस्थिती आपोआप सुधारते. त्याला वाटतं बाबाची कृपा! झालं मिळाला अनुयायी आणि प्रचारक.

बाय.. एवढे विवीध उपाय मिळतायत तुला.. ट्राय नक्की कर.. पीआर चं काम मला बरंका.. मीडिया वगैरे सगळ मॅनेज करतो नीट.. बाकी टक्केवारीचा व्यनी केलाय.. थोडं मागंपुढं करून करुन टाकु..

In reply to by बिपिन कार्यकर्ते

लगेच श्री.* अदिती अम्मा देवी डोळ्यासमोर हुब्या र्‍हायल्या. *श्री का लिहिले म्हणून विचारू नये!

In reply to by अनामिक

अनामिक देवा, माझा अभ्यास नको तिथे चांगला आहेच. ;-) असो. पहिला अनुयायी कसा मिळवला याच्या गोष्टी कोणीही देत नाहीये. अजून काही महिन्यांनी ही नोकरी संपली की काय करावं हा प्रश्न अजून सुटलेला नाहीये. मायबाप मदत करा हो!

In reply to by अनामिक

एकच श्री लिहिल्या बद्दल जाहीर निषेध. बाबा आणि अम्मांना किमान दोन श्री लावले पाहिजेत असा नियम आहे हे तुम्हाला माहिती नाही वाटतं.

धाग्यात दिलेली तीन लक्षणेच पुरेशी आहेत पहिला भक्त मिळवायला. तरीही बरेच दिवस वाट पहावी लागेल असे दिसताच सर्वसाधारणपणे लोक करू धजावणार नाहीत असे धाडसी विधान करावे. त्याप्रमाणे वागावेच लागते असे नाही, पण नुसते म्हणत रहावे. आश्चर्यचकित झालेल्यांपैकी एकतरी मासा गळाला लागतो असा स्वानुभव आहे. ;)

चार शिकलेले मित्र एका ठिकाणी रात्री दारु पित बसले होते. त्याच्या व्यवसायाबद्दल गप्पा चालु होत्या. विषयाविषयातुन एकाने त्याना एका नावाजलेल्या संताबद्दल व त्याच्या वस्तुबद्दल माहिती दिली. अमुक ह्या संताने त्याच्या वस्तु अमुक ठिकाणी एका व्यक्तीजवळ ठेवल्या आहेत. व सदर वस्तु परत नेण्याकरिता पुढच्या जन्मी परत येईन असे सांगितल्याचे कथन केले. त्यातल्या एका मित्राची ट्युब पेटली. त्याने काही दिवसानंतर त्या व्यक्तीच्या घरी जावुन मी संत असुन मागच्या जन्मीच्या ह्या ह्या वस्तु मला परत करा म्हणुन सांगितले. काही वेळा नंतर त्या कुंटुबाची खात्री पटली कि तो संत परत जन्म घेवुन वस्तु परत मागायला आला आहे. मग काय वस्तु मागणारा फुल्ल टाईम बाबा बनला. असे काय घडले तर तुम्ही पण बाबा किंवा अम्मा बनु शकता.

In reply to by अर्धवट

उद्या तुमच्याकडे येउन "तुमच्याकडे कोणीही कुठल्याही वस्तु ठेवलेल्या नाहीत असे" तुम्हाला सांगुन मी बाबा बनु शकतो काय? ;)

कोणाही भोवती किमान पाच दहा विश्वासू लोकांची गर्दी असतेच... मग त्या पाच दहा जणांना तुम्ही तुम्हाला झालेला साक्षातकार सांगीतला तर २-४ जणांचा तरी विश्वास बसेलंच, झाले अनुयायी तय्यार! आणि मग ही चेन अ‍ॅमवे सारखी वाढतच जाणार, नाही का?

द्विशतकी धागा दिसतोय... आमच्यापेक्षा भारी आईडिया सुचली आदितीमायेला... ;)

मिरासदारांची "एका भुताचा जन्म" ही कथा अवश्य वाचावी.

