Skip to main content

संयम आणि सबुरीचा महिना - रमजान!

लेखक शाहजहान मगदुम यांनी मंगळवार, 17/08/2010 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
संयम आणि सबुरीच्या धाग्यावर बेसबरीने झालेली बरीचशी असंयत चर्चा वाचून आता धागा वाचनमात्र करावा असा संदेश संपादकांपर्यंत पोचल्याने धागा वाचनमात्र होत आहे! :) -संपादक मंडळ संयम आणि सबुरीचा महिना - रमजान! – शाहजहान मगदुम जीवन एक अखंड प्रवास. या प्रवासात मार्गक्रमण करणारा प्रवासी म्हणजे मानव. मानवास या प्रवासात काही अडथळे येऊ नयेत म्हणून अल्लाहनं प्रेषितांद्वारे वेळोवेळी मार्गदर्शनही पाठविलंय. आता मानवास आपल्या प्रवासात येणाNया अडचणींवर मात करण्यासाठी बरोबर न्यायवयाची शिदोरी म्हणजेच ईशपरायणता होय. याच ईशपरायणतेसह मानवाला जीवन व्यतीत करण्यासाठी उत्तम प्रशिक्षणाची सोय अल्लाहनं पवित्र रमजान महिन्याच्या स्वरूपात केलीय. या महिन्यात प्रत्येक मुस्लिमानं रोजा ठेवून या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यास सांगितलं आहे. याच महिन्यात अल्लाहनं आपल्या पवित्र व अंतिम ग्रंथाचं म्हणजेच पवित्र कुरआनचं अवतरण अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर केलंय. याचं पठण या महिन्यात पवित्र मानलं जातं. या सर्व बाबींमुळे लक्षात येतं की, ईशपरायणता, रमजान आणि कुरआनमुळे मानवाला नैतिक व्यवस्थेच्या त्रिकोणी संगमाचा लाभ मिळाला आहे. रोजाप्रमाणेच पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या उक्ती आणि कृतींमध्ये ईशपरायणतेला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलंय. पवित्र कुरआनात सुमारे १५८ पेक्षा अधिक आयतींमध्ये ईशपरायणतेचा संदर्भ आला असून १०० पेक्षा जास्त ‘हदीस’ या विषयाबाबत आढळून येतात. यावरून इस्लाममध्ये ईशपरायणतेला किती महत्त्व आहे हे स्पष्ट होते. ईशपरायणता ही इस्लाममधील सर्व उपयुक्तता आणि सद्गुणांची गोळाबेरीज आहे. ज्या व्यक्तीकडे ईशपरायणता असेल त्यानं सर्वकाही साध्य केलं असं म्हटलं जातं. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविलं आहे की, ‘‘शुद्ध आचरण आणि शुद्ध अंत:करणाची संपत्ती केवळ अशाच स्थितीत मिळू शकते जेव्हा माणसावर प्रत्येक वेळी ही कल्पना आरुढ असावी की, जणू तो ईश्वराला पाहातोय. त्याचं अस्तित्व नेहमीच व प्रत्येक वेळेस ईश्वराच्या दृष्टीत आहे. अथवा असं समजावं की, ईश्वर त्याला पाहातोय. तात्पर्य, तुम्ही स्वत:ला ईश्वरासमोर हजर समजावे अथवा ईश्वर आपल्या जवळ असल्याचा विश्वास असावा. याशिवाय कोणत्याही सत्कार्याला परिपूर्णता येत नाही.’’ (बुखारी, मुस्लिम) ईशभय आणि ईशकृपा या दोन गोष्टींच्या दरम्यान श्रद्धा असते. ईश्वरीय कृपेची आशा माणसाला सद्कार्याची प्रेरणा देते आणि अपराधांच्या भयानक परिणामांचं भय ईश्वरीय अवज्ञेपासून दूर ठेवते. आपण अल्लाहच्या प्रसन्नतेपासून आपला बचाव करतो आणि वाईटापासून दूर राहून चांगुलपणा आत्मसात करतो, यालाच ईशपरायणता म्हणतात. या मन:स्थितीमुळे अशी मानसिकता तयार होते की, मनुष्य आज्ञाधारकता आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी