काश्मिर व ईतर....
नमस्कार,नमस्कार.....
काश्मिरमधल्या हींसाचाराची बातमी टीव्हीवर येत होती.हल्यात काहीतरी ४-५ माणसं मेली होती.हा आता काही गंभीर विषय राहीला नाही..असो.मला काहीतरी वेगळ बोलायच आहे.
मी आमच्या राजाधिराज,परमपुज्य बापुंबरोबर टीव्ही बघत होतो.बापु चहा फुकत टीव्ही बघत होते.
काश्मिरची बातमी आली.
मी(मनात) :च्यायला ह्या लोकांच्या!!! एक तर सोडुन द्या काश्मिर,नायतर मरा असेच कोंबडीसारखं!
मी(बापुंना उद्देशुन): काय करायचाय काश्मिर??....काय काश्मिरमधे फीरायला गेलेल्या पर्यटकांच्या पैशांवर आपला देश चालतो का?........द्या पाकला तो काश्मिर्,काय बिघडणार आहे!!........
बापुंमधला सैनिक जागा झाला.काश्मिरच्या फळांचा रंग ते आतंकवाद्यांशी झालेली मुठभेड असे सर्व कीस्से आम्ही कान पकेपर्यंत ऐकत आलो आहोत.पण आमचे बापु कधी सांगताना थकले नाहीत.पण आता मी कधी ते 'आर्मीपुराण' गायला लागले की 'माहीतेय हे मला,तुम्ही सांगितलय' अस बोलुन सुटका करुन घेतो.बापु गप्प बसले की हायस वाटत.
बापु('अरे मुर्ख बालक!' ह्या भावात):अरे वेडा आहेस का तु! मुसलमान व चीनी घुसतील ना बॉर्डरमधुन!!
मी: नवीन बनवा बॉर्डर,काय भितिंच बाधांयच्या आहेत ना?
बापु: अरे वेडा आहेस का तु?
मी(मनात):अहो मुद्याचं बोला ना,कशाला उगाच कान चावताय?
बापु:ते डोंगर व आजुबाजुच मौसम(ईथे भौगोलिक स्थीती असा अर्थ) आहे म्हणुन आपण टीकलोय.मिलिटरी आपली स्ट्राँग आहे.
मी(मनात):तरी बोललो अजुन बढाई कशी नाही मारली.
बापु:जर काश्मिर दीला,तर भारत संपेल.
मी: हॅ!!.............अस थोडीच आहे,मी तर हे अस काहीतरी पहील्यादांच ऐकतोय.अस काहीच नाहीये.(कार्ट मोठ झालं की अस सरळ मनातल बोलुन टाकत.)
बापु: नाहीतर काय तसच आहे,हे साले मीडीयावाले मुर्ख बनवतात.
मी:नाही तस काही नाहीये,कसले डोंगर नी काय!.....आता बेळगावच बघा.ज्यांना 'मराठी,मराठी' ओरडायला आवडतं ना तेच बोलतायत बेळगाव वेगळ करा म्हणुन नाहीतर सर्व ठीक आहे तिथे.आणि दीला आपल्याला बेळगाव तर कर्नाटकला काय फरक पडतोय.आणि नाही दीला तर महाराष्ट्राच काय बिघडणार आहे?
बापु:अरे आपली मराठे लोक आहेत तिथे परराज्यात!(हा मनसेच्या बातमीचा परीणाम)
मी:अहो त्यांना आरक्षण पाहीजे,आपल्याला ईथे जन्म घेउन चार आण्याचं तरी आरक्षण भेटलय का?
बापुंकडे बोलायला काहीच नव्हत्,माझा मुद्दा पटला म्हणुन बापु उठुन निघुन गेले.
मी चर्चा संपवल्याचा आनंद घेउन बाहेर गेलो.पण मनात तीच गोष्ट आली,"अरे देउन टाका तो काश्मिर पाकला आणि नको ते बेळगाव...च्यायला लो़कांचा त्रास तरी वाचेल!!"
नोंद :'स्वातंत्र बेळगाव'प्रेमींनी आम्ही काही चुकीचं लिहल असल्यास,थोडीशीच माहीती पुरवुन आमच्या अज्ञानात भर टाकावी.
जय हींद!!!!!
प्रतिक्रिया
कोक, झाड आणि पॉपकॉर्न..
मालक.. थोडं घ्या सरकुन...
नाना, सगळी झाडं रीजव करुन,
नग रे बाबा नग आपल्यावालीच
दिवे !
+१
शान्या दारु ज्यादा प्यालास काय?
वेताळा, अरे काश्मिरने
मस्त रे शानबा! तुला
किती सोप्पा उपाय मांडला. आपल
ही घ्या तुमच्या ज्ञानात एक
शानबा,.....काथ्याकूट, इतिहास, विचार