Skip to main content

मस्त मस्त कुकिज

लेखक जासुश यांनी शुक्रवार, 06/08/2010 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
१ कप गव्हाचे पिठ 1/4 कप self raising फ्लोर 1/2 कप पिठि साखर 1/4 टिस्पुन मिठ 1/2 टिस्पुन इलायची 1/2 कप अनसॉल्टेड बटर 2 टेबल्स्पून्स दुध ओवेन 360 डिग्री फॅरनाइट वर प्री हिट करा. एका बोल मधे पीठ, साखर,मिठ,इलायची पाउडर मिक्स करा. आता वितल्लेले बटर,दूध घालुन निट मिक्स करा व ते वरिल बोल मधिल मिक्स मधे घाला. ह्याचा मळून मउ गोळा करा. आनी त्याचे छोटे छोटे गोळे करून चप्टे करा. आता हे गोळे बेकिंग ट्रे वर ठेवा. व १५ मिनिट साठि बेक करा. आता ह्या कुकिस तयार झाल्या. गरम गरम चहा बरोबर मस्त लागतात. हा फोटो कढुन मला जवळ जवळ एक वर्ष झाले उशिर होण्याचे कारण :-- टाइप करायाचा आळशि पणा आणखि काय.

वाचने 4368
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मस्तच्.इराणी बेकरीत अशा कुकीज मिळतात बहुतेक. -----

छान दिसत आहेत कुरकुरीत कुकीज... मला पण इराण्याच्या हॉटेलातल्या बरण्यांची आठवण झाली!!! :)

In reply to by मस्त कलंदर

सकाळचा चहा अन बिस्किटे, कुकी(मग त्या चितळेंच्या कणकेच्या का असेना ;-) ), खारी, टोस्ट, रसक म्हणजे दिवसाची सर्वोत्तम सुरुवात असे तर ब्वॉ आपले ठाम मत आहे.

In reply to by अर्धवट

चपातीचा विसर पडला हो, लै लै वर्षे झाली खाउन! माझे म्हणणे, चहा (अन असेच सोबत काहीतरी खायला)म्हणजे दिवसाची...

आभारि आहे.सर्वान्च्या छान छान प्रति क्रियान्साठि.. मला नान खटाई जास्त आवडते. पन प्रॉपर रेसिपी कुठे मिळलि नाही.

छान. कुकीज खरोखरच मस्त दिसत आहेत.