प्रस्तुत धाग्यावर आता २३० पेक्षा जास्त प्रतिसाद आलेले आहेत. यापुढील चर्चेकरता नवा धागा उघडावा.
- संपादक मंडळ
माझा ऑफिसमेट जयंती (हो, हे मुलाचं नाव आहे, जयंती प्रसाद) अधूनमधून 'बाबागिरी'बद्दल बोलतो. 'बाबा' म्हणजे बाबा अथवा वडील नव्हे, "बाबा" म्हणजे भोंदूबाबा, बाबा-बुवा-बापू-माता-गुरू मधले बाबा! कालसुद्धा जयंती अमका माणूस फारच बाबागिरी करतो असं मला सांगत होता. म्हणून मी त्याला व्याख्या विचारली, "'बाबा' म्हणजे नक्की कोण?" त्याचं उत्तर अगदीच चमत्कारिक नसलं तरीही विचार करण्यायोग्य वाटलं. त्याचं उत्तर असं:
बाबा लोकांची तीन (जयंतीच्या बाबतीत ट्रीलॉजी जुनीच आहे.) लक्षणं असतात. यापुढे या लेखापुरतं 'बाबा' आणि बाबा हे शब्द एकच आहेत असं समजावं.
१. बाबा लोकं अखंड उपदेश करतात; पण त्यातल्या अगदी कमी गोष्टी त्यांच्या स्वतःच्या बाबतीत लागू पडतात.
२. बाबा लोकं कधी कोणाचंही ऐकून घेत नाहीत.
३. बाबा लोकांचे प्रचंड प्रमाणात (प्रमाणात हा शब्द महत्त्वाचा, का ते पुढे येईलच) अनुयायी असतात.
प्रमाण हा शब्द अशासाठी वापरला की, तो आमच्या होस्टेलमधल्या एकाला बाबा म्हणतो. होस्टेलमधले १२-१५ पैकी दहा लोकंतरी त्याचे अनुयायी असतात. उदा: तो म्हणाला आज पिझा खाऊया, की कॅण्टीनमधे जेवणारे सगळे पिझा खायला तयार होतात. आपलं म्हणणं कितीही चुकीचं असलं तरी तेच तो पुढे दामटत रहातो. इ.इ.
असो. तर आमचा हा संवाद सुरू असतानाच माझा मोबाईल वाजला, पाहिलं तर एक एसेमेस. त्याकडे मी दुर्लक्ष केलं आणि मुख्य, महत्त्वाच्या गॉसिपकडे लक्ष दिलं. तर पुन्हा एक एसेमेस. तर मग 'टॅम्प्लीस' घेऊन एसेमेस पाहिले. तर आणखी कोणी "गुरू" आणि "बापू" अनुक्रमे मला रूद्राक्ष आणि मणी विकत होते. 'डीएनडी'ला **वर मारणार्या या लोकांना चार भाषांत चार सणसणीत शिव्या हासडून मी पुन्हा जयंतीशी बोलायला गेले तर जयंती स्वतःच "बाबा" बनल्यागत माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करता झाला!
मग मीही त्यालाही **वर मारून पुन्हा मराठी आंतरजालाकडे वळले. पाहिलं तर उपक्रमावर अनिरुद्ध बापूंबद्दल ही चर्चा आली होती. मला प्रश्न असा पडला की या बाबा, बुवा, माता, बापू, स्वामी, गुरुंना अनुयायी मिळतातच कसे? तेव्हा एक त्यामानाने जुना टेडवरचा व्हीडीओ आठवला, हा पहा. पण हे सगळं आपल्याकडे असंच होतं का? म्हणजे या व्हिडीओत डेरेक सिव्हर्स म्हणतो त्याप्रमाणे The first follower transforms a lone nut into a leader. हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा?
वाचने
60466
प्रतिक्रिया
231
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो कसलं काय अन कसलं काय हो!
हे बरोबर बोललास. लोकांनाच
In reply to अहो कसलं काय अन कसलं काय हो! by Nile
गण गण गणात बोते
In reply to हे बरोबर बोललास. लोकांनाच by नगरीनिरंजन
मी दररोज पूजा करतो. तस्मात
In reply to अहो कसलं काय अन कसलं काय हो! by Nile
अशिक्षित अडाणी मजुरांना पुजा
In reply to मी दररोज पूजा करतो. तस्मात by चिन्मना
चुकताय निळुभाउ. रोजची मजुरी
In reply to अशिक्षित अडाणी मजुरांना पुजा by Nile
आक्षेप अंधश्रद्धेला आहे,
In reply to चुकताय निळुभाउ. रोजची मजुरी by मृत्युन्जय
ब्रम्ह तेथे माया, वॄक्ष तेथे
ब्रम्ह तेथे माया, वॄक्ष तेथे
In reply to ब्रम्ह तेथे माया, वॄक्ष तेथे by अप्पा जोगळेकर
अजून चालूच का? बारं.. बाकी
भोंदू बाबा
२००वा प्रतिसाद माझा..
२०१
हॅत्तिच्यायला.....
हा प्रतिसाद इतर कोणाला
In reply to हॅत्तिच्यायला..... by धमाल मुलगा
वाचली नाही! धन्यवाद.
In reply to हा प्रतिसाद इतर कोणाला by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या मुळ प्रतिसादात
In reply to वाचली नाही! धन्यवाद. by धमाल मुलगा
याचप्रमाणे निरीश्वरवाद्यांनी
In reply to माझ्या मुळ प्रतिसादात by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रकाटाआ.
In reply to हॅत्तिच्यायला..... by धमाल मुलगा
मिपाचा धाग्यावरच्या
बाबा-बुवा-माता-बापू हा धर्म
In reply to मिपाचा धाग्यावरच्या by मृत्युन्जय