सामंत काकाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
ते सर्वात जास्त लेखन करणारे पहिले मिपाकर आहेत. त्याचे दोस्त प्रो. देसाई व त्याचा नातु ह्याना मी अजुन मिस करतो.
शक्यतो मी वाढदिवसाच्या जाहीर धाग्यावर कधी लिहीत नाही. पण असेच सांगावेसे वाटले म्हणुन.
जरुर सामंतकाकांशी संपर्क साधा, शुभेच्छा द्या पण मिपावर परत यायचा अतिआग्रह करु नका. हे एक व्यसन आहे. आधी विचारा की ज्या कारणाने ते हे संस्थळ सोडून गेले तेच कारण परत इथे न घडू द्यायची जबाबदारी कोण घेतयं? शिवाय जर इथुन गेल्याने त्यांचे आयुष्य सुखकर झाले असेल तर तुम्ही लोक ते परत का दु:खी करत आहात?
शुभेच्छा, सद्भावना चांगली गोष्ट आहे पण अतिउत्साहाच्या भरात परत इथे बोलावून तुम्ही कोणी त्यांचे नुकसान करु नका म्हणून हा प्रतिसादप्रपंच.
वैयक्तिक मला एका तैंचा सुविचार त्यातील तश्या संदर्भामुळे, योग्य कारणाकरता संघर्ष करण्याच्या वृत्तीमुळे अतिशय आवडतो व पटतो "जाणार तर नाहीच, इथेच रहाणार व भांडणार" (परा, नाईल नेमका सुविचार काय आहे?)
वैयक्तिक मला एका तैंचा सुविचार त्यातील तश्या संदर्भामुळे, योग्य कारणाकरता संघर्ष करण्याच्या वृत्तीमुळे अतिशय आवडतो व पटतो "जाणार तर नाहीच, इथेच रहाणार व भांडणार" (परा, नाईल नेमका सुविचार काय आहे?)
तो मायकल जॅक्सनच्या धाग्यावरचा का ?
=)) =))
सहजश्रीचा मित्र
आधी विचारा की ज्या कारणाने ते हे संस्थळ सोडून गेले तेच कारण परत इथे न घडू द्यायची जबाबदारी कोण घेतयं?
सहजराव, काय म्हणताय ते निटस कळाल नाही. सामंत कोणत्या कारणाने सोडून गेले? मधल्या उलथापालथीत नंतरही ती कारणे तशीच मिपावर आहेत की नाहीत?
सामंतकाकांचे एक आवडले.... उगाच जातो जातो करुन बोंबाबोंब मारायची आणि डुप्लिकेट आयडीने इथेच थांबायचे असला फालतूपणा त्यानी केला नाही.....
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
सामंतकाकांशी संपर्क साधा, शुभेच्छा द्या पण मिपावर परत यायचा अतिआग्रह करु नका. हे एक व्यसन आहे. आधी विचारा की ज्या कारणाने ते हे संस्थळ सोडून गेले तेच कारण परत इथे न घडू द्यायची जबाबदारी कोण घेतयं? शिवाय जर इथुन गेल्याने त्यांचे आयुष्य सुखकर झाले असेल तर तुम्ही लोक ते परत का दु:खी करत आहात ?
हम्म, सहमत आहे.
शुभेच्छा, सद्भावना चांगली गोष्ट आहे पण अतिउत्साहाच्या भरात परत इथे बोलावून तुम्ही कोणी त्यांचे नुकसान करु नका म्हणून हा प्रतिसादप्रपंच.
सहजा, प्रतिसाद जरा लवकर टाकत जा ना राव. मी त्यांना मिपावर येण्याबाबतीत नुकतेच पुन्हा पत्र टाकले आहे.
-दिलीप बिरुटे
[सामंतसाहेबांचा फॅन]
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
[सामंतकाकांनी मिपा वर लेखन बंद केलंय ते का हे माहित नाही परंतु काही कारणांमुळे जर बंद केलं असेल तर ती कारणे कदाचीत अजुनही तशीच असावीत]
ते गेले तेंव्हां मी इथे नवा होतो. त्यावेळी त्यांनी लिहिलेला एक लेख (बहुदा वाढदिवसाचाच असावा) मला आठवतोय्! त्यात त्यांनी किती लेख लिहिले, किती प्रतिसाद आले वगैरेची जंत्री दिली. ती पाहून ते भलतेच "बहुप्रसवा" होते इतके कळले.
नंतर जे ते नाहींसे झाले ते कां ते कळले नाहीं. जाता-जाता त्यांनी कांहीं लेख लिहिला असला तर मी तो Miss केला!
असो. माझी ओळख तशी 'झुंजूमुंजू'च त्यामुळे जास्त परिचय नाहीं. पण खूप जणांना व तेही जाहीरपणे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायची आपल्याला आवड आहे. म्हणून दिल्या.
त्यांच्या जाण्याबद्दल कांहीं लेख त्यांनी लिहिला असल्यास मला त्याची लिंक द्यावी ही विनंती. मधे मिपावरच ते हल्ली अमेरिकेत आहेत असा पुसटसा उल्लेख वाचल्याचे स्मरते!
प्रतिक्रिया
हम्म्म..........
शुभेच्छा
मिपावर पुन्हा लिहायला सुरुवात करा.
+१
+१
+१
+४
सामंत काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...
+१
शुभेच्छा!
श्री. सामंतकाकांना
दोन पैसे
वैयक्तिक मला एका तैंचा
शुभेछा!
हम्म...!
सामंतकाकांना
मी नवा होतो.....