मंडळी नमस्कार.
अंह! अंह!!
अपर्णाची गल्ली चुकली कि काय ? अस नका वाटून घेऊ !
आम्ही इथे अगदी बरोबर पत्त्यावर आलो आहोत.
तर पाहिलं नमन त्या गणपाला!! द्या आशीर्वाद हो मजला! पाक कृतीचा वसा चालवण्याला!
माझा दुसरा साष्टांग जागुताई! घे लेकरास जाणून बाई !
तिसरा नमस्कार केशवजी तुम्हा! द्या आशीर्वाद आज आम्हा!
चला सुरुवात करू.
श्रावण म्हंटल कि जशी हिरवागार साज ल्यालेली धरित्री दिसते, तशीच मला जाणवते आपली सुध्धा त्या रुपात सामावून जाण्याची, त्या जल्लोषात सामील होण्याची अनावर आस!
म्हणूनच कि काय श्रावणात बक्कळ सण असतात.
आज चतुर्थी! भावाचा उपास! अन नागराजाला भाऊ मानून त्याच्या पूजेचा आज पहिला दिवस!
आज आमच्या कोल्हापुरात धपाटे केले जातात! केले जातात, घातले नाही!
तर घ्या सामान लिहून.
साहित्य:-
१ पेला तांदूळ.
१ वाटी गहू.
१ वाटी ज्वारी.
१ वाटी हरभरा डाळ.
२ टेबल स्पून धने.
१ टेबल स्पून जिरे.
हे सार छानस भाजून घ्या. सर्व भाजत आल कि शेवटी धने अन मग आच बंद करून जिरे मिसळा. याच बारीक पीठ दळून आणा.
आता हिरवा मसाला.
काही जास्त नाही,
कोथिंबीर १/२ जुडी.
लसूण एक गड्डा.
हिरव्या मिरच्या ३ ते ४ ( वा आवडी नुसार)
हे सार चर्नर मध्ये फिरवून घ्या.
आता दळून आणलेल्या पिठात थोडी हळद , मीठ, अन हा मसाला मिक्स करा.
पाणी घालून पीठ मऊसर मळून घ्या.
आता एक करा. जरा दोन चार मित्र मंडळींना फोन करुन,' धपाटे खायला' येण्याचा आग्रह करा. ते लोक बावरुन जाउन, "नको नको माझ्या वाटणीचे तुच खा" अस म्हणतील. नंतर चिडवायला बर, मैत्री साठी एव्हढ पण नाही करत म्हणुन!
एक साधारण भाकरीला घेतो ना तेव्हढ्या आकाराचा गोळा घ्या, माझ्या कडे धपाट्याची खास नॅपकिन असते. बाकीच्या वेळी ती वाळवून फ्रीज मध्ये ठेवते मी.
तर नॅपकिन ओला करून पोळपाटावर पसरून त्यावर हा गोळा ठेवा अन हलक्या हाताने थापत थापत धपाटा पसरून घ्या.
तव्यावर थोड तेल टाका. त्यावर नॅपकिन उचलून उलटी टाका. बोटांनी छोटी छोटी छिद्र तयार करा अन नॅप्कीन काढून घ्या.
बाजूने थोड तेल सोडा अन मग अगदी भरगच्च पाण्याचा शिपका मारून तव्यावर झाकण घाला.
एक २ ते ३ मिनिटात धपाटा तयार! हा एका बाजूनेच भाजतात. भाजताना मारलेल्या पाण्याच्या शिपक्याने तो खुसखुशीत तर होतोच पण तव्या कडच्या बाजूला हलका कुरकुरीत पण होतो.
याच्या बरोबर खरतर काळ्या वाटण्याची उसळ करतात. पण मला इथे नाही मिळाले म्हणून मी हिरव्या वाटण्याची उसळ केली.
भिजवलेले वाटाणे २ वाट्या .
कांदा कापून १ .
अस्सल कोल्हापुरी मिसळनीच तिखट.
मीठ , आमसूल, अन थोडा गूळ वा साखर.
भिजलेले वाटाणे कोरडे भाजून घ्या. अन जमल तर त्याच कढइत थोडे थोडे फोडून घ्या .
तेलावर जिरे, मोहरी, कडीपत्ता , हिंग अन कांदा परतून घ्या.
वाटाणे मिसळा. हळद मीठ अन तिखट घाला.
भरपूर पाणी घालून चांगल शिजू द्या.
झाल!
मात्र वाढताना हिरव्या मिरचीचा खरडा, मस्त दही, लोणी अगदी मस्ट!!
एकदा खाऊन बघा, परत परत बनवाल!
वाचने
11912
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
हेल्प! हेल्प! जरा कुणी फोटो
वाचताना प्लिज 'गणपा भाउला'
In reply to हेल्प! हेल्प! जरा कुणी फोटो by स्पंदना
आता कस्सं??
वाह झक्कास आहे एकदम.
१ पेला तांदूळ, १ वाटी गहू, १
मीही येथेच अडकलो
In reply to १ पेला तांदूळ, १ वाटी गहू, १ by बहुगुणी
बहुगुणी अन बे.ला. कष्टाविण फळ
In reply to मीही येथेच अडकलो by बेसनलाडू
खुमासदार लेखन.
अपर्णातै कुठे फेडाल ही पापं
मस्त
शन्का
नाही. त्यावर जे पाण्याचा
In reply to शन्का by प्राजक्ताचि फुले
वाव !!
हा पदार्थ खाउन कोणाचे धपाटे
मला खुप आवडतात.
उद्याच
छान छान
मस्त
वा वा वा.. तोंडात खळकन पाणी
छान
मस्त पाकृ!
आयायायायायायायायाया...
काल केले मि
छ्या! हे असलं काही करायचं आणि
आमच्या शेजारी एक काकू राहत
मी लहान होतो त्यावेळची
खल्लास!