इच्छा
स्वप्नांची सोनेरी किरणे
कष्टांच्या दवबिंदूवर पडू दे.
त्यातून उज्ज्वल यशाचे
इंद्रधनु दिसू दे.
कल्पनांच्या सागरी लाटावर
स्वैरपणे स्वार होवू दे.
त्यातून निसर्गाचे अनेक
पैलू उलगडू दे.
जिज्ञासेच्या पावसात नेहमीचं
चिंब भिजून जाऊ दे.
मनाच्या उत्तुंग भरारीला
अगदी आकाशही कमी पडू दे.
असेच काही माझ्या हातून
घडुन जाऊ दे.
त्या यशाने मायबापांच्या
कष्टाचे पांग फेडू दे.
अंतर्मनातील सुगंध गुलाबपरी
सार्या आसमंतात दरवळू दे.
ज्योतीप्रमाणे अखंड कार्य
करण्याची सुबुद्धी लाभू दे.
प्रेमाच्या व माणूसकीच्या प्रकाशाने
सारे जग दिपून जाऊ दे.
काय मागू तुजजवळ देवा...
जे आहे त्यातचं समाधानी असू दे.
प्रतिक्रिया
छान आहे...पण तुम्ही हे असलं
नाव हटके हवं ना!!!
पोरी.. मस्त आहे गं कविता.