मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ग्रिन चिकन

जागु · · पाककृती
लागणारे साहित्य: १ किलो चिकन साफ करुन धुवुन २ बटाटे फोडी करुन ग्रिन मसाला वाटण - मिरच्या १० (तिखटाच्या आवडीवर अवलंबुन) कोथिंबीर २ मुठ, पुदीना १ मुठ, आल १ इंच, लसुण ८-१० पाकळ्या. हिंग, हळद, चवीप्रमाणे मिठ १ लिंबु गरम मसाला १ चमचा तेल क्रमवार पाककृती: प्रथम धुतलेल्या चिकनला वरील वाटण, मिठ, हिंग, हळद, एक लिंबाचा रस चोळून घ्यावे व अर्धा तास मुरवत ठेवावे. मग तेलावर वरील सगळ टाकुन बटाट्याच्या फोडी टाकाव्यात. मग सगळ एकत्र करुन वाफेवर चिकन शिजु द्यावे. शिजल्यावर गरम मसाला टाकुन परत एक वाफ आणून गॅस बंद करावा. अधिक टिपा: बटाटे जरुरी नाहीत. आवडत नसतील तर नाही घातले तरी चालतात. मी बटाट्याचा वापर पुरवठ्यासाठी करते. ह्या चिकनला कांद्याची गरज नसते. तरीपण आवडत असल्यास वाटणातच घातला तरी चालेल.

वाचने 6178 वाचनखूण प्रतिक्रिया 17

पण बटाटे न घातलेलेच बरे अस मला वाट्त.. chicken ची taste कमी होईल. बाकी पाकृ खूप मस्तच आहे...आनि फोटो पण !!!! :-)

चिरोटा Fri, 08/06/2010 - 15:43
मस्तच. गो ग्रीन. दही घालुन मॅरिनेट करायची गरज नाही का?

सुनील Fri, 08/06/2010 - 17:34
एक्दम शिंपल दिसते! बटाटा नकोच आणि कांद्याची गरज नाही, मग काय झटपट पाकृच! पण काय हे चिकन मुरवायची गरज नाही?

मराठमोळा Sat, 08/07/2010 - 00:09
जागु तै, तुमच्या पाकृ छान असतात, तुमच्या मेहनतीचे कौतुकही आहे. पण प्रेझेंटेशकडे थोडे लक्ष दिलेत तर आणखीन छान वाटेल. सादरीकरणाला फार महत्व आहे स्वयंपाकत असे मला वाटते, गणपा शेटचा सल्ला/मदत घ्या हवं तर याबाबतीत. :)

कवितानागेश Sat, 08/07/2010 - 09:04
लसूण वजा केल्यास, आणी थोडे शेंगदाणे/काजू घातल्यास हे 'उपासाचे चिकन' होउ शकते!

जागु Sat, 08/07/2010 - 14:45
श्रिराजे, सहज, पियु , प्रभो धन्यवाद. लिमाउजेट, राजकुमार जर तुम्हाला चालत असेल उपवासाला तर काहीच हरकत नाही. मराठमोळा धन्यवाद, तुम्हीही सुचना दिल्यात तरी चालेल. तरी मी गणपांना विचारेनच. सुनिल, मुरवल तर चांगलच आहे. डिलर अगदी चालतील. मी सोयाक्युबचे पदार्थ मटण, चिकन प्रमाणेच बनवते.