Skip to main content

शिवाजी महाराज

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 17/08/2010 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या शुक्रवारी वडिलांच्या शाळेत गेलो होतो . तिथे पोरांना इंटरनेट शिकवले मस्त मजा आली .. मी त्यांना गुगलचा उपयोग सांगितला आणि जेव्हा मी विचारले तुम्हाला काय शोधायला आवडेल ... पाहिलं नाव होत ... शिवाजी महाराज
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4430
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

In reply to by अमोल केळकर

बन्ड्या... धागा अखंड चालू राहण्यासाठी चांगली युक्ती शोधून काढलीये हां! ;) पण प्रयोजन मात्र कळाले नाही! ;) :)

अहाहा! काय छान लेख.. अतिशय ओघवती आनि चित्रदर्शी भाषा.. लेख दोन भागात चालला असता. आणि अश्या गोष्टींसाठी खरडफळ्याचा वापर न करता वेगळा धागा उघडल्याबद्दल आभार मिपावर स्वागत

मराठीत, गोब्राह्मणप्रतिपालकक्षत्रियकुलावतंस छत्रपति श्री शिवाजी महाराजांवर, इतके विपुल साहित्य उपलब्ध असतानाही आजच्या तरूण पिढीने गूगल सारख्या परमुलखातल्या सेवेचा आधार घ्यावा हे मनास अतिशय क्लेश देऊन गेले. असो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिपिन काका , ती लहान मुले (आता शाळेत म्हणल्यावर ४-५ वीत असतील असे गृहीत धरून ) कुठून ते सगळं साहित्य मिळविणार, त्या बिचार्या मुलांना त्यांचाच अभ्यास जड होत असेल. त्यातून पण ती मुले राजेंच्या शोधात होती हे वाचून खूप बरे वाटले. अहो हि पुढची पिढी, हि संगणकावरच वाढणार. अवांतर : माझ्या लहान मावस भावाने IPAD ची मागणी केली आहे, का तर म्हणे त्यावर त्याला चित्र रंगविता येईल. आता बोला. अति अवांतर : त्या मुलांनी जर खान , ऐश्वर्या शोधली असती तर काय वाटले असते आपल्याला ? (आपल्याला म्हणजे आपल्या सर्वांना , त्यात मी पण ) अति अति अवांतर : छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी अश्याच पुढे (भले धाग्याच्या स्वरुपात का होईना ) येत राहो. निदान मनोधैर्य वाढीस मदत तरी होते. लेख छोटा का होईना आवडला. स्वीट डिश सारखा

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते, खेड्यातल्या मुलांकडे कुठुन येणार एवढी पुस्तके ... तिथे तर ग्रंथालय पण नाहिये. शाळेतल्या संगणकावर जेवढी महिती मिळवता येइल तेवढेच (ते संगणक पण बिल गेट्स फाँडेशन कडुन मिळाले आहेत - आपल्या सरकार कडुन नाही ...) त्यांना महाराजांबद्दल जाणुन घ्यायचे होते हे महत्वाचे ...

बिपीनच्या मताशी सहमत

मराठीत, गोब्राह्मणप्रतिपालकक्षत्रियकुलावतंस छत्रपति श्री शिवाजी महाराजांवर, इतके विपुल साहित्य उपलब्ध असतानाही आजच्या तरूण पिढीने गूगल सारख्या परमुलखातल्या सेवेचा आधार घ्यावा हे मनास अतिशय क्लेश देऊन गेले. असो.
>> असो.. तरीही वाचून बरे वाटले.. उद्देश महत्त्वाचा.

शिवाजी महाराज नाव काढताच अंगावर रोमांच उभे राहतात हे खरे आहे. त्या मुलांच्या त्यांच्याप्रती भावना जपायला पाहिजे. तुम्ही त्यात हातभार लावला. अभिनंदन आपले. अतिअवांतर: शिवाजी महाराजांवर रिच कंटेंट असलेल्या साईट्स सांगा ना येथे. मी शोधले तर मला काही सापडल्या नाहीत. मराठी तर नाहीच नाही. मागे एक साइट गाजावाजा होवून लाँच झाली होती. अगदी काही हजारात फोटो टाकले आहेत वैगेरे वैगेरे. काय तिचे नाव बरं?

हीच ती साईट. गेली कित्येक वर्षे हि साईट तयार करत आहेत. (?) पण अजून शुभारंभ काही होत नाहीये. एवढ्या वेळात एखादा खरा किल्ला बांधून झाला असता. http://rajashivaji.com/

मी त्यांना गुगलचा उपयोग सांगितला आणि जेव्हा मी विचारले तुम्हाला काय शोधायला आवडेल ...पाहिलं नाव होत ... शिवाजी महाराज आणि मग त्यांनी गुगलमधे "शिवाजी महाराज" नाव टाकून शोधाची कळ दाबताच तेथे माहीतीचा वर्षाव झाला! ;) असो. ह.घ्या.हे.वे.सां.न.ल. तिथे पोरांना इंटरनेट शिकवले, मस्त मजा आली .. हे जास्त महत्वाचे वाटले. बर्‍याचदा असे कुणा (शिक्षकाव्यतिरीक्त) वेगळ्या व्यक्तीकडून ऐकायला मिळाले तर मुले जास्त लक्ष देऊन ऐकतात... जे जे आपणासी ठावे, ते दुसर्‍यासी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकळ जन||