Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by यशोधरा on Mon, 05/05/2008 - 11:56
  • Log in or register to post comments
  • 8507 views

प्रतिक्रिया

Submitted by विसोबा खेचर on Mon, 05/05/2008 - 12:05

Permalink

वा!

पण या अजूनही उभ्या असलेल्या अन नसलेल्याही झाडांच्या, बागांच्या आठवणी मात्र अगदी आवर्जून मी मनाशी जपल्या आहेत, जपणार आहे. त्यादिवशी अचानक सगळं प्रकर्षानं आठवलं, लिहावसं वाटलं म्हणून लिहिलं. वा! अतिशय सुरेख लेखन. वाचून मनाने एकदम कोकणातच गेलो! यशोधराजी, अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन, आठवणी येऊ द्या... आपला, (वृक्षवल्लींचा प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Mon, 05/05/2008 - 12:06

Permalink

सुंदर / चित्रदर्शी

>>पाऊस संपल्यावर धुतली गेलेली झाडं किती सुंदर दिसायची!! खरय ! >>मधूनच शांतता भेदणारी कोण्या पक्ष्याची सुरेल साद, हो मग लगेच पटकन मान वळवुन त्या दिशेला पहायचं, अन त्याच नादात कितीतरी वेळ फांद्यामधे त्याला शोधत रहायचे. >>कालांतराने स्वतःच्या आयुष्यात गढून गेल्यावर ह्या आठवणींच दु:खही पुसट होत गेलं.... छान ओळ. अतिशय सुंदर सशक्त लिखाण यशोधरा, खुप आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Mon, 05/05/2008 - 12:20

Permalink

सुरेख..

सुरेख लेख यशोधरा.. तुमच्या 'वृक्षवेलींच्या आठवणी' फार आवडल्या.बकुळफुलं तर मला नॉस्टेल्जिक करून गेली. बकुळीचा मोठ्ठा वृक्ष आमच्या अंगणात होता.त्या फुलांचा मंद दरवळ पसरत असे.भरपूर फुलं वेचून सरांवर सर गुंफून माळायचे ते आठवून तो सुगंध आत्ता इथे दरवळला असं वाटलं, स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 05/05/2008 - 14:00

Permalink

उत्कट....

संवेदनशील मनातून, उत्कटतेने शब्द, मिपावर, धबधब्याप्रमाणे कोसळले आणि कोवळ्या उन्हात एक नयनरम्य इंद्रधनुष्य साकारले - वृक्ष वेलींच्या आठवणी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Mon, 05/05/2008 - 14:09

Permalink

मस्त लेखन!

माझ्याही आठवणी दाटून आल्या. बकुळ संबंधीची माझी आठवण इथे वाचा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Tue, 05/06/2008 - 04:08

In reply to मस्त लेखन! by प्रमोद देव

Permalink

+१

खोल विहिरीत डोकावून आपल्याच आवाजाचा प्रतिध्वनी ऐकणं, झाडांखालून फिरणं, फुलं गोळा करणं हे सगळे लहानपणचे उद्योग, मनातल्या मनातच करते!! नुसत्या आठवणींनी देखील मनाला उभारी मिळते. असेच. उत्तम लेखन.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 05/05/2008 - 14:30

Permalink

सुंदर.....

यशोधराजी खुपच सुंदर लिहता तुम्ही..... (आमराईचा आनंद घेणारा) मदनबाण.....
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 05/05/2008 - 16:35

Permalink

आभार

तात्या, आनंदयात्री, स्वाती, प्रभाकर, प्रमोदकाका, मदनबाण तुम्हां सार्‍यांचे खूप आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 05/05/2008 - 17:32

Permalink

छान! किती

छान! किती सहज लिहिल्यासारखं वाटतंय...कोणाच्या तरी मनात उतरुन त्याच्या आठवणींचे पडदे बाजूला सारुन मनात जिवापाड सांभळलेलं एखादं नाजुकसं चित्र पाहिल्यासारखं वाटलं
पाऊस संपल्यावर धुतली गेलेली झाडं किती सुंदर दिसायची!!
खरंय... मलाही आवडतो...ऐन दुपारी पडलेल्या पावसात मनसोक्त भिजलेला गुलमोहोर,पावसानंतरच्या कोवळ्या उन्हात न्हाऊन निघालेला...छान चमकत, झळाळत असतो... काय नातं आहे त्याचं आणि माझं कोण जाणे...पण कितीही मूड खराब असेल आणि पावसात भिजलेला गुलमोहोर उन्हात चमकताना दिसला की एकदम प्रसन्न वाटतं :) यशोधराताई, और भी लिख्खो...
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 05/05/2008 - 21:56

Permalink

फार आवडला लेख तुमचा.