जीवन वंâठत असतो. अशी व्यक्ती प्रत्येक क्षणी अल्लाहच्या प्रसन्नतेचा विचार करीत असते. त्याला अल्लाहची अप्रसन्नता होऊ नये म्हणून एखाद्या कृतीमुळे अल्लाहची अप्रसन्नता ओढवून घेण्याची भीती त्याच्या मनात नेहमी असते. अल्लाहला प्रसन्न करण्याच्या संधीला अशी व्यक्ती जाऊ देत नाही. म्हणजेच मनुष्य स्वत:वर नियंत्रण ठेवून आणि इच्छा-आकांक्षांना बंदिस्त ठेवूनच ईशपरायणता प्राप्त करू शकतो. अल्लाहनं कुरआनात म्हटलं आहे की, ‘‘आणि ज्यानं आपल्या पालनकत्र्यासमोर उभं राहाण्याचं भय बाळगलं होतं आणि मनाला वाईट इच्छेपासून दूर ठेवलं होतं स्वर्ग त्याचं ठिकाण असेल.’’ (कुरआन– ७९:४०-४१) रोजा मनुष्यातील शक्तिशाली उत्कट स्वाभाविक इच्छांवर नियंत्रण ठेवतो. महिन्याभराचं आंतरिक प्रशिक्षण दररोज १२-१४ तास निरंतर चालत असतं. मनुष्य या कालावधीत इतका तहाणलेला बनतो की, त्याला नीट बोलतासुद्धा येत नाही. त्याच्या हातात थंड पाणी आपली तहाण भागविण्यासाठी असते. त्याला ते पाणी प्यावेसं वाटतं. परंतु रोजा असं करण्यापासून त्याला परावृत्त करतो. अशा व्यक्तीमध्ये कशा प्रकारची सहनशक्ती, संयम आणि ईशपरायणता निर्माण होत असेल याची कल्पना करावी तितकी कमीच! अशा प्रकारे रोजा मनुष्यामध्ये स्वत:ला नियंत्रित करून उत्कट स्वाभाविक इच्छांवर प्रबळ नियंत्रण ठेवतो. हीच शक्ती मनुष्यात खNया अर्थानं ईशपरायणता निर्माण करते. रोजा ही दिखाव्यापासून आणि दांभिकतेपासून पूर्णत: अलिप्त अशी उपासनापद्धती आहे. नमाज, जकात, हज या उपासनापद्धतींमध्ये काही अनिवार्य करावं लागतं, नाहीतर ती उपासना ठरत नाही. असं मात्र रोजाबद्दल नाही. ही उपासना कुणीही पाहू शकत नाही की ऐवूâ शकत नाही. अशी उपासना दिखाऊ स्वरुपाची असूच शकत नाही. इस्लामच्या मूलतत्त्वांपैकी रोजा हे एक असं मूलतत्त्व आहे ज्यास दांभिकता स्पर्शदेखील करू शकत नाही. रोजाच्या याच गुणवैशिष्ट्यामुळे पवित्र कुरआनात वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे की, ‘‘हे श्रद्धावंतांनो! तुमच्यावर विहित केलेले उपवास (रोजा) तुमच्या पूर्वजांवरही विहित केलेले होते जेणेकरून तुम्ही ईशपरायण व्हाल.’’ (पवित्र कुरआन–२:१८३) पवित्र कुरआनातील वरील संकेतवचन फक्त आणि फक्त रोजा (उपवासा)साठीच अवतरित झालंय. इतर उपासनापद्धतींद्वारे जरी ईशपरायणता प्राप्त होत असली तरी त्यांच्यासाठी अशा प्रकारचं वर्णन पवित्र कुरआनात कोठेच आलेलं नाही. रोजामुळे ईशपरायणता आणि संयम यासारखे सद्गुण निर्माण करण्यावर भर दिला गेला आहे. मनुष्य रोजा कालावधीत खाण्या-पिण्यापासून आणि संभोगापासून अलिप्त राहात असतो. याचाच अर्थ असा की, इतर वेळी तो अल्लाहच्या प्रसन्नतेविरुद्ध कोणतीही गोष्ट करू शकत नाही. म्हणून रोजादार इतर बाबींतसुद्धा अल्लाहच्या आज्ञापालनात राहातो, त्याच वेळी त्याचा रोजा हा खरा रोजा सिद्ध होतो. ईशपरायणता जीवन व्यतीत करण्यासाठी रोजाव्यतिरिक्त अन्य दुसरे अत्युत्तम अशी कोणतीच उपासनापद्धत नाही. दुसरं कोणतंच कृत्य त्याची जागा घेऊ शकत नाही. म्हणूनच नमाज, जकातप्रमाणे रोजा हीसुद्धा धर्माची स्वाभाविक अनिवार्यता आहे. रोजाअभावी