" बेधुंद कोसळण्यार्या पावसात "
" भिजुन परतल्यावर "
" आरशासमोर ओलेचिंब "
" त्वचेशी एकसंध झालेले "
" कपडे बदलताना "
" बघ तुला माझी आठवण येते का ? "
" चिमण्या परतण्याच्या शांत सांजवेळी "
" वाफाळलेल्या चहाचा "
" सुंगध श्वासात शिरत असताना "
" उबदार रात्रीची हलकीशी "
" चाहुल लागत असताना "
" बघ तुला माझी आठवण येते का ? "
" किचनमध्ये काळ्या मसाल्याची "
" वांग्याची भाजी बनविताना "
" नाजुक चिमटीत धरुन "
" मिठाचा हात फिरवताना "
" तर्जनीतल्या अंगठीकडे पाहुन "
" बघ तुला माझी आठवण येते का ? "
" पहाटे पहाटे अंथरुणात "
" हवेत मंद-मंद गारवा पसरल्यावर "
" अंगावरचं पाघंरुण शोधताना "
" बघ तुला माझी आठवण येते का ? "
" स्कुटीवर येता-जाता "
" मंद सर कोसळत असताना "
" त्या तुरळक रहदारीच्या "
" ऊंबराच्या झाडाखाली "
" वडा-पावच्या गाडीवर "
" ऊडदाची भजी पाहुन "
" बघ तुला माझी आठवण येते का ? "
" शेवटी केली कविता "
" तुझ्यासाठी अन"
" केली तुला अर्पण "
" वाचता-वाचता हलकसं "
" हळव होताना "
" बघ तुला माझी आठवण येते का ? "
प्रेरणा : कुठेतरी वाचलेले "तुला माझी आठवण येते का "
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7740
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुहास आवडली रे
याला
'लटकल्याचा' हा शब्द काळजाला
In reply to याला by श्रावण मोडक
सून्दर मनोगत ! ! !
छान कविता
सही
गारवा इफेक्ट !
मस्त जमली आहे,अगदी काळया
होमसिक झालास का?
तू दाखविलेल्या पाकृमधिल मसाल्याला, काळा मसाला म्हणतात काय ??
अरे...
कोणताही एक्सपर्ट डॉक्टर नको....
In reply to अरे... by धमाल मुलगा
म्हणुन तर हो! ज्या डॉक्टरलाच
In reply to कोणताही एक्सपर्ट डॉक्टर नको.... by प्रसन्न केसकर
एकाच डॉक्टरला इलाज करता
In reply to कोणताही एक्सपर्ट डॉक्टर नको.... by प्रसन्न केसकर
:-)
कविता
सुंदर.
खुपच छान आहे....