रानवाटा शोधतांना
रानवाटा शोधतांना हरवले माझे मन ||धृ||
हरवले मीच मला, गेलो तुला सापडून
सोनसकाळी एकेदिनी | एकांती रानीवनी
नजरेच्या टापूमधे | अथांग निळे पाणी
डोळा हलकेच दिसे | मुर्ती साजरी छान ||१||
गंध शोधीत जाता | रुप समोर येई
वाटेतून चालतांना | शब्द सलज्ज होई
अलगद थरथर | ओठी आली दिसून ||२||
चालतांना दशदिशा | मला न उरले भान
आभाळाने धरतीस | दिले भरून दान
सावलीत उन्हाच्या | तळपती जिव दोन ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०८/२०१०
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1910
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे
आवडली
मस्त रे
वाह!
अय्यो हे क्काय? तुमी तर सहज
In reply to वाह! by सहज
खास नाही
कवितांमध्ये प्रयोग करून करून
In reply to खास नाही by पॅपिलॉन
छान कविता !