नमाजची शिस्तप्रिय व्यवस्थादेखील पूर्णतेला पोहोचू शकत नाही. रोजा अनेक कारणांमुळे इस्लामच्या खNया स्वरुपाचं द्योतक आहे. कुरआननं धर्माची स्पष्ट केलेली कल्पनाही रोजामध्ये सर्वांगानं स्पष्ट होते. कारण रोजा मनुष्याला फक्त सदाचरणीच बनवत नाही तर त्याच्या आत्म्याला आणि विचाराला एक दिशा देतो. बहिरंग आणि अंतरंग दोन्ही ईशपरायण बनतात. रोजामध्ये ईशपरायणतेबरोबरच त्याची मौलिकता आणि महत्त्वसुद्धा रोजादार जाणून, समजून व उमजून घेतो. हे सर्व अनुभवातूनच! जेव्हा ‘रोजा’ हा शब्द कानी पडतो तर लगेचच स्वयंप्रेरणा विंâवा अंत:स्पूâर्तीच्या मागणीला रोखून धरणं म्हणजे रोजा हे आपल्या लक्षात येतं. अल्लाहच्या प्रसन्नतेच्या प्राप्तीसाठी फक्त अल्लाहचे आदेश पाळणं पुरेसं नाही, तर आपल्या मनातील इच्छांना आवर घालून स्वत:च्या इच्छेनुसार न वागणं गरजेचं आहे. अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत. अल्लाहला आत्मसमर्पण करणं आणि ईशपरायण जीवन जगणं म्हणजे अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांची आज्ञाधारकता स्वीकारणं होय. जे न करण्याचा आदेश दिला आहे ते नाकारणं आणि ज्याची परवानगी दिली आहे ती गोष्ट आचरणात आणणं हे माणसाला आत्मिक समाधान प्राप्त करून देते. अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांनी घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करणे आणि स्वत:ची भर त्यात न घालता, मर्यादा भंग न करता जीवन वंâठत राहणं ईशपरायणता आहे. रोजाचा उद्देश ईशपरायणतेला वृद्धींगत करणं हा आहे. एकीकडं रोजा ठेवणाNया व्यक्तीला पहाटे ‘सेहरी’ (जेवण) करण्याची कडक ताकीद दिली आहे. ‘सेहरी’ न करता रोजा ठेवणारा अल्लाहची कृपा प्राप्त करू शकत नाही. तसेच रोजा सोडण्याच्या वेळेसंबंधी कडक ताकीद आहे. रोजा सोडण्यात विलंब करणे म्हणजे श्रद्धेत कमतरता करणे होय. ही दोन्ही कृत्यं ईशपरायणता प्राप्त करण्याच्या मार्गातील अडथळे आहेत. अंत:स्पूâर्ती व स्वयंप्रेरणेवर नियंत्रण अशा कृत्यांमुळं होते. त्यामुळं रोजाचा हेतूसुद्धा साध्य होण्यास मदत होते. म्हणूनच रोजाला इस्लामचा आधारस्तंभ म्हणून संबोधलं आहे आणि इस्लामची इमारत या आधारस्तंभाअभावी अपूर्ण राहते, हेदेखील कळून येतं. रोजामुळं अल्लाहचं प्रभुत्व आणि सार्वभौमत्वाच्या विश्वासाला आणखी बळकटी येते. पहाटे ‘सहेरी’ केली जाते, परंतु जेव्हा उष:काल होतो त्याच क्षणी खाणं-पिणं आणि जीवनातील इतर सुखांचा उपभोग घेण्यापासून मनुष्य दूर राहतो. संपूर्ण दिवसभर त्याला ईशपरायणता यापासून रोखून धरते. सूर्यास्तानंतर लगेचच रोजा सोडल्यानंतर त्याला खाणं-पिणं आणि जीवनानंद उपभोगता येतो. म्हणून प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटलं आहे की, ‘‘रमजान महिना संयमाचा महिना आहे तर त्याचा निम्मा संयम रोजा आहे.’’ संयम ही ईशपरायणतेची पहिली पायरी होय. याच ईशपरायणतेच्या प्रगल्भ इच्छाशक्तीनं आपण सर्वांनी पवित्र रमजान महिन्याचं, त्या पवित्र प्रशिक्षणाचं स्वागत केलंय. या प्रशिक्षणाचा लाभ घेत ईद साजरी करून भावी काळात ईशकृपेचा लाभ उठवू या. (संपर्वâ- ९२२४६३९३७१)

