संयम आणि सबुरीचा महिना - रमजान!
संयम आणि सबुरीच्या धाग्यावर बेसबरीने झालेली बरीचशी असंयत चर्चा वाचून आता धागा वाचनमात्र करावा असा संदेश संपादकांपर्यंत पोचल्याने धागा वाचनमात्र होत आहे! :)
-संपादक मंडळ
संयम आणि सबुरीचा महिना - रमजान!
– शाहजहान मगदुम
जीवन एक अखंड प्रवास. या प्रवासात मार्गक्रमण करणारा प्रवासी म्हणजे मानव. मानवास या प्रवासात काही अडथळे येऊ नयेत म्हणून अल्लाहनं प्रेषितांद्वारे वेळोवेळी मार्गदर्शनही पाठविलंय. आता मानवास आपल्या प्रवासात येणाNया अडचणींवर मात करण्यासाठी बरोबर न्यायवयाची शिदोरी म्हणजेच ईशपरायणता होय. याच ईशपरायणतेसह मानवाला जीवन व्यतीत करण्यासाठी उत्तम प्रशिक्षणाची सोय अल्लाहनं पवित्र रमजान महिन्याच्या स्वरूपात केलीय. या महिन्यात प्रत्येक मुस्लिमानं रोजा ठेवून या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यास सांगितलं आहे. याच महिन्यात अल्लाहनं आपल्या पवित्र व अंतिम ग्रंथाचं म्हणजेच पवित्र कुरआनचं अवतरण अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर केलंय. याचं पठण या महिन्यात पवित्र मानलं जातं. या सर्व बाबींमुळे लक्षात येतं की, ईशपरायणता, रमजान आणि कुरआनमुळे मानवाला नैतिक व्यवस्थेच्या त्रिकोणी संगमाचा लाभ मिळाला आहे.
रोजाप्रमाणेच पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या उक्ती आणि कृतींमध्ये ईशपरायणतेला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलंय. पवित्र कुरआनात सुमारे १५८ पेक्षा अधिक आयतींमध्ये ईशपरायणतेचा संदर्भ आला असून १०० पेक्षा जास्त ‘हदीस’ या विषयाबाबत आढळून येतात. यावरून इस्लाममध्ये ईशपरायणतेला किती महत्त्व आहे हे स्पष्ट होते. ईशपरायणता ही इस्लाममधील सर्व उपयुक्तता आणि सद्गुणांची गोळाबेरीज आहे. ज्या व्यक्तीकडे ईशपरायणता असेल त्यानं सर्वकाही साध्य केलं असं म्हटलं जातं.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविलं आहे की, ‘‘शुद्ध आचरण आणि शुद्ध अंत:करणाची संपत्ती केवळ अशाच स्थितीत मिळू शकते जेव्हा माणसावर प्रत्येक वेळी ही कल्पना आरुढ असावी की, जणू तो ईश्वराला पाहातोय. त्याचं अस्तित्व नेहमीच व प्रत्येक वेळेस ईश्वराच्या दृष्टीत आहे. अथवा असं समजावं की, ईश्वर त्याला पाहातोय. तात्पर्य, तुम्ही स्वत:ला ईश्वरासमोर हजर समजावे अथवा ईश्वर आपल्या जवळ असल्याचा विश्वास असावा. याशिवाय कोणत्याही सत्कार्याला परिपूर्णता येत नाही.’’ (बुखारी, मुस्लिम)
ईशभय आणि ईशकृपा या दोन गोष्टींच्या दरम्यान श्रद्धा असते. ईश्वरीय कृपेची आशा माणसाला सद्कार्याची प्रेरणा देते आणि अपराधांच्या भयानक परिणामांचं भय ईश्वरीय अवज्ञेपासून दूर ठेवते.
आपण अल्लाहच्या प्रसन्नतेपासून आपला बचाव करतो आणि वाईटापासून दूर राहून चांगुलपणा आत्मसात करतो, यालाच ईशपरायणता म्हणतात. या मन:स्थितीमुळे अशी मानसिकता तयार होते की, मनुष्य आज्ञाधारकता आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी जीवन वंâठत असतो. अशी व्यक्ती प्रत्येक क्षणी अल्लाहच्या प्रसन्नतेचा विचार करीत असते. त्याला अल्लाहची अप्रसन्नता होऊ नये म्हणून एखाद्या कृतीमुळे अल्लाहची अप्रसन्नता ओढवून घेण्याची भीती त्याच्या मनात नेहमी असते. अल्लाहला प्रसन्न करण्याच्या संधीला अशी व्यक्ती जाऊ देत नाही. म्हणजेच मनुष्य स्वत:वर नियंत्रण ठेवून आणि इच्छा-आकांक्षांना बंदिस्त ठेवूनच ईशपरायणता प्राप्त करू शकतो.
