Skip to main content

जेजूरी गडावर नांदे मल्हारी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 07/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
देवा तुझी सोन्याची जेजूरी जेजूरी गडावर नांदे मल्हारी देवा तुझी सोन्याची जेजूरी ||धृ|| देव बसलाय उंच गडावर चला जावू चढू पायर्‍या हजार गडकोट बांधला करण्या संरक्षण वेशीतून जावू घेवू देवाचं दर्शन बेल भंडारा उधळूनी बोला यळकोट यळकोट जय मल्हारी देवा तुझी सोन्याची जेजूरी ||१|| देव हा खर्‍या शुरांचा राजा शिवाजी, मल्हाररावांचा पराक्रमी उमाजी नाईकांचा गोरगरीब रयतेचा मेंढरासंग धनगरांचा अशा देवाची करू वारी देवा तुझी सोन्याची जेजूरी ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०७/०८/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3611
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया