✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

समिकरणे

क — क्रान्ति, गुरुवार, 08/19/2010 - 21:26
उणे अधिक का उणे? न कळली ही समिकरणे गुणिले सुख, भागिले दु:ख, उरली मग स्मरणे! बुडायचे तर ठरले होते, ठरले नव्हते बुडता बुडता तुला पाहुनी अलगद तरणे दु:खाला का असते उंची, लांबी, रुंदी? सुख मोजाया कुठली वजने अन् उपकरणे? जगण्यासाठी मला आणखी काय हवे रे? तुझे ध्यास, आभास, श्वास माळून विहरणे म्हणे, "वाचले सखी तुझे मन!" (वगळुन सारी अधोरेखिते, विरामचिन्हे अन् अवतरणे!)

प्रतिक्रिया द्या
3131 वाचन

💬 प्रतिसाद (15)

छान कविता. शेवटची ओळ कंसात

अनामिक
गुरुवार, 08/19/2010 - 21:52 नवीन
छान कविता. शेवटची ओळ कंसात का टाकली?
  • Log in or register to post comments

ती ओळ

क्रान्ति
गुरुवार, 08/19/2010 - 22:30 नवीन
स्वगत असल्यामुळे कंसात टाकली आहे.
  • Log in or register to post comments

कविता आवडली

पुष्करिणी
गुरुवार, 08/19/2010 - 22:31 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments

वृत्त फार कठिण

धनंजय
Fri, 08/20/2010 - 06:21 नवीन
मला वृत्त/बहर समजू येत नाही. मात्र क्रान्ति यांची रचना असल्यामुळे "वृत्त नाही" असे म्हणायला कचरतो.
  • Log in or register to post comments

हे ही छान. जगण्यासाठी मला

राघव
Fri, 08/20/2010 - 10:08 नवीन
हे ही छान. जगण्यासाठी मला आणखी काय हवे रे? तुझे ध्यास, आभास, श्वास माळून विहरणे ही द्वीपदी खूप आवडली.
  • Log in or register to post comments

दु:खाला का असते उंची, लांबी,

मदनबाण
Fri, 08/20/2010 - 15:43 नवीन
दु:खाला का असते उंची, लांबी, रुंदी? सुख मोजाया कुठली वजने अन् उपकरणे? अ प्र ति म. . . :)
  • Log in or register to post comments

अगदी असेच म्हणतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 08/21/2010 - 19:48 नवीन
दु:खाला का असते उंची, लांबी, रुंदी? सुख मोजाया कुठली वजने अन् उपकरणे? अ प्र ति म. . . -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मस्त ग तै. स्वगत एकदम जास्ती

परिकथेतील राजकुमार
Fri, 08/20/2010 - 15:57 नवीन
मस्त ग तै. स्वगत एकदम जास्ती आवडले.
  • Log in or register to post comments

छान..

विसोबा खेचर
Sat, 08/21/2010 - 10:42 नवीन
छान..
  • Log in or register to post comments

झकास.... पहिल्या कडव्यात मीटर

घाटावरचे भट
Sat, 08/21/2010 - 15:32 नवीन
झकास.... पहिल्या कडव्यात मीटर समजायला जरा अडचण पडते, दुसर्‍या कडव्यापासून मीटर नीट क्लीअर होते.
  • Log in or register to post comments

बरोबर

धनंजय
Sat, 08/21/2010 - 20:05 नवीन
दुसर्‍या कडव्यापासून मीटर असे आहे : ८ || ८ || ८ मात्रा मात्र असे असल्यास पहिल्याच कडव्यात यतिभंग होतो आहे. अनुभवी क्रान्ति असे वैचित्र्य कशामुळे आणत आहेत? मुद्दामून केलेल्या यतिभंगाचा (मुद्दामून घातलेल्या वर्ज्य स्वरासारखा) भावनेशी किंवा सौंदर्यानुभवाशी काही संबंध असावा. मात्र मला तो येथे कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

यतिभंग होत असला, तरी एक

प्रशांत उदय मनोहर
Tue, 08/31/2010 - 12:39 नवीन
यतिभंग होत असला, तरी एक उत्कृष्ठ "चमत्कृती" निर्माण होत असल्यामुळे (मलातरी) खटकत नाही. एखादी तान किंवा आलाप घेऊन एक मात्रेतलं तोंड दीड, सव्वा, पाऊण किंवा अर्ध्यामात्रेत घेऊन समेवर येण्याची जी मजा आहे तसा प्रकार आहे त्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

मस्तच !!

अनिल हटेला
Sat, 08/21/2010 - 19:38 नवीन
सुंदर रचना !! आवडली !!! :)
  • Log in or register to post comments

मस्तच

विलासराव
Tue, 08/31/2010 - 12:43 नवीन
लिहा अजुन.
  • Log in or register to post comments

कविता चांगली आहे

राजेश घासकडवी
Tue, 08/31/2010 - 13:30 नवीन
पण काहीतरी खटकलं. हे अर्थातच क्रान्तिंनी निर्माण केलेल्या उंच मानदंडांपोटीच... मोजमापांच्या, समीकरणांच्या, सिंटॅक्सच्या थीममध्ये पाचपैकी फक्त तीन कडवी बसतात. बुडायचे तर ठरले होते, ठरले नव्हते बुडता बुडता तुला पाहुनी अलगद तरणे ऐवजी बुडायचे तर ठरले होते, ठरले नव्हते त्या खोलीच्या अथांगतेने मी गुदमरणे असं काही जास्त शोभून दिसलं असतं... पुन्हा कवयित्रीची कविता कशी असावी हे सांगण्यापेक्षा, मुळात काय अपेक्षा निर्माण झाल्या होत्या ते सांगण्याचा प्रयत्न आहे. जर गजलच्या गुच्छात तीन लाल व दोन निळी फुलं ठेवून मुद्दाम उठाव देण्याचा प्रयत्न असेल तर... व्यक्तीशः मला तो विशेष आवडला नाही असंच म्हणावं लागेल.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा