नकोन नकोना आता नकोना
तो: ऐ ये ना
ती: अंहं नकोना, नकोना
तो: नकोना नकोना आता नकोना ||धृ||
ती: अवेळी या वेळी तू सतावी मला
इथे नाही कुणी आवर स्व:ताला
तो: नको करू बहाणे का छळशी मला
छळण्याचा खेळ बरा जमतो तूला
तू जवळ ये अथवा मला जवळ घे ना ||१||
ती: अंहं नकोना
तो: नकोना नकोना आता नकोना
ती: इतर वेळी तू रे भोळा सांब माझा
अशा वेळी काय होई न राहतो तूझा
तो: उगा का प्रश्नोत्तरे तूच विचार मनाशी
अशा वेळी काय मागणे हे तू जाणशी
अंतर मिटवाया दुर राहू नको ना ||२||
ती: अंहं नकोना
तो: नकोना नकोना आता नकोना
ती: चल जा हट सोड तू वाट माझी
ओरडून सांगेन मी तक्रार तुझी
तो: माहीत नाही का काय लागे मला
काय जे हवे तूला तेच हवे मला
मग का ओरडूनी तू सांगे सकळांना ||३||
ती: दया मला येई तूझी तू रे माझा
तू माझा असूनी दया येते मला
कशाला मग मी त्रास देईन तूला
बहाणे नव्हे हा तर रूकार माझा
वेड्या, चल जवळ येना तू जवळ येना ||४||
दोघे: हं हं हं हं हं ला ला ला ला ला
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१०/०८/२०१०
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1946
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वरील काव्याचे शिर्षकात व
+१००००००००००००००००००००००
In reply to वरील काव्याचे शिर्षकात व by पाषाणभेद
ती: अवेळी या वेळी तू सातावी
धन्यवाद योगेश. ती म्हणतेय
In reply to ती: अवेळी या वेळी तू सातावी by कानडाऊ योगेशु
संपादक कुठे गेले?
अत्यंत खेदाने सहमत म्हणाव
In reply to संपादक कुठे गेले? by क्रेमर
आवश्यक ते संपादन केले आहे.
मुळ कवितेत चुकीची दुरूस्ती
In reply to आवश्यक ते संपादन केले आहे. by संपादक मंडळ
इतर वेळी तू रे भोळा सांब