आता बोला...

उदय ४२'s picture
उदय ४२ in काथ्याकूट
2 May 2008 - 7:15 pm
गाभा: 

मुकेश अंबानी यांच्या घराचे वैशिष्ट्य
- ४ , ५३२.३९ चौ. फूटाच्या प्लॉटवर १७३.१२ मीटर उंचीचे २७ मजल्यांचे घर
- प्रत्येक मजल्याची आणि त्या मजल्यावरील खोल्यांची अंतर्बाह्य रचना एकदम स्वतंत्र , निराळी
- पहिल्या ६ मजल्यांवर गाड्यांसाठी पार्किंग आणि ७ व्या मजल्यावर वाहन दुरुस्ती विभाग
- ८ व्या मजल्यावर भव्य ५० आसनी मिनी थिएटर
- ९ , १० , ११ , १२ या मजल्यांवर भव्य बाल्कनी गार्डन
- ९ वा मजला आपत्कालिन परिस्थितीत राहण्यासाठी
- १० वा आणि ११ वा मजला हा व्यायामशाळा , खासगी क्लिनिक , स्विमिंगपूलसाठी
- १२ वा आणि १३ वा मजला फक्त पाहुण्यांसाठी राखीव
- १४ आणि १५ क्रमांकाच्या मजल्यांवर आपत्कालिन परिस्थिती राहण्याची व्यवस्था
- शेवटचे चार मजले मुकेश अंबानी , नीता अंबानी आणि त्यांच्या तीन मुलांसह आई कोकिलाबेन यांच्यासाठी
- पाहुण्यांच्या मजल्यांवर तसेच अंबानी कुटुंबाच्या मजल्यांवर काचेतून अरबी समुद्र पाहण्याची व्यवस्था
- गच्चीत हेलिपॅड आणि हेलिकॉप्टरसाठी कंट्रोल रुम
- इमारतीत दोन्ही बाजूस चढण्या-उतरण्यासाठी जिने आणि ९ लिफ्ट
- जिन्यांवर आधारासाठी चांदीचे पाणी लावलेले कठडे
- घरात पूर्णवेळ काम करण्यासाठी ६०० कर्मचारी आणि त्यांच्यासाठी याच इमारतीत राहण्याची व्यवस्था !

मुंबई सारख्या शहरात धारावी एका टोकाला,आणि अंबानींचा हा महाल दुसर्‍या टोकाला,काय म्हणायचे याला?

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

2 May 2008 - 7:21 pm | ब्रिटिश टिंग्या

बोलती बंद झाली.

शितल's picture

2 May 2008 - 7:26 pm | शितल

विचारा॑ची गतीच म॑द झाली, हे सर्व वाचुन छान वाटले पण जास्त भावले नाही,

कारण मला इन्फोटेकचे नारायणमुर्ती आणि सुधा क्रुष्ण मुर्ती या॑चे राहणीमान आवडते, पैसा असला तरी त्याचा साधेपणा मनाला खुप भावतो, सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन त्या॑ची जीवनशैली मनाला भावते.

उदय ४२'s picture

2 May 2008 - 7:51 pm | उदय ४२

नारायण मूर्ती हा आदर्शच मानायला हवा...

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

भडकमकर मास्तर's picture

4 May 2008 - 11:43 am | भडकमकर मास्तर

मला इन्फोटेकचे नारायणमुर्ती
इन्फोसिस?

वरदा's picture

3 May 2008 - 2:25 am | वरदा

खरच सॉलीड आहे. :O ..पण ते त्या घरात खरंच किती वेळ घालवत असतील असा प्रश्न पडला :?
कारण मला इन्फोटेकचे नारायणमुर्ती आणि सुधा क्रुष्ण मुर्ती या॑चे राहणीमान आवडते
शितल खरं गं..

पिवळा डांबिस's picture

3 May 2008 - 3:59 am | पिवळा डांबिस

श्री. मुकेश अंबानी यांना त्यांच्या नवीन घराबद्दल शुभेच्छा!!
आणि ६०० कर्मचार्‍यांना त्या घरात रोजगार दिल्याबद्दल अभिनंदन!!

"उत्कट भव्य ते घ्यावे" वाटणारा,
पिवळा डांबिस

विसोबा खेचर's picture

3 May 2008 - 6:03 am | विसोबा खेचर

मुंबई सारख्या शहरात धारावी एका टोकाला,आणि अंबानींचा हा महाल दुसर्‍या टोकाला,काय म्हणायचे याला?

