साहित्य : १०० ग्रॅम स्वीट कॉर्न, १कांदा, १टोमॅटो, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी(१बटाटा), थोडी बारीक शेव, १ टीस्पून चाट मसाला, १कप दही, १/२वाटी कॉथिंबीर.

From Corn Bhel ">
चटणी करता साहित्य – १ वाटी कोथिंबीर, २हिरव्या मिरच्या, पुदिना पाने (मूठभर), मीठ, साखर.
गोड चटणी साठी- १ वाटी गुळ, १/२वाटी चिंचेचा कोळ, १ टी स्पून लाल तिखट, मीठ.
कृती - प्रथम कोथिंबीर, मिरची, मीठ, पुदिना आणि साखर एकत्र वाटून एका बाउल मधे काढून ठेवावे. नंतर चिंचेचा कोळ, गूळ, तिखट-मीठ एकत्र वाटून एका बाउल मधे काढून ठेवावे. दोन्ही चटण्या तयार झाल्या.
स्वीट कॉर्न वाफवून घ्यावेत.

From Corn Bhel ">
कांदा बारीक चिरून घ्यावा. टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. दही फेटून घ्यावे.

From Corn Bhel ">
नंतर एका बाउलमधे वाफवलेले कॉर्न, चिरलेला कांदा आणि टोमॅटो, बटाट्याच्या फोडी, १ चमचा हिरवी चटणी, २ चमचे गोड चटणी, २ टेबल स्पून फेटलेले दही, चाट मसला एकत्र करावे. वरून बारीक शेव घालावी. शेवटी कोथिंबीर घालून खायला द्यावे. (आवडीप्रमाणे वरून लाल तिखट भुरभुरावे.)

From Corn Bhel ">

From Corn Bhel ">
पा.कृ.- सौ. ज्योती पळसुले.
फोटो- चिंतामणी

| From Corn Bhel |
वाचने
5024
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
वारलो
लई भारी
बाहेरच्या खाण्यातली मजा
छान रंगीबेरंगी फोटू! चवदारही
नुसते फोटु दाखवुन जळवा
मस्त....!
तोंडाला पाणी सुटले...
लई भारी.........
चटकदार पाककॄती.
कॉर्न चाट
मी कॅन्ड मके घेते
In reply to कॉर्न चाट by स्वाती दिनेश
खास..करून पाहतो
अप्रतिम आहे....