धागालेखिकेचा उद्देश श्रद्धावंतांची टवाळी करण्याचा नसावा असं वाटतंय, म्हणून हा प्रतिसाद लिहिण्यासाठी वेळ घालवायला हरकत नाही. लेखात असा प्रश्न उपस्थित केलेला आहे, की “या बाबा, बुवा, माता, बापू, स्वामी, गुरुंना अनुयायी मिळतातच कसे?” मला वाटतं असाच प्रश्न श्रद्धावंतांनापण पडू शकतो, की या अश्रद्धांना कसं काय वाटत नाही, आपण गुरूला शरण जावं, जगण्याचा अर्थ समजून घ्यावा. हे स्वत:ला इतकं शहाणं समजतात, तरी इतके अज्ञानी असतात, स्वत:च्या शिरावर जगण्याचा भार घेऊन दु:खी आयुष्य जगत राहतात. अश्रद्ध म्हणतो, you show me first, then I believe. सश्रद्ध म्हणतो, you believe, and you shall see. हा तिढा केंव्हाच सुटणे शक्य नाही. आयुष्याकडे बघण्याचे दोन अतिशय भिन्न असे हे कोन आहेत. या दोन्ही भूमीकांमध्ये कुठलीच भूमीका त्याज्य असण्याचं काहीच कारण नाही. रामकृष्ण परमहंस आणि ईश्वरचंद्र विद्यासागर ही दोन उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. पहिले टोकाचे सश्रद्ध; इतके की ज्या कालीला बघायची आस होती ती दिसत नाही तर आपली मुंडी कापून घ्यायला तयार झाले. दुसरे म्हणायचे काय करू मी त्या कालीला बघून? ती आहे की नाही हेपण नक्की माहीत नाही. समजा असली, तरी ती दिसून काय फरक पडणार आहे, जगातली दु:खं कमी होणारेत का? पण दोघांनाही एकमेकांच्या मार्गांविषयी हरकत नव्हती. ईश्वरचंद्र कधी रामकॄष्णांना वेडा म्हणाले नाहीत, आणि रामकृष्ण त्यांना कधी मूर्ख म्हणाले नाहीत, उलट म्हणाले, त्यांच्या हृदयात मानवप्रेमाचा ईश्वर वास करतोय, त्यांना कालीच्या दर्शनाची आवश्यकता नाही. असो. आता “बाबा, बुवा, माता, बापू, स्वामी, गुरुंना” अनुयायी मिळण्याविषयी. ही तर आपल्या देशात चालत आलेली हजारो वर्षांची परंपरा आहे. यांना अनुयायी मिळतातच कसे, किंवा पहिला अनुयायी कसा काय मिळतो हा प्रश्न पडायचे खरे तर कारण नाही. प्रश्न पडला आहे, कारण मला वाटतं लेखिका आपल्या दृष्टीकोनाशी ठाम आहे. इतकी ठाम, की दुसरा दृष्टीकोन असूच शकत नाही, असलाच, तर तो बरोबर/ योग्य असू शकत नाही असं तिला वाटत असावं. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, अरविंद, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदासादि संत यांच्याविषयी तिची काय मते आहेत हे जाणून घ्यायला आवडेल. तात्पुरते असे गृहीत धरतो, की तिच्या मते हे लोक भोंदू नाहीत. यांच्याविषयी प्रचलित असलेल्या चमत्कारांच्या कथांविषयी मी काही बोलणार नाही. पण यांच्या साहित्यात लोकशिक्षणासोबतच अनेक गूढ आध्यात्मिक अनुभूतींचे वर्णन आहे. ते नाकारणार का? आणि अशा गूढ आध्यात्मिक अनूभूतींची वर्णने वर्षानुवर्षे चालत आलेली आहेत, आणि अशा व्यक्तींना आपला समाज वंदनीय ठरवीत आलेला आहे. त्यांना वेडं ठरवलेलं नाही. वरील मान्य असेल, तर आता मुद्दा येतो, की खरा गुरू कोण आणि खोटा कोण. (वरील मान्य नसेल तर मुद्दा निकाली निघाला! सगळेच “गुरू” खोटे!) यावर वेळोवेळी अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींनी भाष्य केलेले आहे. गौतम बुद्धापासून विवेकानंदांपर्यंत अनेक विभूतींनी अशा खोट्या बुवांची लक्षणे सांगीतलेली आहेत. रामकृष्णांनी नागाचा आणि साध्या सापाचा दृष्टांत दिलेला आहे. विवेकानंद म्हणतात जिथे अस्सल आहे, तिथे नक्कल असणारच. जास्त फायदा असेल तर नक्कल नक्कीच असणार. खरे गुरू, खरं अध्यात्म आहेच आहे, म्हणूनच खोटे भोंदू गुरू, खोटं अध्यात्म पण आहे. एक खरा गुरू असेल तर हजार/ लाख भोंदू बाबा निघणारच. कोण भोंदू आणि कोण सद्गुरू हे ज्याचे त्याने आपल्या विवेकबुद्धीने, अनुभवाने ठरवावे. गजानन महाराज, अनिरुद्ध बापू, साईबाबा यांच्याविषयी मला विशेष माहिती नाही. त्यांचे काही साहित्य (असल्यास) वाचलेले नाही. त्यांनी काही ध्यान पद्धती शिकवली असल्यास माहीत नाही. त्यांनी कुणाला लुबाडले आहे की कसे, हे माहीत नाही. त्यांच्या शिष्यांपैकी कुणी (सार्वजनीक आयुष्यात) आउटस्टॅंडींग पर्सनॅलिटी आहे की नाही तेही माहीत नाही. त्यामुळे ते भोंदू की सद्गुरू याविषयी मला काहीच बोलता येणार नाही. कुणाच्या मते ते भोंदू असतील तर तसे त्यांनी दाखवून द्यावे. उगीच टवाळी कशाला करायची? अशा बाबांवर श्रद्धा ठेवणारे लोक असतात त्यांची उगाच खोड काढून कसला विकृत आनंद मिळतो हे माझ्या समजण्यापलीकडचे आहे. जर या भोंदू बाबांच्या तावडीत सापडलेल्या बिचाऱ्यांची दया येत असेल, तर भोंदू बाबांचे अध्यात्म कसे चुकीचे आहे, आणि व्यक्तीसाठी आणि समाजासाठी कसे हानीकारक आहे याची चर्चा जरूर व्हावी. आम्ही बघा कसे शहाणे, हे बाबा लोकांकडे आपली बुद्धी गहाण ठेवणारे लोक कसे मूर्ख आहेत, असा फुकाचा अहंकार दाखवून निखळ करमणुकीचाही हेतू साध्य होत नाही, कारण काही लोक त्यात नक्कीच दुखावले जातात. (सहिष्णु)

In reply to by आळश्यांचा राजा

अश्रद्ध म्हणतो, you show me first, then I believe. सश्रद्ध म्हणतो, you believe, and you shall see.
you show me first, then I believe, असे अज्ञेयवादी म्हणतो. अश्रद्ध म्हणतो, आय डोन्ट बिलिव, पिरिअड.