वाचने 15445
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हो आम्ही पण त्यांना बांधव म्हणू.
see, was that so difficult? चला, आजच्यापुरतं एवढं यश मला रगड. बाकी मूर्तीपूजन व देव ही संकल्पना या वेगळ्या गोष्टी आहेत हे सांगत बसत नाही...

In reply to by राजेश घासकडवी

see, was that so difficult? चला, आजच्यापुरतं एवढं यश मला रगड. यश ??? कसलं बॉ? आणि त्याच न्यायानी सर्व गुन्हे करणारे गुन्हेगार, चोर हेही आमचे बांधवच आहेत असे आम्ही मानतो. फक्त ते फाशी देण्याच्या लायकीचे आहेत असे मानतो. कारण भगवत गीतेत श्रीकृष्णाने कायम धर्माची बाजू घ्यायला सांगितली आहे. अधर्माच्या बाजूने आपले बांधव जरी उभे असतील तरी त्यांच्याशी युद्ध करा अशी भगवंताची आज्ञा आहे. 'तस्मात उत्तिष्ठ कौन्तेय युधस्य कॄतनिश्चयः' बाकी मूर्तीपूजन व देव ही संकल्पना या वेगळ्या गोष्टी आहेत हे सांगत बसत नाही... स्वामी विवेकानंदांनीच म्हटल्यानुसार 'जेव्हा आम्ही मूर्तीची पूजा देव म्हणून करतो तेव्हा तो देव तिथे असतो' . त्यामुळे माझ्यापुरत्या त्या वेगळ्या नाहीत असे म्हणतो.

In reply to by राजेश घासकडवी

तसं अनेक देशांत स्त्रियांनी चेहेरा किंवा केस दाखवणं हे तिथल्या अनेकांसाठी प्रक्षोभक आहे. म्हणून त्यावर बंदी योग्य का?
थोडासा(की बराच?) फरक आहे असे वाटते. अनेक देव-जाती-धर्म एकत्र नांदत असताना (प्रत्येकाने) माझाच देव सर्वश्रेष्ठ अशी भुमिका ठेवल्याने एकत्र नांदण्यालाच अडथळा होतो. आता सदर समाजच जर एकत्र राहण्यात अडचण होत असेल तर अशी कारणे निर्माण होउ नयेत असे वाटले तर फार काय चुकले? (अर्थात, देव धर्म वगैरे थोतांड आहेत हे माहित असताना) स्त्रीयांनी चेहरा दाखवल्याने कोण कसा प्रक्षोभित होईल माहित नाही, मात्र कुठल्या समाजात जर तसे खरेच होत असेल आणि त्यामुळे समाजाच्या अस्तित्वालाच धोका असेल तर स्त्रियांना चेहरा इ. झाकण्याच नियम समाजाने केला तर समजु शकतो.
हे स्वामी विवेकानंदांनी सर्व धर्म परिषदेत म्हटलं होतं. यात कोणीतरी हिंदू देव हा एकमेव व अंतिम, सर्वश्रेष्ठ देव आहे असं म्हटलेलं नाही का?
म्हणुनच सर्वात पहिला प्रतिसाद तसा लिहला. (मला कळले, पण इतके अवघड लिहलेत तर मात्र अनेकांना समजावयाचे नाही. :-) )
'क्ष विधानावर अमुकतमुक लोकांचा विश्वास आहे' असं म्हटल्याने ते खरं थोडंच होतं? असं म्हणण्यालाच विरोध करणं हे जेम्स लेन प्रकरणासारखंच झालं नाही का?
:-) हे ज्यांकरता आहे ते उत्तर देतील अशी आशा करुयात, नवीन धोरणात मी द्यायचे म्हणले तर उत्तर बसेल की नाही कुणास ठावुक, पण पुन्हा तुमचे म्हणणे कळालेच नाही तर? ;-)

