शांततेचा आवाज... शांततेतला आवाज...
खरंतरं शांतता भंग करणारे
तरीही हवेहवेसे वाटणारे काही आवाज... काही क्षण...
१) भल्या पहाटेच्या प्रसन्न, शांत वातावरणात
कानी पडणारा वासुदेवाचा निर्मळ स्वर...
२) आजी-आजोबांनी मायेने वाढवलेल्या आमराईत निवांत बसलेले असताना
अचानक एखादा आंबा पालापचोळयात पडल्याचा आवाज...
३) रणरणत्या दुपारी कुठूनतरी दूरवरुन
Ice Cream वाल्याच्या घंटीचा आवाज...
४) एकटेपणाचा कंटाळा आलेला असताना, निवांत दुपारी विचार करताना
दार ठोठावून मागाहून "पोस्टमनऽऽ..." अशी साद...
५) नीरव दुपारी अथांग समुद्रातल्या शिडावरुन
ऐकू येणारी नाखवाची हाळी...
६) शांत, भयाण रात्री दूर डोंगरावरच्या मंदिरातून
टाळ मृदंगासह ऐकू येणारे मंजूळ भजनाचे स्वर...
प्रतिक्रिया
दार ठोठावून मागाहून "पोस्टमनऽऽ..." अशी साद...
क्या बात है! मस्त...
फार छान! सगळे आवाज आठवले आणि
अप्रतिम... "माझ्या लहानपणी
लेखक नशीबवान आहेत
शाळेतला अजुन एक आवाज...
सगळेच आवाज ऐकून कान तृप्त झाले
हे शिंतोडे आवडले..