अल्लाहनं कुरआनात म्हटलं आहे की,
‘‘आणि ज्यानं आपल्या पालनकत्र्यासमोर उभं राहाण्याचं भय बाळगलं होतं आणि मनाला वाईट इच्छेपासून दूर ठेवलं होतं स्वर्ग त्याचं ठिकाण असेल.’’ (कुरआन– ७९:४०-४१)
रोजा मनुष्यातील शक्तिशाली उत्कट स्वाभाविक इच्छांवर नियंत्रण ठेवतो. महिन्याभराचं आंतरिक प्रशिक्षण दररोज १२-१४ तास निरंतर चालत असतं. मनुष्य या कालावधीत इतका तहाणलेला बनतो की, त्याला नीट बोलतासुद्धा येत नाही. त्याच्या हातात थंड पाणी आपली तहाण भागविण्यासाठी असते. त्याला ते पाणी प्यावेसं वाटतं. परंतु रोजा असं करण्यापासून त्याला परावृत्त करतो. अशा व्यक्तीमध्ये कशा प्रकारची सहनशक्ती, संयम आणि ईशपरायणता निर्माण होत असेल याची कल्पना करावी तितकी कमीच! अशा प्रकारे रोजा मनुष्यामध्ये स्वत:ला नियंत्रित करून उत्कट स्वाभाविक इच्छांवर प्रबळ नियंत्रण ठेवतो. हीच शक्ती मनुष्यात खNया अर्थानं ईशपरायणता निर्माण करते.
रोजा ही दिखाव्यापासून आणि दांभिकतेपासून पूर्णत: अलिप्त अशी उपासनापद्धती आहे. नमाज, जकात, हज या उपासनापद्धतींमध्ये काही अनिवार्य करावं लागतं, नाहीतर ती उपासना ठरत नाही. असं मात्र रोजाबद्दल नाही. ही उपासना कुणीही पाहू शकत नाही की ऐवूâ शकत नाही. अशी उपासना दिखाऊ स्वरुपाची असूच शकत नाही. इस्लामच्या मूलतत्त्वांपैकी रोजा हे एक असं मूलतत्त्व आहे ज्यास दांभिकता स्पर्शदेखील करू शकत नाही. रोजाच्या याच गुणवैशिष्ट्यामुळे पवित्र कुरआनात वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे की,
‘‘हे श्रद्धावंतांनो! तुमच्यावर विहित केलेले उपवास (रोजा) तुमच्या पूर्वजांवरही विहित केलेले होते जेणेकरून तुम्ही ईशपरायण व्हाल.’’ (पवित्र कुरआन–२:१८३)
पवित्र कुरआनातील वरील संकेतवचन फक्त आणि फक्त रोजा (उपवासा)साठीच अवतरित झालंय. इतर उपासनापद्धतींद्वारे जरी ईशपरायणता प्राप्त होत असली तरी त्यांच्यासाठी अशा प्रकारचं वर्णन पवित्र कुरआनात कोठेच आलेलं नाही.
रोजामुळे ईशपरायणता आणि संयम यासारखे सद्गुण निर्माण करण्यावर भर दिला गेला आहे. मनुष्य रोजा कालावधीत खाण्या-पिण्यापासून आणि संभोगापासून अलिप्त राहात असतो. याचाच अर्थ असा की, इतर वेळी तो अल्लाहच्या प्रसन्नतेविरुद्ध कोणतीही गोष्ट करू शकत नाही. म्हणून रोजादार इतर बाबींतसुद्धा अल्लाहच्या आज्ञापालनात राहातो, त्याच वेळी त्याचा रोजा हा खरा रोजा सिद्ध होतो.
ईशपरायणता जीवन व्यतीत करण्यासाठी रोजाव्यतिरिक्त अन्य दुसरे अत्युत्तम अशी कोणतीच उपासनापद्धत नाही. दुसरं कोणतंच कृत्य त्याची जागा घेऊ शकत नाही. म्हणूनच नमाज, जकातप्रमाणे रोजा हीसुद्धा धर्माची स्वाभाविक अनिवार्यता आहे. रोजाअभावी नमाजची शिस्तप्रिय व्यवस्थादेखील पूर्णतेला पोहोचू शकत नाही.
रोजा अनेक कारणांमुळे इस्लामच्या खNया स्वरुपाचं द्योतक आहे. कुरआननं धर्माची स्पष्ट केलेली कल्पनाही रोजामध्ये सर्वांगानं स्पष्ट होते. कारण रोजा मनुष्याला फक्त सदाचरणीच बनवत नाही तर त्याच्या आत्म्याला आणि विचाराला एक दिशा देतो. बहिरंग आणि अंतरंग दोन्ही ईशपरायण बनतात.
रोजामध्ये ईशपरायणतेबरोबरच त्याची मौलिकता आणि महत्त्वसुद्धा रोजादार जाणून, समजून व उमजून घेतो. हे सर्व अनुभवातूनच! जेव्हा ‘रोजा’ हा शब्द कानी पडतो तर लगेचच स्वयंप्रेरणा विंâवा अंत:स्पूâर्तीच्या मागणीला रोखून धरणं म्हणजे रोजा हे आपल्या लक्षात येतं.