In reply to by राजेश घासकडवी

मुसलमानांचा नायनाट झाला पाहिजे या विधानाला नुकताच इथे अनेकांनी दुजोरा दिला असे किंवा अशा अर्थाचे एकही विधान या धाग्यावर नाही (तुमचा प्रतिसाद वगळता). कोथळा काढण्याची विधानं आली आणि गेली. (तीही तुमच्याच प्रतिसादात) आता तुमच्या प्रतिसादात जी वाक्ये येतात त्याबद्दल आम्हाला का जबाबदार ठरवता ? पण अल्ला सर्वश्रेष्ठ आहे व एकमेवाद्वितीय आहे या विधानावर इतकी राळ उडते. हे विधान तुम्ही फारच सौम्य बनवले आहे, संदर्भ द्यायचा असल्यास ते जसे आहे तसे द्या. आणि का उडू नये ? गेल्या हजार वर्षांचा इतिहास पाहता अशी छुपी धमकी दिली तर राग येणारच. हे योग्य संतुलन आहे का? याला सेक्युलरिझम म्हणावं का? त्यांचा धर्म स्वीकारा अथवा मरा अशी धमकी देणे आणि ती हजारो वर्षे खरी करून दाखवणे याला काय म्हणतात हो ?

In reply to by राजेश घासकडवी

जर कोणी मॉर्गनने किंवा मेघवेड्याने सचिन तेंडुलकर सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे असं म्हटलं तर ते त्यांचं मत म्हणून मान्य करायला काय हरकत आहे? ते कोणावर लादलेलं नाही. जर कोणी लिहिलं की 'ब्रॅडमन म्हणाला सचिन सर्वश्रेष्ठ' तर ते आणखीनच पत्रकारितेच्या जवळ जातं.
मत मान्य करायला काहीच हरकत नाही हो, कारण आणि मॉर्गन आणि मेवे सचिन श्रेष्ठ आहे असे नुसते लिहुनच मोकळे होतात. तो श्रेष्ठ नाही म्हणणार्‍यांचे गळे कापायला आणि घरदार जाळायला ते जात नाहीत :) हा सगळ्यात मोठा फरक आहे. असो...

In reply to by परिकथेतील राजकुमार

तो श्रेष्ठ नाही म्हणणार्‍यांचे गळे कापायला आणि घरदार जाळायला ते जात नाहीत हा सगळ्यात मोठा फरक आहे.
राव तुम्ही अतिशयोक्ती अलंकार वापरून वापरून झिजवणार बघा. ८७ साली दिल्ली स्टेशनासमोर 'हम है हिंदू साठ करोड, हड्डी पसली देंगे तोड' अशी सहा फुटी अक्षरांची पाटी लागलेली होती. 'संयम व सबुरीचा महिना रमजान' असल्या मिपावरच्या धाग्यात अल्ला सर्वश्रेष्ठ व एकमेवाद्वितीय आहे असं म्हटल्याबरोबर गळे कापले जाण्याची भीती वाटते तुम्हाला... फारच तुम्ही सेन्सिटीव्ह बॉ.

