गुगलवीन नाही दुजा आधार
कधीकाळी आकाशवाणीवर सकाळच्या वेळेस ऐकलेले "गुरूवीण नाही दुजा आधार" हे गाणे आठवले. अर्थात त्याचे कारणः यंत्राच्या प्रभावावरील लेख आहे, पहीला अनुयायी कसा मिळवावा हे नाही. :-)
तर जो शिष्याला ज्ञान देतो, जगण्याचा मार्ग दाखवतो, दिशा देतो वगैरे वगैरेला आपण गुरू म्हणतो. तो अध्यात्मिकच असला पाहीजे असे अजिबात नाही. म्हणून "गुरूवीण नाही दुजा आधार" म्हणले आहे. आता प्रत्येकाला गुरू असतोच असे नाही. पण जसे प्राईसलेस गोष्टी सोडल्यावर इतर गोष्टींसाठी मास्टरकार्ड असते, तसेच सध्या गुगलचे झाले आहे... म्हणजे, व्यावहारीक जगतात पुस्तके, भेटीगाठी, लाईव्ह कार्यक्रम वगैरे आहेत, पण ते मिळत नसेलेल्या इतरांसाठी "गुगल आहे"!
म्हणूनच म्हणावेसे वाटते की, "गुगलवीन नाही दुजा आधार" अशी अवस्था नकळत होत असताना आपल्याला वास्तवाचा विसर तर पडलेला नाही ना? जे गुगल दाखवते तीच काय ती माहीती, तोच काय तो (गुगल मॅप्सवरचा) मार्ग आणि तोच काय तो (जी टॉकवरील) संवाद असे आपले कितपत होत आहे?
आपण माहीती मिळवण्याकरता केवळ गुगलवर अवलंबून असता का प्रत्यक्ष ग्रंथालयात अथवा इतर विशेष जालीय सेवा देखील वापरून मुळापासून वाचता? आपण केवळ चॅटवरील संवादात समाधान मानता का प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न देखील करत असता?
तसे म्हणाल तर गुगल हे प्रातिनिधिक आहे, हा प्रश्न आंतर्जालासंदर्भातच आहे. आपण वास्तव विश्व आणि कल्पनाविश्व यातील सीमारेषा किती धूसर करत आहोत या संदर्भात.
या चर्चेत वरील प्रश्नांव्यतिरीक अजून गुगल (तत्सम सेवा) चा आपण कशाकशासाठी वापर करता (उ.दा. शोध, बुक्स, फोटो, वगैरे..) हे देखील सांगू शकता. सरते शेवटी जर उद्या गुगल (कुठलेही "शोधयंत्र") बंद पडले तर नक्की आपल्यावर काय परीणाम होईल असे वाटते?
प्रतिक्रिया
धाग वाचुन नुकतेच कांचनतै कराई
बाप्पा!!!!! कीती रे मराठी
परा शेठ ! दिलेली लिंक खरोखर
:-)
भास
ते ही खरेच आहे...
मोजक्या शब्दात खूप छान मुद्दा
माहीती मिळवण्यासाठी
"माहित नाही तर गुगल कर"
गुगलणे
सगळ्याच गोष्टी आपल्याला आणि
(विषय दिलेला नाही)
लै भारी..
शोधयंत्र बंद पडलं की आमच्या
डॅन ब्राउनच्या नॉवेल्समधे
+१
+२
+३
साधे उदाहरण देतो. परवा मी
मला देखील बरेचदा गुगल चा
विश्वसनीयता
चीन मध्ये एकाचेही गुगल वाचून खेटर अडत नाही. आणि आपण ?
:-)
पण काहीही झाले तरी मेराइच भारत महान.
+१
>>वरचा गांचावादी यांचा
गांचावादी शब्द लै आवडला. अर्थ
आमच्या आयटी कंपन्या
गुगर्ल