आमची प्रेरणा अजब यांचे 'एका फुलाचे मनोगत (गजल)'
कधी तरी मी 'फुगलो' होतो, अता जरी मी 'सुकलो' आहे
कधी तरी 'दरवळलो' होतो, अता जरी 'मावळलो' आहे...
गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली
हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे...
मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे
'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे...
अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो
विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे...
उसंत आली माझ्या नशिबी तीही केवळ काहि क्षणांची
शीतकपाटी 'केक' आठवुन त्यातच मी तरि रमलो आहे!...
चतुरंग
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10734
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिर्षक
असेच म्हणते..
In reply to शिर्षक by इनोबा म्हणे
:)
हे हे हे!
वाव
एकदम फिट!
डांबिसकाका,
In reply to एकदम फिट! by पिवळा डांबिस
नायतर काय!:))
In reply to डांबिसकाका, by चतुरंग
हा हा हा..
लई ब्येस
जबरी!
भन्नाट!
लै भारी !!!
सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे आभार!