घराकडे येताना मला काल पावसाने गाठले,
जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....!
भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,
वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची xyz...!
जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,
तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...!
तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली,
लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...!
"भिजत कशाला जातोस...? पाउस जाईपर्यंत माझ्या घरी थांब",
"राहते जवळच मी, नाही जास्त लांब...."
ऐकून शब्द तिचे ते पावसात आला मला घाम,
टाळण्यासाठी म्हटलो मी, "मला आहे जरा काम...!"
बराच आग्रह करून ती मला घरी घेउन गेली,
स्वत:च्या हाताने तिने मग कॉफी तयार केली...!
कॉफी देताना तिच्या चेह~यावरचा पाण्याचा थेंब कपात पडला,
त्यामुळे कदाचित कॉफीचा गोडवा अजुनच ज़रा वाढला...!
अचानक तिला आमच्या प्रेमाचा साक्षात्कार कसा हो घडला...?
लाजत म्हटली, "तुझ्या प्रेमाचा ज्वर मजवर चढला...!!!"
"उठ रे मेल्या...! कॉलेजात जायचे की नाही...?"
स्वप्न होते, सत्य नाही... झोपेतून उठवत होती आई...!
स्वप्न आठवून हसलो जरासा
कॉलेजात जेव्हा दिसली xyz ....
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
"वेट ड्रीम" यालाच म्हणतात
"वेट ड्रीम" यालाच म्हणतात काय? एक प्रामाणीक शंका.
+१
In reply to "वेट ड्रीम" यालाच म्हणतात by शुचि
जमेल. प्रयत्न करीत रहा.
पुढील प्रतिसादांसाठी हार्दिक शुभेच्छा.
हे तुम्हीच
हे तुम्हीच का?
https://dedhakka.blogspot.com/2009/07/marathi-kavita_16.html
००७
In reply to हे तुम्हीच by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाव बदल तुझे.
३_१४ विक्षिप्त अदिती ऐवजी 007_JB अदिती कर.