८७ साली दिल्ली स्टेशनासमोर 'हम है हिंदू साठ करोड, हड्डी पसली देंगे तोड' अशी सहा फुटी अक्षरांची पाटी लागलेली होती.
१६८९ मध्ये इस्लाम स्विकारला नाही म्हणुन संभाजी महाराजांची निर्घॄण हत्या झाली होती.

श्री.राजेश घासकडवी (ज्यांचे लिखाण मी कायम आत्मियतेने वाचत असतो) यांच्या प्रतिक्रियेमधील काही वाक्ये ही सर्वसमावेशक असल्याने वैयक्तिकरित्या त्यातील काहीचे खंडन प्रथम करणे मला निकडीचे वाटते. १. जर क्ष धर्माच्या धर्मग्रंथात लिहिलं असेल की क्ष धर्मच सर्वश्रेष्ठ, तर ते मत, ('त्या ग्रंथात तसं लिहिलं आहे' हे सत्य विधान) यायला काय हरकत आहे? यात आक्षेपार्ह काय आहे? आक्षेपार्ह काही नाही; पण याचा अर्थ असा नाही ते मत मांडताना भाषेचा संयम सोडावा. त्यातही विशेषतः ज्यावेळी लेखाचे शीर्षकच मुळी "संयम आणि सबुरी" याचे महत्व सांगणारा आहे. "अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत" ~~ 'रोजा'चे महत्व विशद करताना इतर ईश्वरांना नाकारा असे लिहिताना ज्या "तथाकथित" शब्दाचे प्रयोजन करण्यात आले आहे ते माझ्या हिंदू मनाला अपमानस्पद वाटले तर तसे प्रतिसादात (भाषेचा तोल न ढासळता) दिले तर आक्षेपार्ह मानले जाईल का? २. कुठले वाक्य चालते, कुठले नाही या विषयावर इथे वारंवार मंथन झाले आहे आणि संपादक मंडळानेदेखील त्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे, करीत आहेत. पण तुम्हाला व मला जे शब्द, वाक्य वा विधान आक्षेपार्ह वाटतात त्यावर संपादकांचीही नजर असेलच कारण ती मंडळी तुम्हाआम्हापेक्षा वेगळी नाहीत. आपण केवळ तशी सूचना करू शकतो, शेवटी कात्री त्यांच्या हातात आहे. ३. "असं जर झालं तर अनेक विचार, मतं मिपावर मांडलीच जाऊ शकणार नाहीत." बरोबर आहे हा मुद्दा. पण मतमांडणीतही काही ताळतंत्र असणे अपेक्षित नाही का? उद्या श्री.मगदूम मशिदीतील त्यांच्या एखाद्या शिष्याने मिपावर "इस्लामला मानणारे पुण्यात भरपूर आहेत म्हणून दर शुक्रवारी शनिवारवाड्यावर भगव्याऐवजी हिरवा फडकविण्यात यावा काय?" असा विचार मांडला तर तोदेखील एक "वैचारिक अभिव्यक्ती" म्हणून चर्चेला घ्यायचा काय? ४. "ते मत चुकीचं आहे म्हणून खंडन करणं वेगळं आणि ते विधान नष्ट करण्याचं आवाहन करणं वेगळं. " यावर माझे वैयक्तिक मत मी प्रतिसादात मांडले आहे. तरीही थोडक्यात सांगत आहे की, शक्य त्या योग्य आणि सौम्यरितीने मी 'त्या' मताचे खंडन केले आहे. विधान नष्ट करण्याचे आवाहन केलेले नाही. ५. "मुसलमानांचा नायनाट झाला पाहिजे या विधानाला नुकताच इथे अनेकांनी दुजोरा दिला. कोथळा काढण्याची विधानं आली आणि गेली." यात मी नाही. माझ्या अत्यंत जवळच्या मित्रात तीन मुसलमान आहेत आणि ते हमीद दलवाई, हुसेन जमादार यांच्या पंथातील आहेत. माझ्या अनेक आवडत्या शिक्षकांपैकी एक मुस्लिम होते ज्यांचा "मराठी" हा विषय होता. त्यांच्या व त्यांच्या सहकार्‍यांसमवेत कुरआनवर वारंवार मी विचारांचे आदानप्रदान केले आहे. त्यामुळे वरील वाक्यात दिसणारी अतीटोकाची मते मी कधीही करू शकणार नाही. ६. "पण अल्ला सर्वश्रेष्ठ आहे व एकमेवाद्वितीय आहे या विधानावर इतकी राळ उडते." मतांचे जे रूप वर प्रकट झाले आहे त्याला "राळ" म्हणणे अन्यायकारक आहे कारण "राळ" याला इंग्रजी प्रतिशब्द आहे "डिस्ग्रेस" अन ६० पेक्षा जास्त प्रतिक्रिया या "डिसग्रेसफुल" आहेत असे कृपया मानू नका. मी दोनतीन ठिकाणी लिहून श्री.मगदूम याना येथील लेखावरील चर्चेत भाग घ्यावा असे आवाहन केले आहे. पण तसे झालेले नाही. शेवटी "धर्म" आणि "सचिन" या दोन्ही अभिमानाच्या गोष्टी असल्या तरी त्या एकाच तराजूत येत नाहीत. आज २०१० मध्ये 'सचिन' ने तुमच्या आमच्या हृदयात घर केले आहे. १९७५ साली तिथे "सुनील" होता, कुणी सांगावे २०२५ ला तिथे एक "सत्यजीत" येईल. पण धर्माचे स्थान एकमेव म्हणून अढळ आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

