Skip to main content

कॉर्न चॅट

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 14/08/2010 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १०० ग्रॅम स्वीट कॉर्न, १कांदा, १टोमॅटो, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी(१बटाटा), थोडी बारीक शेव, १ टीस्पून चाट मसाला, १कप दही, १/२वाटी कॉथिंबीर. From Corn Bhel"> चटणी करता साहित्य – १ वाटी कोथिंबीर, २हिरव्या मिरच्या, पुदिना पाने (मूठभर), मीठ, साखर. गोड चटणी साठी- १ वाटी गुळ, १/२वाटी चिंचेचा कोळ, १ टी स्पून लाल तिखट, मीठ. कृती - प्रथम कोथिंबीर, मिरची, मीठ, पुदिना आणि साखर एकत्र वाटून एका बाउल मधे काढून ठेवावे. नंतर चिंचेचा कोळ, गूळ, तिखट-मीठ एकत्र वाटून एका बाउल मधे काढून ठेवावे. दोन्ही चटण्या तयार झाल्या. स्वीट कॉर्न वाफवून घ्यावेत. From Corn Bhel"> कांदा बारीक चिरून घ्यावा. टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. दही फेटून घ्यावे. From Corn Bhel"> नंतर एका बाउलमधे वाफवलेले कॉर्न, चिरलेला कांदा आणि टोमॅटो, बटाट्याच्या फोडी, १ चमचा हिरवी चटणी, २ चमचे गोड चटणी, २ टेबल स्पून फेटलेले दही, चाट मसला एकत्र करावे. वरून बारीक शेव घालावी. शेवटी कोथिंबीर घालून खायला द्यावे. (आवडीप्रमाणे वरून लाल तिखट भुरभुरावे.) From Corn Bhel"> From Corn Bhel">
From Corn Bhel
पा.कृ.- सौ. ज्योती पळसुले. फोटो- चिंतामणी

वाचने 5024
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

नुसते फोटु दाखवुन जळवा च्यामारी !! घरी आलो की देतात मग खारे शेंगदाणे नुसते ;)

फोटो लैच भारी. -दिलीप बिरुटे

बरेच दिवसात केले नाहीये, हा फोटो बघून लवकरच करायला हवे आहे याची तीव्र जाणीव झाली आहे,:) (मी कॅन्ड मके घेते, ते वाफवायची गरज भासत नाही.) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मी कॅन्ड मके घेते चांगले आहे. तुमचा वेळ वाचेल त्यामुळे. पुढच्यावेळी पा.कृ.टाकताना अश्या व्यवहार्य सुचनांचा विचार करणात येईल.

अप्रतिम आहे....जिभेचे लाड पुरवण्यासाठी थोडा हटके पदार्थ आहे.