अल्लाहच्या प्रसन्नतेच्या प्राप्तीसाठी फक्त अल्लाहचे आदेश पाळणं पुरेसं नाही, तर आपल्या मनातील इच्छांना आवर घालून स्वत:च्या इच्छेनुसार न वागणं गरजेचं आहे. अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत. अल्लाहला आत्मसमर्पण करणं आणि ईशपरायण जीवन जगणं म्हणजे अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांची आज्ञाधारकता स्वीकारणं होय. जे न करण्याचा आदेश दिला आहे ते नाकारणं आणि ज्याची परवानगी दिली आहे ती गोष्ट आचरणात आणणं हे माणसाला आत्मिक समाधान प्राप्त करून देते. अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांनी घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करणे आणि स्वत:ची भर त्यात न घालता, मर्यादा भंग न करता जीवन वंâठत राहणं ईशपरायणता आहे.
रोजाचा उद्देश ईशपरायणतेला वृद्धींगत करणं हा आहे. एकीकडं रोजा ठेवणाNया व्यक्तीला पहाटे ‘सेहरी’ (जेवण) करण्याची कडक ताकीद दिली आहे. ‘सेहरी’ न करता रोजा ठेवणारा अल्लाहची कृपा प्राप्त करू शकत नाही. तसेच रोजा सोडण्याच्या वेळेसंबंधी कडक ताकीद आहे. रोजा सोडण्यात विलंब करणे म्हणजे श्रद्धेत कमतरता करणे होय. ही दोन्ही कृत्यं ईशपरायणता प्राप्त करण्याच्या मार्गातील अडथळे आहेत. अंत:स्पूâर्ती व स्वयंप्रेरणेवर नियंत्रण अशा कृत्यांमुळं होते. त्यामुळं रोजाचा हेतूसुद्धा साध्य होण्यास मदत होते. म्हणूनच रोजाला इस्लामचा आधारस्तंभ म्हणून संबोधलं आहे आणि इस्लामची इमारत या आधारस्तंभाअभावी अपूर्ण राहते, हेदेखील कळून येतं.
रोजामुळं अल्लाहचं प्रभुत्व आणि सार्वभौमत्वाच्या विश्वासाला आणखी बळकटी येते. पहाटे ‘सहेरी’ केली जाते, परंतु जेव्हा उष:काल होतो त्याच क्षणी खाणं-पिणं आणि जीवनातील इतर सुखांचा उपभोग घेण्यापासून मनुष्य दूर राहतो. संपूर्ण दिवसभर त्याला ईशपरायणता यापासून रोखून धरते. सूर्यास्तानंतर लगेचच रोजा सोडल्यानंतर त्याला खाणं-पिणं आणि जीवनानंद उपभोगता येतो.
म्हणून प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटलं आहे की, ‘‘रमजान महिना संयमाचा महिना आहे तर त्याचा निम्मा संयम रोजा आहे.’’
संयम ही ईशपरायणतेची पहिली पायरी होय. याच ईशपरायणतेच्या प्रगल्भ इच्छाशक्तीनं आपण सर्वांनी पवित्र रमजान महिन्याचं, त्या पवित्र प्रशिक्षणाचं स्वागत केलंय. या प्रशिक्षणाचा लाभ घेत ईद साजरी करून भावी काळात ईशकृपेचा लाभ उठवू या.
(संपर्वâ- ९२२४६३९३७१)
प्रतिक्रिया
अरुण मनोहर
लेखाचा उद्देश रोजाची महती
सहमत
अरुण मनोहर आणि नंदू
हा लेख अस्सच्या अस्सा कुठेतरी
लवकरात लवकर आक्षेपार्ह विधाने वगळून लेख पुन्हा प्रकाशित करावा.
हे पटले नाही
(विषय दिलेला नाही)
भाष्यकारांचे खेळ
अरे काय चाललंय हे?
का हो. सगळ्या धाग्यांवर
धर्म जात पात इ. बद्द्ल अ/ब्/क
बरं बरं इतरत्र त्याची खिल्ली
आम्हीच खिल्ली उडवतो हो.
सेक्युलारिझम
सोशल फोरम
आमचा देव श्रेष्ठ हे विधान
तसं अनेक देशांत स्त्रियांनी
असं कुठं दिसलं नाही त्यात. ते
अरे वा, तसं असलं तर 'आपण
हो आम्ही पण त्यांना बांधव
see, was that so difficult?
तसं अनेक देशांत स्त्रियांनी
राजेश घासकडवी
जर कोणी मॉर्गनने किंवा
मी बाई नाजुक नार, मला भीतीच फार
८७ साली दिल्ली स्टेशनासमोर
अतिशयोक्ती व सेन्सिटिव्हिटी बद्दल
काही खुलासे
सर्वप्रथम इंद्रराज, तुम्ही
अरे प्रिय मिपाकरांनो, कुणी एक
Pagination