आठवणींच्या जुन्या गाठी सोडवु,
पुर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू।।
परत एकदा लहान होऊ,
पुन्हा आपण वर्गात बसू।
वह्या उलगडुन रोजच्या प्रश्नांना,
मग्न व्यापातून उत्तरं लिहीताना।
थोडं थांबुन वस्त जिवनात,
हरवुन जाऊ स्नेह बंधनात।
सर्व जगच जिथे शाळा,
पुर्ण आयुष्य त्याचा फळा।
जे मिळाले ते नशिब कोरले,
जे गमावले ते हसुन पुसले।
आठवणींच्या जुन्या गाठी सोडवु,
पुर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू।।
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1233
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान....
सुन्दर जमलय.......
जुने दिवस आठवले....
छान....
सुन्दर जमलय.......
जुने दिवस आठवले....