Skip to main content

(एका 'बैलाचे' मनोगत (गजल))

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 03/05/2008 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अजब यांचे 'एका फुलाचे मनोगत (गजल)' कधी तरी मी 'फुगलो' होतो, अता जरी मी 'सुकलो' आहे कधी तरी 'दरवळलो' होतो, अता जरी 'मावळलो' आहे... गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे... मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे 'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे... अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे... उसंत आली माझ्या नशिबी तीही केवळ काहि क्षणांची शीतकपाटी 'केक' आठवुन त्यातच मी तरि रमलो आहे!... चतुरंग
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 10734
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

शिर्षक वाचून कायतरी येगळंच वाटलं ह्वतं..... एका बैलाचे 'मनोगत' :)) मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे 'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे... अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे... या ओळी आवडल्या... (सुकलेला)-इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे 'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे... हे एकदम मस्त... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे... मस्त! बैलाचे 'मनोगत' आवडले रे रंगा! :) आपला, तात्याबैल.

गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे... :D बाकी इनायकभौ, एका बैलाचे 'मनोगत' हे तर मस्तचं :))

उसंत आली माझ्या नशिबी तीही केवळ काहि क्षणांची शीतकपाटी 'केक' आठवुन त्यातच मी तरि रमलो आहे!... :)) शीतकपाट हा शब्द कसा बरं सुचला असेल? :?

गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे... कालच पुरणपोळी आणि वालाचं बिरडं खाल्याने या स्थितीशी एकदम रिलेट करू शकलोय!:)) मस्त विडंबन!

In reply to by पिवळा डांबिस

अहो, पुरणपोळी + वालाचं बिरडं = आर.डी.एक्स. की हो!! :)) :)) :)) चतुरंग

रंगाशेठ :B , एकदम झकास विडंबन... =D> =D> शितकपाट .. :D चालू द्या... (3:-O )केशवसुमार स्वगतः-केश्या तू अता हरी हरी करायला मोकळा

वाहव्वा, चतुरंग सायेब, लई म्हन्जे लईच ब्येस. आमचा पण नगाराच झालाय या असल्यापाई!

चतुरंग..... एकदम भारी हं :)

लै भारी.......... :-) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे... चतुर, एका 'बैलाचे' मनोगतलै भारी बरं का !!!