काय म्हणणार? काही म्हणू नका! :)

माझ्याकडे मुकेशइतका पैसा असता तर मलाही कदाचित असंच घर बांधावंसं वाटलं असतं! शेवटी हे सगळे पैशांचे खेळ आहेत, ज्याच्याकडे मुबलक पैसा असेल तोच असं करू शकेल! मुकेशकडे आहे म्हणून तो त्याला हवा तसा पैसा खर्च करतोय. आणि जळ्ळं 'असं करू का, किंवा नको?, हे त्याने आपल्याला थोडंच विचारलं आहे? :))

(साला, मुकेश अंबानी सारखं आपलंही टोलेजंग घर असावं असं क्षणभर वाटून गेलेला आणि पुढच्याच क्षणी भानावर आलेला!) तात्या.

सुनील's picture

3 May 2008 - 8:31 am | सुनील

नवरा-बायको आणि ३ मुले अश्या पंचकोनी कुटुंबाला ६०० नोकर आणि २७ मजले???

त्याचा पैसा आणि तो - आपण काय बोलणार?

जगातील सर्वात श्रीमंत (सध्या) व्यक्ती असलेले वॉरन बफे अजूनही आपल्या ५० वर्षांपूर्वी घेतलेल्या ३ बेडरूम अपार्टमेंटमध्ये राहतात असे ऐकून आहे. माझ्या सर्व गरजा येथे भागतात मग दुसरीकडे कशाला जा, असा त्यांचा विचार आहे!

काही वर्षांपूर्वी हर्शद मेहताच्या आलिशान घराची वर्णने आली होती. बिचार्‍याने शेवटचा श्वास घेतला तो ठाण्याच्या जेलमध्ये!

शाहरूख खानच्या घराची म्हणून काही प्रकाशचित्रे काही महिन्यांपूर्वी ढकलपत्रातून मिळाली होती. ते घर नक्की कोणाचे?

असो, आम्ही आपले आमच्या घरी सुखी आहोत!!

(सुखी) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भडकमकर मास्तर's picture

4 May 2008 - 11:45 am | भडकमकर मास्तर

परवाच्या एका मॅचला मुंबई ला सपोर्ट करताना जो अंबानी फॅमिलीतला अवाढव्य मुलगा पाहिला त्याला राहायल असेच घर हवे...
वा वा.. भरपूर लोकांना रोजगार उपलब्ध झाला असणार...

क्लिंटन's picture

4 May 2008 - 4:59 pm | क्लिंटन

अंबानींच्या टोलेजंग इमारतीला इतका विरोध करण्यासारखे काय आहे?

धीरूभाई आणि त्यांचे पुत्र मुकेश आणि अनील यांनी प्रचंड मोठा उद्योगसमूह उभा केला आणि त्यायोगे भारतातील अक्षरशः हजारो लोकांना रोजगार दिला आहे . जर हजारो कुटुंबे ज्याच्या उद्योगामुळे चालतात त्याला आपल्याच पैशाने टोलेजंग इमारत बांधून राहावेसे वाटले तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?

प्रत्येक माणूस आपापल्या ऐपतीप्रमाणे आपापली हौस पूर्ण करत असतो. आपल्यापैकी जवळपास सगळ्यांकडे भ्रमणध्वनी आहेच, अनेकांकडे गाडी पण असेल, काही मंडळी युरोप किंवा सिंगापूर- मलिशिया यासारख्या सहलींनाही जाऊन आलेले असतील. मी अमेरिकेत विद्यार्थी म्हणून असताना १५ वर्षे जुनी का होईना पण एक गाडी हौस म्हणून बाळगत होतो. अशी जमेल तेवढी हौस आपणही करत असतोच ना. अंबानांची ऐपत मोठी म्हणून ते मोठी हौस पूर्ण करू शकतात. मग त्यात चुकीचे काय?

त्यांना किती जागेची गरज आहे यावर इतरांनी मतप्रदर्शन करायची काहीच गरज नाही. तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न झाला.

सगळे श्रीमंत लोक हलकट आणि गरीब बिचारे ही 'टिपीकल' कम्युनिस्ट विचारसरणी आपण सोडून दिली पाहिजे. अंबानींसारख्या उद्योगपतींनी त्यांच्या शंभर पिढ्या आरामात राहू शकतील इतका पैसा कमावला आहे.त्यांनी आपले उद्योगधंदे बंद केले तर नुकसान त्यांचे नाही तर आपल्यासारख्या (अंबानींच्या तुलनेत) गरीबांचे आहे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

आनंदयात्री's picture

5 May 2008 - 12:57 pm | आनंदयात्री

असेच म्हणतो.