Skip to main content

" बघ तुला माझी आठवण येते का ? "

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 09/08/2010 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
" बेधुंद कोसळण्यार्‍या पावसात " " भिजुन परतल्यावर " " आरशासमोर ओलेचिंब " " त्वचेशी एकसंध झालेले " " कपडे बदलताना " " बघ तुला माझी आठवण येते का ? " " चिमण्या परतण्याच्या शांत सांजवेळी " " वाफाळलेल्या चहाचा " " सुंगध श्वासात शिरत असताना " " उबदार रात्रीची हलकीशी " " चाहुल लागत असताना " " बघ तुला माझी आठवण येते का ? " " किचनमध्ये काळ्या मसाल्याची " " वांग्याची भाजी बनविताना " " नाजुक चिमटीत धरुन " " मिठाचा हात फिरवताना " " तर्जनीतल्या अंगठीकडे पाहुन " " बघ तुला माझी आठवण येते का ? " " पहाटे पहाटे अंथरुणात " " हवेत मंद-मंद गारवा पसरल्यावर " " अंगावरचं पाघंरुण शोधताना " " बघ तुला माझी आठवण येते का ? " " स्कुटीवर येता-जाता " " मंद सर कोसळत असताना " " त्या तुरळक रहदारीच्या " " ऊंबराच्या झाडाखाली " " वडा-पावच्या गाडीवर " " ऊडदाची भजी पाहुन " " बघ तुला माझी आठवण येते का ? " " शेवटी केली कविता " " तुझ्यासाठी अन" " केली तुला अर्पण " " वाचता-वाचता हलकसं " " हळव होताना " " बघ तुला माझी आठवण येते का ? " प्रेरणा : कुठेतरी वाचलेले "तुला माझी आठवण येते का "
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 7740
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

याला काय झालंय? बंगळूरमध्ये लटकल्याचा विरह म्हणायचा का हा? पुलेशु.

आवडली कविता.

कविता छान, "पण" "इतकी" "अवतरणे" "कशासाठी" "हे" "कळले" "नाही !"

" किचनमध्ये काळ्या मसाल्याची " " वांग्याची भाजी बनविताना " " नाजुक चिमटीत धरुन " " मिठाचा हात फिरवताना " कविता छान, पण तुझे हल्ली काही खरे दिसत नाही कवितेत " " काय , अन पाकृ मध्ये !! काय हम्म्म, तू खरंच तिला miss करतो आहेस तर ..

कुणीतरी ह्याला इनलॅकमध्ये अ‍ॅडमिट करा रे...केस गंभीर आहे, एक्सपर्ट डॉक्टरच्या ताब्यात द्या लवकर. ;)

In reply to by प्रसन्न केसकर

म्हणुन तर हो! ज्या डॉक्टरलाच फक्त इलाज जमेल त्याच डॉक्टरला आपण एक्स्पर्ट म्हणणार ना? ;)

सुहास सहा कडवी आहेत म्हणजे किमान सहा जणींकडून उत्तर मागतोयस की काय ;-)

कविता आवडली. साध्या शब्दांमधूनसुद्धा हवा तो परिणाम साधणारी. :-)

या कवितेची मात्र मला नेहमीच आठवन होत राहील.