मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रस्ते बांधणीवर या वर्षी किती खर्च करावा?

नितिन थत्ते · · कौल

वाचने 1286 वाचनखूण प्रतिक्रिया 25

नितिन थत्ते 18/08/2010 - 10:42
दुसर्‍या एका धाग्यात सरकारने काय खर्च करावा यावर आपले काहीच नियंत्रण नसते अशी तक्रार आहे. माझ्या करविवरणाबरोबर हा खर्च किती असावा हे सांगण्याचा चॉईस मला असावा अशी मागणी आहे. म्हणून हा एक अभिरूप कौल आहे. यात मत देणार्‍यांनी दोन आकड्यांपैकी जो आकडा निवडला असेल त्याचे कारण द्यावे असे अपेक्षित आहे.

In reply to by नितिन थत्ते

शिल्पा ब 18/08/2010 - 11:52
आपल्या कौलाने सरकारला काय फरक पडणार आहे...नाही लोक मोर्चा, निषेध वगैरे करूनसुद्धा कशाचाच परिणाम होत नाही म्हणून विचारलं.

In reply to by शिल्पा ब

मदनबाण 19/08/2010 - 15:18
१९७८० कोटीला मत दिले आहे... :) समजा असे रस्ते जर बांधले गेले तर त्यावर दुरुस्ती करण्यासाठी किती कोटीचा निविदा भरला जाईल याचा विचार करत आहे... ;) (पेव्हर ब्लॉकला वैतागलेला ठाणेकर)

नगरीनिरंजन 18/08/2010 - 10:49
रस्त्यांवर कितीही खर्च केला तरी ते सुधारण्याची शक्यता नाही. त्यामुळे माझे ६७८० कोटी वजा करुन १३००० कोटीला मत दिले आहे.

In reply to by नगरीनिरंजन

शिल्पा ब 18/08/2010 - 12:23
रस्ते बांधणीवर कितीही खर्च केला तरी तो ते बांधणाऱ्या कंपनीच्या खिशात जाऊन आपल्या पदरी मात्र खड्डाळलेले रस्तेच येणार हे मात्र नक्की..

राजेश घासकडवी 18/08/2010 - 11:16
या कौलात 'मला यातलं काहीही कळत नाही' असा पर्याय हवा होता.

In reply to by शेखर

नितिन थत्ते 18/08/2010 - 11:37
४ कोटी रु प्रतिकिलोमीटर प्रमाणे ३२५० किमी रस्ते बनवावेत की ४९४५ किमी रस्ते बनवावेत. ३२५० किमी रस्त्यांचा ब्रेक अप ही दिला आहे १ मुंबई-ते उरण ४० किमी २ मोखाडा ते डहाणू ९० किमी ३ घोटी संगमनेर ५० किमी ४ झुमरीतलैया ते पटणा ५ होस्पेट ते गुलबर्गा ६ नेल्लोर ते विजयवाडा वगैरे असा विदा मिळाला तरी १ व २ सोडता उरलेले रस्ते बनवावे की नाही हे 'मी' कशाच्या बेसिसवर ठरवणार? माझ्या दृष्टीने कदाचित ते सारे रस्ते अनावश्यक असतील. घासकडवी म्हणतात तसे बहुतेकांचे उत्तर मला यातले काही कळत नाही (म्हणजे ठरवण्यासाठी लागनारी माहिती माझ्याकडे नाही) असेच असेल. हेच तर या कौलातून दाखवायचे आहे.

परिकथेतील राजकुमार 18/08/2010 - 12:30
खर्च हवा तेवढा करा पण रस्त्यांच्या सुरक्षीततेची गॅरेंटी मिळणार आहे काय ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

नितिन थत्ते 18/08/2010 - 12:34
समजा गॅरंटी मिळाली तर किती खर्च करावे? लिस्ट केलेल्यांपैकी कोणते रस्ते बनवावे कोणते बनवू नयेत?

In reply to by परिकथेतील राजकुमार

नितिन थत्ते 18/08/2010 - 12:35
समजा गॅरंटी मिळाली तर किती खर्च करावे? लिस्ट केलेल्यांपैकी कोणते रस्ते बनवावे कोणते बनवू नयेत?

In reply to by नितिन थत्ते

प्रसाद_डी 19/08/2010 - 11:29
पाहिजे तेव्धा करा पन दुरुस्थि साथि मला क्न्त्राट द्या..... "किति ट्के?" तेव्धे सन्गा करुन टाकु....तुम्चे काय असेल ते... कस...?

llपुण्याचे पेशवेll 18/08/2010 - 12:33
रस्त्यांवर इतका खर्च करण्यापेक्षा त्या पैशात लोकांना रेशनवर दारू द्यावी. त्यामुले सगळे झिंगून गाड्या चालवतील. मग रस्ता चांगला काय वाईट काय काहीच फरक पडणार नाही. (प्रायोगिक) पेशवे किमीला ४ कोटी म्हणजे जरा जास्तच खर्चिक नाही का वाटत आहे? (कंजूष) पेशवे

llपुण्याचे पेशवेll 18/08/2010 - 12:35
रस्त्यांवर इतका खर्च करण्यापेक्षा त्या पैशात लोकांना रेशनवर दारू द्यावी. त्यामुले सगळे झिंगून गाड्या चालवतील. मग रस्ता चांगला काय वाईट काय काहीच फरक पडणार नाही. (प्रायोगिक) पेशवे किमीला ४ कोटी म्हणजे जरा जास्तच खर्चिक नाही का वाटत आहे? (कंजूष) पेशवे

विसुनाना 18/08/2010 - 15:50
१९७८० कोटी ला मत दिले.याहून जास्त रकमेचा पर्याय असता तर त्याला मत दिले असते. जास्त पैसा खर्च केला की तो जास्त लोकांना जास्त प्रमाणात खायला मिळेल.मग ते जास्त लोकांना पार्ट्या देतील, जास्त गाड्या खरेदी करतील, जास्त कपडे -दागदागिने घेतील, जास्त फार्महाऊस बांधतील, निवडणूकीत जास्त पैसा खर्च करतील. अशा रितीने जास्त पैसा जास्त लोकांकडे पोचेल. एकंदर जास्त खर्च केल्याने जास्त लोकांना जास्त पैसा मिळवण्याची जास्त सोपी संधी मिळते. नाहीतरी सगळे लोक पैसा मिळवण्यासाठीच काम करतात ना? मग काम न करता पैसा मिळाला तर काय वाईट आहे? आणि जगायला रस्त्याची गरज नसते- पैशाची असते. रस्ता झाला काय किंवा न झाला काय? काय फरक पडतो? रस्ता बांधला तरी तो शाश्वत थोडाच असणार आहे? खर्च जास्तीत जास्त झाला पाहिजे हे महत्त्वाचे. :)