आत्तापर्यंत अनेक वेळा असा हळहळलो आहे मी. फर्गसन रस्त्यावरील वटवृक्षांची कत्तल झाल्यावर बोडका झालेला फर्गसन रस्ता बघून अजूनही कसनुसे होते. आपल्या लेखाने सुंदर हिरवाईच्या स्मृती जाग्या केल्या.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Tue, 05/06/2008 - 01:10

Permalink

वा ..वा !

हाय यशोधरा ... आज परत एकदा लेख वाचला :)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 05/06/2008 - 02:04

Permalink

यशोधराजी, सुंदर लेखन!

कसल्याशा हतबलतेचे बळी होऊन तोडल्या गेलेल्या त्या अनाम वृक्षांबद्दल खूप आत कुठेतरी काहीतरी तुटलं. आणि त्याच वेळी बकुळ, प्राजक्त आणि चाफ्याच्या फुलांसारखाच झडझडून पडलेला हा आठवणींचा शिडकावा मन अंतर्बाह्य प्रसन्नही करुन गेला! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 05/06/2008 - 09:25

In reply to यशोधराजी, सुंदर लेखन! by चतुरंग

Permalink

सुंदर लेखन

कसल्याशा हतबलतेचे बळी होऊन तोडल्या गेलेल्या त्या अनाम वृक्षांबद्दल खूप आत कुठेतरी काहीतरी तुटलं. आणि त्याच वेळी बकुळ, प्राजक्त आणि चाफ्याच्या फुलांसारखाच झडझडून पडलेला हा आठवणींचा शिडकावा मन अंतर्बाह्य प्रसन्नही करुन गेला! असेच म्हणतो !!!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 05/07/2008 - 00:39

Permalink

चित्रा,

चित्रा, धमु (धमाल मुलगा एवढं लांबलचक नाव लिहायचा कंटाळा, म्हणून) :D, पेशवे सरकार, चतुरंग, डॉक्टरसाहेब, संदीप धन्यवाद. अरे संदीप, तूही आहेस का इथे? :) मस्तच आख्यान लावलंस!! मागेच सांगितलं तुला!!! धमु, गुलमोहराबाबत अगदी डिट्टो!! :) आमच्या घरासमोरच आणि अवती भवतीच्या परिसरातही आहेत गुलमोहर नशिबाने आमच्या :) तसच नवी पालवी फुटलेला पिंपळ पाहिलाय का संध्याकाळच्या किंवा सकाळच्या कोवळ्या उन्हांत? निव्वळ सोनेरी दिसतो! >>> फर्गसन रस्त्यावरील वटवृक्षांची कत्तल झाल्यावर बोडका झालेला फर्गसन रस्ता बघून अजूनही कसनुसे होते. अगदी, अगदी :( तसेच ते संचेती हॉस्पिटलच्या तिथले, ठुबे पार्कच्या जवळचे वडाचे वृक्ष तोडून टाकले, कसा भकास रस्ता वाटतो आता...... असो. मंडळी, ही साईट तशी उशीराच पाहिली, खूप आवडली म्हणून सदस्यत्व घेतलं, आणि लिहिलेल्या पहिल्याच लेखाचं अस कौतिक केलत त्याबद्दल खरच खूप छान वाटल!! धन्यवाद परत एकदा. :)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 05/07/2008 - 11:01

In reply to चित्रा, by यशोधरा

Permalink

धमु (धमाल

धमु (धमाल मुलगा एवढं लांबलचक नाव लिहायचा कंटाळा, म्हणून)
हरकत इल्ले....धमु हे नाव आमचे गुरुदेव श्री प्रमोद्रोणाचार्य ह्यांनी दिलं...तो हक्क खरं तर त्यांचा :) त्याशिवाय आमची इतर नावं (आणि आवडतीही) धमाल्या, धम्या, (आनंदयात्रीच्या भाषेत - करकोच्या! ) आपल्याला प्रेमाने कोणत्याही नावानं हाक मारलेलं आवडतं...भगवान विष्णूंनंतर बहुधा आमचाच नंबर...एक मित्र डायरेक्ट 'कन्हय्या' अशी हाक मारतो..आणि आम्हीही गोपींच्या मदतीला धावल्यासारखे ओ देऊन जातो :)
नवी पालवी फुटलेला पिंपळ पाहिलाय का संध्याकाळच्या किंवा सकाळच्या कोवळ्या उन्हांत? निव्वळ सोनेरी दिसतो!
आहाहा.....काय आठवण करुन दिली...आम्ही पुर्वी वाड्यात रहायचो तिथलं पिंपळाचं झाड आठवलं... -(निसर्गवेडा) ध मा ल.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Wed, 05/07/2008 - 18:58

