उणे अधिक का उणे? न कळली ही समिकरणे
गुणिले सुख, भागिले दु:ख, उरली मग स्मरणे!
बुडायचे तर ठरले होते, ठरले नव्हते
बुडता बुडता तुला पाहुनी अलगद तरणे
दु:खाला का असते उंची, लांबी, रुंदी?
सुख मोजाया कुठली वजने अन् उपकरणे?
जगण्यासाठी मला आणखी काय हवे रे?
तुझे ध्यास, आभास, श्वास माळून विहरणे
म्हणे, "वाचले सखी तुझे मन!" (वगळुन सारी
अधोरेखिते, विरामचिन्हे अन् अवतरणे!)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3142
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कविता. शेवटची ओळ कंसात
ती ओळ
कविता आवडली
वृत्त फार कठिण
हे ही छान. जगण्यासाठी मला
दु:खाला का असते उंची, लांबी,
अगदी असेच म्हणतो
In reply to दु:खाला का असते उंची, लांबी, by मदनबाण
मस्त ग तै. स्वगत एकदम जास्ती
छान..
झकास.... पहिल्या कडव्यात मीटर
बरोबर
In reply to झकास.... पहिल्या कडव्यात मीटर by घाटावरचे भट
यतिभंग होत असला, तरी एक
In reply to बरोबर by धनंजय
मस्तच !!
मस्तच
कविता चांगली आहे