सर्वप्रथम इंद्रराज, तुम्ही वैयक्तिक खुलासे देण्याची काहीच गरज नव्हती. माझा रोख तुमच्या प्रतिसादावर नव्हता. तुमचं म्हणणं नेहेमीच तुम्ही विचारपूर्वक मांडता. एकंदरीत 'तथाकथित' या शब्दाला जोरदार आक्षेप दिसतोय. पण हा आता शब्दच्छल व्हायला लागला. माझा जर ठाम विश्वास असेल की माझ्या देवाचा संदेश हाच खरा संदेश आहे, माझा देव हाच खरा देव आहे, तद्वतच इतर लोकांची दिशाभूल झालेली आहे. तर तो विचार मांडायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे. विचार लादायला आक्षेप आहे. जिथे काहीच व्यक्तिनिरपेक्ष नाही, सर्वच विश्वासावर आधारित आहे, तिथे नक्की कुठची विधानं त्याज्य हे ठरवणं कठीण जातं. कुराणात अमुकतमुक लिहिलं आहे हे विधान त्याज्य असेल तर तुम्ही कुराण त्याज्य आहे असंच नाही का म्हणत? हिरव्या झेंड्याचं उदाहरण थोडंसं टोकाचं असलं तरी विचारणाऱ्याला तो विचारल्याबद्दल शिक्षा करू नये इतकंच. त्याला सरळ नाही म्हणावं, त्याच्या अविचाराबद्दल हसावं, दुर्लक्षाने मारावं वगैरे ठीक आहे. शिवरायांनी मोठ्या मनाने हेच केलं असतं बहुधा.
यात मी नाही.
त्याबद्दल शंका नाही, पण इतर काही होतेच ना. माझा मुद्दा असा आहे की तथाकथित ने भावना जितक्या पटकन दुखल्या तितक्याच तीव्रतेने नायनाट व कोथळा त्याज्य सगळ्यांनीच म्हटले असते तर काहीच हरकत नव्हती. राळ ऐवजी धुरळा हा शब्द बरोबर ठरला असता कदाचित. शब्द एकंदरीत जपूनच वापरावे लागतात.

अरे प्रिय मिपाकरांनो, कुणी एक उपटसुंभ एक काडी टाकुन जातो आणि मग आपण सगळे आपापल्या परीने त्यात तुप, तेल, घासलेट,डिझेल, पेट्रोल ओतत बसतो. जर का धागा प्रवर्तक स्वतः या काथ्याकुटात भाग घेत आसेल वा निदान विचारलेल्या शंकांना उत्तर तरी (मग ती चुक वा बरोबर असो) देत असेल तर एक वेळ समजु शकतो. सदर धाग्यातही शाहजहान मगदुमने एक काडी सारली आणि आपण सगळे बसलोय चर्वण करत.