कुंडलीने घात केला
कसा कुंडलीने असा घात केला
दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला
असे वाटले की शिखर गाठतो मी
अकस्मात रस्ता तिथे खुंटलेला
विचारात होतो, अता झेप घ्यावी
तसा पाय मागे कुणी खेचलेला
खुली एकही का, इथे वाट नाही
हरेक पथ येथे कुणी हडपलेला?
पटू संसदेचा, तरी दांडगाई
म्हणू का नये रे तुला रानहेला?
दिशा दर्शवेना, मती वाढवेना
कसा मी स्विकारू तुझ्या जेष्ठतेला?
"अभय" चेव यावा अता झोपल्यांना
असे साध्य व्हावे तुझ्या साधनेला
गंगाधर मुटे
...................................................
(वृत्त-भुजंगप्रयात)
वाचने
1898
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
ठीक पण..
दिशा शोधण्यातच् - असा उच्चार
In reply to ठीक पण.. by पॅपिलॉन
धन्यवाद.
In reply to दिशा शोधण्यातच् - असा उच्चार by धनंजय
कळले नाही
In reply to ठीक पण.. by पॅपिलॉन
वृत्तांचे सोवळे ओवळे
खरे आहे.
In reply to वृत्तांचे सोवळे ओवळे by सुनील
इथे असहमत
In reply to खरे आहे. by गंगाधर मुटे
सहमत.