Permalink

सिह्गड

सिह्गड रोडवर पूर्वी फार डेरेदार वडाची झाड होति....... गेले ते दिवस
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Wed, 05/07/2008 - 19:47

In reply to सिह्गड by शैलेन्द्र

Permalink

आणि

कर्वेरोडवरपण. वाड्यांमध्येही भरपूर असायची. बिल्डिंग बांधताना सगळी पाडतात. रस्ता रुंदीकरणात तर हमखास पाडली जातात आणि रस्ता आहे त्याच्या दुप्पट वाढवतात. मग मला एक प्रश्ण पडतो की आहे ती झाडे डिव्हाडर म्हणून येतील असे पाहून ती न पाडताच का नाही रुंदीकरण करत.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Wed, 05/07/2008 - 20:19

Permalink

छान....

लेख छान झालाय. ओघवति शैली,दर्जेदार लेखन... लेख फारच आवडला. असेच लेख येउ द्यात. अभिनंदन =D> अबब अवांतर-प्रथम मला तर प्राजुताईंनी नाव बदलले कि काय असे वाटले होते. :SS नंतर हा तुमचा लेख आहे हे कळले. मि.पा. वर आणिक एक प्राजुताई आलेल्या दिसतात. :)
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 05/07/2008 - 23:20

Permalink

छान

सु॑दर लिखाण, डोळ्यासमोर चित्र उभा राहते,आणि लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात.
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on गुरुवार, 05/08/2008 - 02:29

Permalink

खूपच मस्त

खूपच मस्त झालाय लेख! आमच्या कॉलनीतली झाडं आठवली.. गुलमोहोर्,कॅशिया तर माझी खूप आवडती झाडं!! इथे सुद्धा आसपास इतकी सुंदर झाडं असतात, फुलं तर एक से बढकर एक.. पण नावंच माहीत नाहीत.. :| फोटो काढणार आहे १-२ दिवसात.. इथे टाकीन मग.. सुंदर फुलं पाहून काय छान वाटतं नं ! अजून लिही! तू छान लिहीतेस...
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 05/08/2008 - 07:50

Permalink

सुरेख!

यशोधराजी, एकदम बकुळीच्या फुलांसारखं नाजूक आणि सुंदर लिहिलंय तुम्ही! विशेषतः तुमच्या आजोळ्-पणजोळचं वर्णन वाचून आम्हांला आमचं आजोळ आठवलं!! एकदम डिट्टो, काही फरक नाही, असलाच तर इतकाच की आमच्या लहानपणी तिथे वीज नव्हती... मात्र, आ़जोळी आता कोणीच नसतं, वाचून काळजाला घरं पडतात हो!! आमच्याकडेही तेच! असं का व्हावं !!! तिथल्या माणसांनी ते सोडण्यात जगण्याची धडपड असेल पण बाहेरच्या माणसांनी (त्यात आपले आईबापही आलेच) असं का होऊ द्यावं? बाहेरच्या जगाने ओरखडल्यानंतर तोंड खुपसून रडायलाही शेवटी एक आपली हक्काची जागा लागते ना!! =(( असो. सुंदर लेख! अश्याच लिहीत रहा!!! -पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 05/08/2008 - 14:15

Permalink

आभार

शैलेंद्र, तेच तर ना.... नव्या नव्या इमारती उभारण्याचय नादात पर्यावरणाकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे... :( मनस्वी, झाडं त्याच्या मुळांसकट अलग करून दुसरीकडे परत रुजवत येतात, त्याचेही शास्र विकसित झालेय, पण मग खाबूगिरी कशी जमेल?? त्यामुळे ते तसलं काही होताना दिसत नाही.... अबब, शितल, भाग्यश्री, धन्यवाद. भाग्यश्री, लवकर टाक फोटो! :) डांबिस, धन्यवाद. >>> बाहेरच्या जगाने ओरखडल्यानंतर तोंड खुपसून रडायलाही शेवटी एक आपली हक्काची जागा लागते ना!! हो खरय, आणि आजी आजोबांपेक्षा अधिक आश्वासक जागा कोणती?? दुर्दैवाने, आता हे आधारवड फक्त स्मृतीत राहिलेत....
  • Log in or register to post comments

Submitted by सुवर्णमयी on गुरुवार, 05/08/2008 - 22:47

Permalink

मस्त

लेख आवडला.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com