Skip to main content

चिंधी

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 05/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
चिंधी तू एक चिंधी, मी एक चिंधी, आपण सारे चिंधोट्या . असेच राहू धुळी मध्ये अन, उगाच मारू रेघोट्या | काळ मोकळा; काळ मोकळा, वेळ मोकळा जग ही भासे रिते रिते, अश्याच वेळी; स्वत: स्वत:ला उगाच अपुले मनही भिते | खरे खोटे अन चूक बरोबर, अशी मनाला खंत नको, आणिक व्यथित आठवणींचा उगाच ह्रदया डंख नको | म्हणुनी गड्या; म्हणुनी गड्या होऊनी चिंधी आपण होऊ निराकार , निर्जीव; निष्पाप गोष्टींचाही जगी या वापर अपरंपार | अपर्णा
लेखनविषय:

वाचने 1677
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

पटले नाही. >>>म्हणुनी गड्या होऊनी चिंधी आपण होऊ निराकार , निर्जीव; निष्पाप गोष्टींचाही जगी या वापर अपरंपार | निराकार, निर्जीव, निष्पाप - ही तिकडी एकत्र आणण्यातला उद्देश? आणि हेच व्हायचे, तर चिंधीच कशाला? इतरही कित्येक चांगल्या निनिनि वस्तु आहेत की. आणि जगाने आपला फक्त वापर करून फेकून द्यावे असे प्रतित होत आहे.

निर्जीव; निष्पाप गोष्टींचाही , जगी या वापर अपरंपार |' कसा? अहो या चिंधीनच तर नात रक्तान नाही भावनेन ठरत हे सत्य सुभद्रेला जाणवून दिल ! भळंभळंत बोट घेऊन आलेल्या त्या मिश्कील हरीच्या बोटाला बांधायला एक चिंधी तिला सापडेना ! अन अंगावरच भरजरी वस्त्र क्षणात चिंधी सम मानून भावनेला अर्पण करणाऱ्या द्रौपदीच भगिनी प्रेम या चिंधीनच तर दाखवलं

काळ मोकळा, वेळ मोकळा जग ही भासे रिते रिते, अश्याच वेळी; स्वत: स्वत:ला उगाच अपुले मनही भिते | .. ह्या कडव्यातला अर्थ आवडला, पण शब्दांची बांधणी नीटशी जमली नाही असे वाटते.

काळ मोकळा, वेळ मोकळा जग ही भासे रिते रिते, अश्याच वेळी; स्वत: स्वत:ला उगाच अपुले मनही भिते | खरं आहे . खरे खोटे अन चूक बरोबर, अशी मनाला खंत नको, आणिक व्यथित आठवणींचा उगाच ह्रदया डंख नको | असं झालं तर ....? छान आहे कविता !